मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
अजिंठा (Ajintha Fort) | किल्ल्याची ऊंची :  0 | ||
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||
जिल्हा : छ. संभाजीनगर | श्रेणी : सोपी | ||
जगप्रसिध्द अजिंठा लेण्याजवळ असलेले अजिंठा गाव मध्ययुगात एका किल्ल्यात वसलेले होते. अजिंठा किल्ल्याचा आवाका खुप मोठा होता सध्याच्या अजिंठा गावचा बराच भाग किल्ल्याच्या कवेत होता. परंतु आता त्याची खूपच पडझड झाली आहे. आता अस्तित्वात असलेले किल्याचे भाग गावभर विखुरलेले आहेत. अजिंठा किल्ला, अजिंठा सराई आणि फ़त्तेपूर सराई ही तिन्ही ठिकाणे जवळ जवळ असून एका दिवसात पाहाता येतात. | |||
|
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
मुख्य दरवाजा / बुलंद दरवाजा / पुलवा दरवाजा अजिंठा नदीवर बांधलेला हा दरवाजा व आजुबाजूची तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे .हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा असावा असे वाटते. प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजुला बुरूज आहेत. त्यातील एका बुरजावर तोफ ठेवण्यासाठी चौथारा बांधलेला असून, ती फिरती ठेवण्याची व्यवस्था होती. दरवाजाची लाकडी दारे लोखंडी खिळे लावून अधिक मजबूत केलेली आहेत. दरवाजातून प्रवेश केला की डाव्या बाजुला देवडी आहे. उजव्या बाजुला तटबंदीत असलेल्या जिन्याने दरवाजावर जाता येते. बुरूज व दरवाज वरील तटबंदीत जंग्या व तोफ डागण्यासाठी खिडक्या केलेल्या आहेत. या दरवाजाचे नाव "बुलंद दरवाजा" असून स्थानिक लोक या दरचाजाला "पुलवा दरवाजा" असेही म्हणतात. फत्ते दरवाजा मुख्य रस्त्याने पुढे गेल्यावर फ़त्ते दरवाजा आहे. किल्ल्याला तटबंदीचे दोन कोट आहेत. बुलंद दरवाजा हा बाहेरील तटबंदीत असून फ़त्ते दरवाजा आतील तटबंदीत आहे. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजुला दोन छोटे दरवाजे आहेत. या तिन्ही प्रवेशव्दारांची आता फक्त कमान शिल्लक राहिलेली आहे शिवणा दरवाजा / आलमगीर दरवाजा फत्ते दरवाजा पासून थोडे पुढे गेल्यावर एक रस्ता उजवीकडे वळतो. या रस्त्याने चालत गेलो की आपण शिवणा दरवाजापाशी पोहोचतो. हा रास्ता पु्ढे शिवणा गावाकडे जातो म्हणून याला शिवणा दरवाजा असे म्हणतात, या प्रवेशव्दराला आलमगीर दरवाजा असेही म्हणतात. प्रवेशव्दाराला लाकडी दारे व त्यावर लोखंडी खिळे आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजुला दोन बुरूज आहेत, पण ते अतिक्रमणामुळे अर्धे झाकले गेले आहेत. अतिक्रमणामुळे प्रवेशव्दारावर जायचा रास्ता बंद झाला आहे. बारदरी व बुरूज शिवणा दरवाजा बघून झाला की आलो त्या रस्त्याने फ़त्ते दरवाजाकडे न वळता सरळ चालत गेल्यावर गाव जिथे संपते तिथे सरकारी रुग्णालय आहे. हे रुग्णालय म्हणजेच बारदरी. हा तात्कालीन सरदारचा / किल्लेदाराचा वाडा असावा. या वास्तू भोवती तटबंदी असून त्यात नक्षीदार कमान असलेले मुख्य प्रवेशव्दार व त्यावर नगारखाना आहे. प्रवेशव्दारातून आवारात शिरल्यावर समोरच मुस्लिम स्थापत्य शैलीत बांधलेली वाड्याची इमारत दिसते. त्यात सध्या शासकीय रुग्णालय आहे. बारदरी बघून मुख्य दरवाजाने बाहेर पडून डाव्या बाजूने थोडे पुढे चालत गेल्यावर नॅशनल उर्दु हायस्कूल - अजिंठा लागते. या शाळेच्या पटांगणात किल्ल्याचा एकमेव सुस्थितीतील बुरूज आहे. दगडी पायऱ्यांनी ह्या बुरुजाच्या वर जाता येते. इथे एक चौथरा आहे. त्यावर तोफ ठेऊन ती गोलाकार फिरवण्ण्याची सोय केलेली पाहायला मिळते. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
छ.संभाजीनगर (औरंगाबाद) - अजिंठा - जळगाव रस्त्यावर संभाजीनगर पासून ९४ कि.मी. अंतरावर एक टी जंक्शन आहे, येथून डाव्या बाजूचा रास्ता आपल्याला अजिंठा गावात घेऊन येतो, हाच रास्ता आपल्याला बुलंद दरवाजा पाशी घेऊन येतो. |
जिल्हा C.Sambhaji Nagar | अजिंठा (Ajintha Fort) | अजिंठा सराई (Ajintha Sarai) | अंतुर (Antoor) | भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad)) |
देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad)) | फर्दापूर सराई (Fardapur Sarai) | जंजाळा (वैशागड) (Janjala (Vaishagad)) | लहुगड (Lahugad) |
लोंझा (Lonza) | पेडका (Pedka) | सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) | वेताळवाडी गड (Vetalwadi gad) |