मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सिंदोळा (Sindola) किल्ल्याची ऊंची :  3680
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: माळशेज
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
उत्तर कोकणातील बंदरांना जुन्नर (जिर्णनगर) या घाटमाथ्यावरील बाजारपेठेला जोडणार्‍या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले वेगवेगळ्या काळात बांधले गेले. जुन्नरचे रक्षण करणारा शिवनेरी आणि व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी हडसर, चावंड, जिवधन, नारायणगड,ह्नुमंतगड-निमगिरी आणि सिंदोळा या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. जूना माळशेज घाट चढून गेल्यावर त्याच्या माथ्यावर असणार्‍या सिंदोळा किल्ल्याची निर्मिती ही प्रामुख्याने घाटवाटेवर लक्ष ठेवण्यासाठी केली होती.
19 Photos available for this fort
Sindola
Sindola
Sindola
पहाण्याची ठिकाणे :
सिंदोळा किल्याच्या माथ्यावरून पूर्वेकडे एक डोंगरधार करंजाळे गावात उतरली आहे. या डोंगरधारेमध्ये असलेल्या खिंडीमधून गडावर जाणारा मार्ग आहे. या मार्गात झाडी झुडपे असल्याने रस्ता चुकण्याचा संभव आहे. खिंडीतून उजव्या बाजूला वर चढल्यावर पुढे न जाता, डाव्या बाजूला झाडीतून जाणारी पाऊलवाट आहे, ती आपल्याला वर डोंगर धारेवर घेऊन जाते. या डोंगर धारेवर समोरच सिंदोळा किल्ल्याचा डोंगर दिसतो. किल्ला समोर ठेवून चालत राहिल्यावर तीन टप्प्यामध्ये चढ लागतो. यातील पहिल्या टप्प्याच्या सुरुवातीला दोन दगडाच्या मध्ये कातळ कोरीव पायऱ्या आहेत. पुढे दोन टप्पे चढून गेल्यावर समोर डोंगर माथा दिसतो. या ठिकाणी उजव्या बाजूला १५ ते २० फुट उंचीवर कातळात कोरलेली गुहा आहे. या गुहेचा उपयोग किल्ल्यावर येण्यार्‍या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बसणार्‍या टेहेळ्यांना होत असावा. गुहा पाहून परत पायवाटेवर आल्यावर डोंगर माथ्याच्या डाव्या बाजूने अतिशय अरुंद अश्या रस्त्याने अर्धा तास चालल्यावर आपण दोन डोंगरामधील घळीत येतो. येथून १५ मिनिटात आपला गड प्रवेश होतो.

गडावर प्रवेश करताना उजव्या हाताला बुरुज आणि बुरुजच्या बाजूला उद्ध्वस्त दरवाजा दिसतो. प्रवेश केल्यावर समोरील तटबंदीत गणपती कोरलेला आहे. याच्या डाव्या बाजूला जमिनीवर भग्न मारुतीची मूर्ती पडलेली आहे. गणपतीच्या बाजूला असलेल्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून डोंगराच्या कडेने असलेल्या रस्त्यावरून पाच मिनिटे चालल्यावर डाव्या बाजूला लागोपाठ पाच ते सहा पाण्याची टाकी लागतात. यातील पहिल्या टाक्यासमोर खालच्या बाजूला बुरुज व तटबंदीचे अवशेष दिसतात. यातील शेवटच्या ४ एकत्र टाक्यांच्या समुहाच्या उजव्या बाजूने जाणारा रस्ता २ मिनिटात आपल्याला गडाच्या सर्वोच्च स्थानी घेऊन जातो. येथे एक ध्वज लावलेला आहे. येथून पुढे जाणारा रस्ता आपल्याला गडाच्या शेवटच्या टोकाला घेऊन जातो. इथून परत समोर खालच्या अंगास उद्ध्वस्त प्रवेशद्वार आणि गणपती व बुरुज दिसतो. अश्यारीतीने आपली गडफेरी पूर्ण करून परत आलेल्या मार्गाने गड उतरायला सुरुवात करावी.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे खुबी फाट्याच्या पुढे २.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या करंजाळे या गावी उतरावे. पुणे - जुन्नरवरुन येताना करंजाळे गाव खुबी फाट्याच्या अगोदर लागते. करंजाळे गावातून उजव्या बाजूला समोरच सिंदोळा किल्ला दिसतो. सिंदोळा किल्याच्या माथ्यावरून पूर्वेकडे एक डोंगरधार उतरली आहे. या डोंगरधारेमध्ये असलेल्या खिंडीमधून गडावर जाणारा मार्ग आहे.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
खुबी फाट्यावर नाश्त्याची तसेच जेवणाची सोय होऊ शकते.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
करंजाळे गावातून २.५ तास लागतात .
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
नोव्हेंबर ते मार्च .
जिल्हा Pune
 अणघई (Anghai)  भोरगिरी (Bhorgiri)  चाकणचा किल्ला (Chakan Fort)  चावंड (Chavand)
 दौलतमंगळ (Daulatmangal)  धाकोबा (Dhakoba)  दुर्ग (Durg)  घनगड (Ghangad)
 हडसर (Hadsar)  हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri))  हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri)  इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi))
 जीवधन (Jivdhan)  कैलासगड (Kailasgad)  कोरीगड (कोराईगड) (Korigad)  लोहगड (Lohgad)
 मल्हारगड (सोनोरी) (Malhargad)  मोहनगड (Mohangad)  मोरगिरी (Morgiri)  नाणेघाट (Naneghat)
 नारायणगड (Narayangad)  निमगिरी (Nimgiri)  प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley)  पुरंदर (Purandar)
 रायरेश्वर (Raireshwar)  राजगड (Rajgad)  राजमाची (Rajmachi)  रोहीडा (Rohida)
 शिवनेरी (Shivneri)  सिंदोळा (Sindola)  सिंहगड (Sinhagad)  सुभानमंगळ (Subhan Mangal)
 तैलबैला (Tailbaila)  तिकोना (Tikona)  तोरणा (Torna)  तुंग (Tung)
 उंबरखिंड (Umberkhind)  विसापूर (Visapur)