मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

अजिंठा सराई (Ajintha Sarai) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : छ.संभाजीनगर श्रेणी : सोपी
छ.संभाजीनगर (औरंगाबाद) - अजिंठा - जळगाव रस्त्यावर, अजिंठा लेण्यांजवळ अजिंठा सराई आणि फ़र्दापूर सराई अशा दोन सराया आहेत. सराई म्हणजे व्यापारी, प्रवासी, सैन्यदल यांना तात्पुरती राहाण्यासाठी केलेली सोय. या सरायांना भक्कम प्रवेशव्दार , दरवाजे , बुरुज , तटबंदी , अशी किल्ल्यासारखी संरक्षणाची सोय केलेली असते.

8 Photos available for this fort
Ajintha Sarai
पहाण्याची ठिकाणे :
अजिंठा सराईच्या इमारतीला भक्कम तटबंदी व बुरुज आहेत त्यामुळे ती एखाद्या गढी सारखी वाटते. या सराईचा आकार अष्टकोनी असून तीला आठ बुरुज व दोन दरवाजे आहेत. अजिंठा गावातून आपण दक्षिण प्रवेशव्दारापाशी येऊन पोहोचतो. या प्रवेशव्दाराच्या कमानीवर एक शिलालेख आहे. प्रवेशव्दाराच्या लाकडी दरवाज्यावर संरक्षणासाठी दोन इंचाचे लोखंडी खिळे ठोकलेले आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर दोन्ही बाजूला देवड्या आहेत. परंतु तिथे सध्या विटांचे बांधकाम केले आहे. आत प्रवेश केल्यावर उजव्या व डाव्या बाजूच्या दिंडी दरवाजाने तटबंदीवर जायची सोय होती, तिथे सध्या अतिक्रमण झालेले आहे.

येथूनच समोर आपल्याला दक्षिण दरवाजा दिसतो .या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला फ़ांजीवर जाण्यासाठी दिंडी दरवाजा आहे. त्यातील डाव्या बाजूच्या दरवाजाने फ़ांजीवर जात येते. फ़ांजीवरुन आपल्याला पूर्ण गडफेरी करता येते. तटबंदीत एकूण आठ षटकोनी बुरुज आहेत .त्यातील दोन बुरुजांना तोफ फिरती ठेवण्यासाठी गोल चौथरा बांधलेला दिसतो. गडफेरी पूर्ण करून आपण आलेल्या दिंडी दरवाजाने खाली उतरावे व बाजूलाच असलेला उत्तर दरवाजा पाहावा. या दरवाजने बाहेर पडल्यावर एक छोटी पुष्करणी पाहायला मिळते.

अजिंठा लेणी, अजिंठा किल्ला, अजिंठा सराई व फर्दापूर सराई एका दिवसात खाजगी वाहनाने सहज पाहाता येतात.
पोहोचण्याच्या वाटा :
छ.संभाजीनगर (औरंगाबाद) - अजिंठा - जळगावरस्त्यावर संभाजीनगर पासून ९४ किलोमीटर अंतरावर एक "T" जंक्शन आहे, येथून डाव्या बाजूचा रास्ता आपल्याला अजिंठा गावात घेऊन येतो, इथे लक्षात ठेवयची खुण म्हणजे H.P चा शुभम पेट्रोल पंप. अजिंठा गावाच्या दक्षिण भागात ही सराई आहे .
जिल्हा C.Sambhaji Nagar
 अजिंठा (Ajintha Fort)  अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अंतुर (Antoor)  भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad))
 देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad))  फर्दापूर सराई (Fardapur Sarai)  जंजाळा (वैशागड) (Janjala (Vaishagad))  लहुगड (Lahugad)
 लोंझा (Lonza)  पेडका (Pedka)  सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort))  वेताळवाडी गड (Vetalwadi gad)