मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

चापोरा किल्ला (Chapora Fort) किल्ल्याची ऊंची :  250
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : गोवा श्रेणी : सोपी
उत्तर गोव्यात वेगेटार समुद्र किनार्‍याजवळ चापोरा किल्ला आहे. चापोरा नदीतून होणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधलेला होता. सध्या "दिल चाहता है" या सिनेमामुळे हा किल्ला पर्यटकांचे आर्कषण बनला आहे.

Chapora Fort
Chapora Fort
इतिहास :
चापोरा किल्ला चापोरा नदीच्या काठावर आहे. या किल्ल्याची उभारणी आदिलशहाने केली. या किल्ल्याचे बांधकाम १६१७ मधे पुर्ण झाले. आदिलशहामने त्याचे नामकरण शाहपुरा असे ठेवले. परनेमचे राजे आणि सावंतवाडीच्या सावंताककडे दोन वर्षे हा किल्ला होता. पोर्तुगीजांनी १७१७ मध्ये किल्ला जिंकला व किल्ल्याची पुर्नबांधणी केली. या किल्ल्याचे महत्व १८९२ नंतर कमी झाले.

पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच्या टेकडीच्या पायथ्या पर्यंत रस्ता आहे. रस्त्याने चापोरा किल्ल्याजवळ पोहोचल्यावर १० मिनिटे चढाई करुन आपण किल्ल्याच्या आग्नेय दिशेकडील प्रवेशव्दाराने किल्ल्यावर प्रवेश करतो. किल्ल्यावर तीन गोल बुरुज आणि चार बाणाकृती बुरुज आहेत. किल्ल्यावर एक उधवस्त वास्तु आहे, त्या जागी पूर्वी सेंट अँथनी चर्च होते. किल्ल्यावर वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात. किल्ल्यावर आपल्याला कॅप्सुल बुरुज पहायला मिळतात. किल्ल्याला ४ प्रवेशव्दार आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
हा किल्ला गोव्यातील वेगेटार समुद्रकिना‌‍‌र्‍यापासुन १.५ किमी अंतरावर आहे. किल्ल्यापासुन जवळचे रेल्वे स्थानक थिविम आहे. थिविम रेल्वे स्थानकापासुन हा किल्ला १८ किमी अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
जिल्हा Goa
 अग्वाडा (Aguada)  बेतुल किल्ला (Betul Fort)  खोलगड (कोबा द राम ) (Cabo de Rama (Kholgad))  चापोरा किल्ला (Chapora Fort)
 मार्मागोवा किल्ला (Mormugao Fort)  तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)