मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
निमगिरी (Nimgiri) | किल्ल्याची ऊंची :  3460 | ||||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: नाणेघाट | ||||
जिल्हा : पुणे | श्रेणी : मध्यम | ||||
सह्याद्रीच्या बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे. ती नाशिक, नगर आणि पूणे या जिल्ह्यांना छेदत पुढे जाते. या रांगेत अनेक दुर्गपुष्प आहेत, अनेक घाट वाटा आहेत. माळशेज, दर्याघाट, नाणेघाट, साकुर्डीघाट असे अनेक घाट आहेत तर हरिश्चंद्रगड, कुंजरगड, पाबर, कलाड, निमगिरी, हडसर आणि भैरव सारखे किल्ले आहेत. यातील हरिश्चंद्रगडाच्या समोर निमगिरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या कातळात खोदलेल्या पायर्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत.पण पायर्या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झाली आहे. सोबत रोप असल्यास या वाटेने जाता येते. निमगिरी आणि हनुमंतगड हे दोन जोड किल्ले एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. दोन्ही किल्ले पाहायला चार तास लागतात. हनुमंतगड(निमगिरी) ची माहिती साईटवर दिलेली आहे. |
|||||
|
|||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||
निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. आपली चढाई दोन्ही डोंगरांच्या मधून होते. खांडीपाड्याच्या प्राथमिक शाळे पुढील मैदानातून इलेक्ट्रीक टॉवरच्या दिशेने चढत जावे. टॉवरच्या वरच्या टप्प्यावर चढुन गेल्यावर शेतजमिनीचे तुकडे आहेत. या टप्प्यावर पायवाट सोडून डाव्या बाजूला गेल्यावर उघड्यावर असलेली एक सुंदर मुर्ती आणि मंदिराचे काही अवशेष दिसतात. त्याच्या समोरच एक मोठे पाण्याचे टाक आहे. पुन्हा पायवाटेवर येऊन चढायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला झाडीत लपलेली गणपतीची मुर्ती, पिंड आणि नंदी पाहायला मिळतो. थोडे पुढे चढुन गेल्यावर एका पुरातन वृक्षाखाली हनुमंताची मुर्ती आहे. समोरच एक समाधीचा दगड आहे. त्यावर शिल्प कोरलेल आहे. पुढे थोड्याच अंतरावर ४२ वीरगळ एका रांगेत ठेवलेल्या पाहायला मिळतात. त्यातील काही वीरगळींवर शिलालेख कोरलेले आहेत. वीरगळी पाहून खिंडीच्या दिशेने अर्धातास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगराच्या कातळात गुहा दिसतात. या गुहा टेहळणीसाठी बनवलेल्या आहेत. इथून कातळात खोदलेल्या पायर्यांची वाट आहे. पण पायर्या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झालेली आहे. सोबत रोप असल्यास या वाटेने जाता येते. या वाटेच्याच खाली एक पायवाट वळणा वळणाने निमगिरी आणि हनुमंतगड यांच्या मधिल खिंडीत जाते. या वाटेने आपण १५ मिनिटात खिंडीत पोहोचतो. खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड आहे. उजव्या बाजूला असलेल्या कातळ कोरीव पायर्यांच्या साहाय्याने आपण १० मिनिटात निमगिरीच्या गडमाथ्यावर पोहोचतो. किल्ल्याच्या पायर्या चढताना एक वाट डावीकडे गेलेली दिसते. इथे टेहळणीसाठी एक गुहा बनवलेली आहे. पण वाट तुटल्यामुळे गुहेपर्यंत जाता येत नाही. हनुमंतगडावरुन ही गुहा दिसते. निमगिरीच्या उध्वस्त प्रवेशव्दाराच्या बाजूला पहारेकर्यांसाठी गुहा कोरलेली आहे. गडमाथ्यावर गेल्यावर उजव्या बाजूने गडफ़ेरीस सुरुवात करावी. प्रथम २ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. यापैकी एका टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. ही टाकी पाहून थोडे चालून गेल्यावर, दोन पाण्याच्या टाक्या आहेत. पुढे गेल्यावर एक गजलक्ष्मीचे मंदिर आहे. मंदिरा समोर खराब पाण्याची दोन टाकी आहेत. या टाक्यांपासून वरच्या दिशेला चढत गेल्यावर ३ समाध्या पाहायला मिळतात. समाध्या बघून परत टाक्यांपाशी येऊन पुढे गेल्यावर ५ गुहा आहेत. शेवटच्या गुहेत एक पाण्याच टाक आणि आतमध्ये एक खोली आहे. यापैकी एका गुहेत ५ ते ६ जणांना मुक्काम करता येतो. हे पाहून गडाची सर्वात वरची टेकडी चढायला लागायचे. सर्वात वरच्या भागात काही घरांचे व वाड्यांचे अवशेष आहेत. येथून हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला आणि टोलारखिंड दिसते. समोर चावंडचा किल्लाही दिसतो. संपूर्ण किल्ला फिरण्यास १ तास लागतो. किल्ला उतरतांना वीरगळींपाशी येउन उजव्या बाजूस चालत गेल्यावर काळूबाईचे मंदिर आहे. मंदिर मुक्कामासाठी एकदम योग्य जागा आहे. मंदिराच्या मागे २ वीरगळी आहेत. | |||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||
निमगिरीला जायचे असल्यास कल्याण - मुरबाड मार्गे नगर; आळेफाटा किंवा जुन्नर अशी कुठलीही एसटी पकडावी. पुण्याहून येणार्यांना जुन्नर शिवाय पर्याय नाही. माळशेज घाट पार केल्यावर दोन किमी वर खुबी फाटा आहे. त्याच्या पुढे ४ किमी वर वेळखिंड लागते. वेळखिंड संपली की पारगाव नावाचे गाव आहे. या पारगाव वरुन एक रस्ता उजवीकडे जातो. तो बोरवाडी - मढ मार्गे खांडीपाड्यार्पंत जातो. हाच रस्ता पुढे हडसरला पण जातो. पारगाव पासून खांडीपाडा ७ किमी वर आहे. हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. खांडीपाड्यापर्यंत खाजगी वहानाने जाता येते. एसटीची बस जुन्नरहून १ किमीवरील निमगिरी गावापर्यंत येते. (एसटीचे वेळापत्रक खाली दिलेले आहे.) . तेथुन चालत खांडीपाड्यापर्यंत जावे लागते. निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका खिंडीने वेगळे झालेले आहेत. आपली चढाई दोन्ही डोंगरांच्या मधून होते. खांडीपाड्याच्या प्राथमिक शाळे पुढील मैदनातून इलेक्ट्रीक टॉवरच्या दिशेने चढत जावे. पुढे एका पुरातन वृक्षाखाली हनुमंताची मुर्ती आणि समोरच ४२ वीरगळ एका रांगेत ठेवलेल्या पाहायला मिळतात. तेथुन खिंडीच्या दिशेने अर्धातास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगराच्या कातळात गुहा दिसतात. इथून पुढे जाणारी वाट कातळात खोदलेल्या पायर्यांची आहे. पण पायर्या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झालेली आहे. सोबत रोप असल्यास या वाटेने जाता येते. या वाटेच्याच खाली एक वाट वळणा वळणाने निमगिरी आणि हनुमंतगड यांच्या मधिल खिंडीत जाते. या वाटेने आपण १५ मिनिटात खिंडीत पोहोचतो. खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड आहे. उजव्या बाजूला असलेल्या कातळ कोरीव या पायर्यांच्या साहाय्याने आपण १० मिनिटात निमगिरीच्या गडमाथ्यावर पोहोचतो. | |||||
राहाण्याची सोय : | |||||
काळुबाई मंदिरात १०, किल्ल्यावर गुहेत ६ लोक राहू शकतात. | |||||
जेवणाची सोय : | |||||
जेवणाची सोय आपण स्वत: करावी. | |||||
पाण्याची सोय : | |||||
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. | |||||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||||
खांदेपाड्यापासून १ तास लागतो. |
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: N | नगरचा किल्ला (Nagar Fort) | नगरधन (Nagardhan) | नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort) | नळदुर्ग (Naldurg) |
नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri)) | नांदरुखी कोट (Nandrukhi Kot) | नाणेघाट (Naneghat) | नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort)) |
नारायणगड (Narayangad) | नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli)) | नरनाळा (Narnala) | नस्तनपूरची गढी (Nastanpur) |
न्हावीगड (Nhavigad) | निमगिरी (Nimgiri) | निवतीचा किल्ला (Nivati Fort) |