मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

मांडवी कोट (Mandvi Kot) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : पालघर श्रेणी : सोपी
विरार वसईहून वज्रेश्वरीकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या मांडवी गावत पोर्तुगिजांनी बांधलेला मांडवी कोट आहे. मांडवी याचा अर्थ जकातनाका असा होतो. शुर्पारक (नालासोपारा) या प्राचिन बंदरावरुन नाणेघाट , थळ घाट इत्यादी प्राचीन घाटवाटांकडे जाणार्‍या व्यापारी मार्गावर मांडवी हे गाव होते. शिलाहरकालिन शिलालेखात मांडवी गावाचा उल्लेख येतो. गावात आजही शिलाहार काळात बांधलेला तलाव आहे. एकेकाळी या तलावाच्या काठावर मंदिर आणि जकात नाका असावा. मंदिराचे अवशेष पोर्तुगिजांनी बांधलेल्या किल्ल्यात आजही पाहायला मिळतात.
22 Photos available for this fort
Mandvi Kot
Mandvi Kot
Mandvi Kot
इतिहास :
शुर्पारक (नालासोपारा) या प्राचिन बंदरावरुन नाणेघाट , थळ घाट इत्यादी प्राचीन घाटवाटांकडे जाणार्‍या व्यापारी मार्गावर मांडवी हे गाव आहे, शिलाहरकालीन शिलालेखात मांडवी गावाचा उल्लेख येतो. गावात आजही शिलाहार काळात बांधलेला तलाव आहे. एकेकाळी या तलावाच्या काठावर मंदिर आणि जकात नाका असावा. मंदिराचे अवशेष पोर्तुगिजांनी बांधलेल्या किल्ल्यात आजही पाहायला मिळतात.

३० मार्च १७३१च्या पोर्तुगीज व्हाईसरॉयने आपल्या बादशहास लिहिलेल्या पत्रात मांडवीचा उल्लेख आहे. इ.स. १७३७ ते १७३९ च्या फिरंगाणावरील मोहिमेत मांडवी किल्ला जिंकण्याची कामगिरी बरबाजी ताकपीर या चिमाजी अप्पांच्या सरदारावर सोपविण्यात आली होती. ३ एप्रिल १७३७ रोजी बरबाजीने मांडवीस वेढा दिला व तोफांचा मारा केल्याने एक तोफगोळा लागुन किल्ल्याचा एक दरवाजा मोडून पडला. ६ एप्रिल रोजी आणखी दोन तोफा गोखीवरेवरून आणून त्या जोडून त्यांचाही मारा सुरु केला. ११ एप्रिल रोजी केशव सजणाजी या भिवंडीच्या ठाणेदाराने एक नवीन गोलंदाज बरबाजीकडे पाठवून दिला. १५ एपिलपर्यंत मराठ्यांचा मारा चालूच होता. परंतु आदल्या दिवसापासून फिरंगी मारा न करता शांत होता तेव्हा मराठ्यांनी ताडाची झाडे तोडून त्या ताकडांचा दमदमा तयार केला व त्यावर तोफा चढवून किल्ल्यात मारा करण्यास सुरवात केली. या वेढ्यात तुकनाक महाराचा एक मोर्चा होता. त्याच्या मोर्चेकऱ्यांनी फार मेहेनत केली. मुख्यतः त्याच्याच मोर्चामुळे व बंदरावरुन आणलेल्या तोफेच्या मारामुळे मांडवीचा किल्ला मेटाकुटीस आला. १ मे १७३७च्या सुमारास मांडवीच्या पोर्तुगीज किल्लेदाराने मांडवी कोटात शरणागती पत्करली.
पहाण्याची ठिकाणे :
मांडवी कोट आयताकृती आहे. किल्ल्याच्या दोन बाजूला तलाव आहे. त्यामुळे किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण मिळालेले आहे. किल्ल्याच्या उरलेल्या दोन बाजूला खंदक खोदून त्यात तलावाचे पाणी फ़िरवून किल्ल्याला संरक्षण दिले होते. सध्या गावातून किल्ल्याकडे जातांना घरे लागतात. ही घरे बांधतांना किल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या समोर असलेला खंदक बुजवला गेलेला आहे. गावातून किल्ल्यात शिरतांना उजव्या आणि डाव्या बाजूला बुरुजाचे अवशेष पाहायला मिळतात. या ठिकाणी असलेले किल्ल्याचे प्रवेशव्दार नष्ट झालेले आहे. डाव्या बाजूच्या बुरुजाचा अष्टकोनी पाया इथे पाहायला मिळतो. उजव्या बाजूचा बुरुज कोसळून तिथे दगड मातीचा ढिगारा तयार झालेला आहे. किल्ल्याचा आकार आयताकृती आहे. आयताच्या चारही कोपर्‍यांवर चार बुरुज आहेत, चारही बुरुज ढासळलेले असले तरी त्यातील तीन बुरुजांचा पाया आजही पाहाता येतो. त्यावरुन याठिकाणी अष्टकोनी बुरुज होते असे म्हणता येते.

किल्ल्यात भरपूर झाडे झुडपे वाढलेली आहेत. त्यातून किल्ल्याचे अवशेष शोधून काढावे लागतात. किल्ल्यात शिरल्यावर डाव्या बाजूच्या तटबंदीच्या बाजूने थोडेसे अंतर चालत गेल्यावर तटबंदीत ५ फ़ूटावर मार्‍याच्या दोन जागा असलेल्या जंग्या पाहायला मिळतात. किल्ल्याची चारही बाजूची तटबंदी ढासळलेली आहे. सध्या किल्ल्याच्या शाबूत असलेल्या तटबंदीची उंची ३ ते ५ फ़ूट आहे. किल्ल्याच्या जंगीची जमिनीपासूनही ५ फ़ूट उंची पाहाता , तटबंदीची उंची अंदाजे १० ते १२ फ़ूट असावी. जंगी पाहून थोडे अंतर पुढे चालत गेल्यावर तोफ़ेचा मारा करण्यासाठी असलेला एक झरोका पाहायला मिळतो. या झरोक्याच्या डाव्या बाजूला मंदिराच्या बांधकामातला कोरीवकाम केलेला दगड वापरलेला पाहायला मिळतो. या झरोक्या पर्यंत चढण्यासाठी पायर्‍या आहेत. येथून तलाव पाहायला मिळतो.

किल्ल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या तटबंदीच्या काटकोनात ठरावीक अंतरावर भिंती बांधलेल्या आहेत. त्याठिकाणी सैनिकांना राहाण्यासाठी खोल्या बांधलेल्या असाव्यात. किल्ल्याचा हा भाग पाहून किल्ल्याच्या उत्तरेकडे असलेल्या प्रवेशव्दाराकडे जावे. किल्ल्याचे हे प्रवेशव्दार शाबूत आहे. प्रवेशव्दाराच्या दरवाजा मागे घालायच्या अडसरासाठी असलेल्या खाचा ही इथे पाहायला मिळतात. प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूला देवड्या आहेत. त्यातील एका देवडीत यक्ष, सुरसुंदरी (?) आणि योगीची (?) प्रतिमा कोरलेले दगड ठेवलेले आहेत. त्याचीं भरपूर झीज झाल्यामुळे यक्ष सोडल्यास इतर मुर्ती ओळखता येत नाहीत. बाह्य आकारावरुन अंदाज बांधता येतो. किल्ल्याच्या तटबंदीत, प्रवेशव्दारासाठी वापरलेले मंदिराचे कोरीव दगड आणि इथे ठेवलेल्या मुर्ती पाहाता या ठिकाणी पूर्वी मंदीर असावे असे म्हणता येते.

प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर प्रवेशव्दाराच्या बाजूचे दोन्ही बुरुजांचे अवशेष पाहायला मिळतात. या बुरुजांचा पाया अष्टकोनी आहे. प्रवेशव्दारा समोर तलावाकाठी एक वीरगळ आहे. त्यावरील शिल्प झिजलेले असल्यामुळे ओळखता येत नाही. वीरगळ पाहून किल्ल्यात परत येऊन डावी कडील तटबंदीच्या अवशेषातून किल्ल्याबाहेर पडल्यावर खंदक पाहायला मिळतो. खंदक पाहून किल्ल्यात येऊन प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ला पाहायला १५ मिनिटे लागतात. किल्ल्यात भरपूर झाडी आणि गवत माजलेले आहे. ते काढल्यास अजून काही अवशेष सापडण्याची शक्यता आहे.

किल्ला पाहून तलावापाशी येऊन त्याच्या काठाकाठाने जाणार्‍या रस्त्याने तलावाला प्रदक्षिणा घालतांना रस्ता संपतो तेथे उजव्या बाजूला तलावाचे पाणी अडवण्यासाठी असलेला मातीचा बांध आहे, या उंचवटयावरुन पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या समोर असलेल्या वीरगळीच्या समोरच्या बाजूला येतो. याठिकाणी डाव्या बाजूला तलावाचे पाणी खंदकात नेण्यासाठी केलेला कालवा पाहायला मिळतो.
पोहोचण्याच्या वाटा :
१) एसटीच्या आणि नगरपालिकेच्या बसेसने जाण्यासाठी :-
विरार, वसई आणि नालासोपारा येथून वज्रेश्वरीकडे जाण्यासाठी एसटीच्या तसेच नगरपालिकेच्या बसेस आहेत. या बसेसनी मांडवी गावाच्या थांब्यावर उतरावे. थांब्यावरुन गावात जाणार्‍या रस्त्याने पुढे गेल्यावर जिल्हा परिषदेची शाळा लागते. याठिकाणी डाव्या बाजूने जाणार्‍या रस्त्याने पुढे चालत गेल्यावर तळे दिसते. त्या ठिकाणी उजव्या बाजूला गावात जाणार्‍या रस्त्यावर वळून तलावाच्या काठाने पुढे गेल्यावर डाव्या बाजूला गावाला पाणीपुरवठा करणारी टाकी दिसते. ही टाकी किल्ल्यात आहे. त्या टाकीच्या दिशेने घरांच्या बाजुने वाट काढत गेल्यावर आपण किल्ल्यात पोहोचतो.

२) रिक्षाने :- विरारहून मुबई - अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड नाक्याला जाण्यासाठी शेअर रिक्षा मिळतात. या नाक्याच्या एका बाजूला विरार फाटा तर दुसऱ्या बाजूता वज्रेश्वरी फाटा आहे. फाट्यावरुन वज्रेश्वरीकडे जाणार्‍या रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर मांडवी गाव आहे. फ़ाट्यापासून चालत १० मिनिटात मांडवी गावात पोहोचता येते.

३) खाजगी वहानाने : - मुबई - अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड नाक्यावरुन वज्रेश्वरीकडे जाणार्‍या रस्त्यावर ८०० मीटरवर मांडवी पोलिस स्टेशन आहे. त्या पोलिस स्टेशनच्या पुढे डावीकडे मांडावी गावात जाणारा रस्ता आहे.
राहाण्याची सोय :
मांडवी गावात राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
मांडवी गावात रस्त्या लगत काही हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही,
जाण्यासाठी लागणारा वेळ :
मांडवी स्टॉप पासून कोटा पर्यंत चालत जाण्यासाठी १० मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: M
 मच्छिंद्रगड (Machindragad)  माचणूर (Machnur)  मदनगड (Madangad)  मदगड (Madgad)
 मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  माढा गढी/किल्ला (Madha Fort)  मधुमकरंदगड (Madhu makarandgad)  महादेवगड (Mahadevgad)
 माहीमचा किल्ला (Mahim Fort)  माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))  महिमानगड (Mahimangad)  महिमतगड (Mahimatgad)
 महिपालगड (Mahipalgad)  महिपतगड (Mahipatgad)  माहुली (Mahuli)  माहूर (Mahurgad)
 मलंगगड (Malanggad)  मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)  मल्हारगड (सोनोरी) (Malhargad)  मंडणगड (Mandangad)
 मांडवी कोट (Mandvi Kot)  मानगड (Mangad)  मंगळगड (Mangalgad)  मंगळवेढा (Mangalwedha)
 मांगी - तुंगी (Mangi-Tungi)  माणिकदूर्ग (Manikdurg)  माणिकगड (Manikgad)  मणिकपूंज (Manikpunj)
 मांजरसुभा (Manjarsubha Fort)  मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad)  मार्कंड्या (Markandeya)  मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir))
 मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))  मोहनगड (Mohangad)  मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort)  मोरागड (Moragad)
 मोरधन (Mordhan)  मोरगिरी (Morgiri)  मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)  मृगगड (Mrugagad)
 मुडागड (Mudagad)  मुल्हेर (Mulher)