मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

वेहेळे कोट (Vehele Kot) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : ठाणे श्रेणी : सोपी
लोणावळाच्या डोंगररांगांमध्ये उगम पावणारी उल्हास नदी वसई जवळ अरबी समुद्राला मिळते. या नदीवरील कल्याण हे प्राचीन बंदर आहे. कल्याण बंदरातून माल विविध घाट मार्गांनी घाटावरील बाजारपेठां मध्ये जात असे. उल्हास खाडीतून कल्याण पर्यंत जाणार्‍या व्यापारी जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी, त्यावर नजर ठेवण्यासाठी अनेक किल्ले, चौक्या उल्हास खाडीच्या आसपास बांधलेल्या दिसतात. त्यापैकी खाडी मुखावर असलेला वसई किल्ला, धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला, नागला बंदर किल्ला, गायमुख किल्ला, पिंपळास किल्ला (चौकी), वेहेळे किल्ला (चौकी) कल्याणचा दुर्गाडी किल्ला असे अनेक किल्ले, चौक्या वेगवेगळ्या काळात, राजवटीत बांधले गेले. पोर्तुगिजांनी बांधलेले हे किल्ले (चौक्या) वसईच्या युध्दात मराठ्याच्यां ताब्यात घेतल्या. त्यानंतरच्या काळात मराठ्यांची सत्ता भारतभर पसरली. पोर्तुगिजांची सत्ताही महाराष्ट्रातून निघुण गेली आणि गोव्यापुरती सिमित राहीली . त्यामुळे पोर्तुगिजांनी कल्याण ते वसई या परिसरातील खाड्यांवर , नद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले हे किल्ले (चौक्या) काळाच्या ओघात नष्ट होत गेल्या. आजही त्यातील फ़क्त काही भिंती कशाबशा तग धरुन आहेत. यातील अनेक किल्ले खाजगी मालमत्ता झाल्याने काही काळातच नष्ट होऊन जातील.

या कोटाचे फ़ारसे अवशेष शिल्लक न राहील्याने किल्ला किंवा त्यावरील अवशेष पाहायला गेल्यास या कोटाला भेट देणार्‍यांची निराशा होण्याची शक्यता आहे.
5 Photos available for this fort
Vehele Kot
पहाण्याची ठिकाणे :
वेहेळे हे गाव उल्हास नदीवर डोंबिवलीच्या पलिकडे आहे. आता या खाडीवर माणकोली पूल झाल्याने वेहेळे गावात जाणे सोपे झालेले आहे. डोंबिवलीहून ठाण्याकडे जातांना माणकोली पुल जेथे संपतो तेथे उजव्या बाजूला वेहेळे गावात जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने वेहेळे गावात न जाता कांदळवनाकडे जाणार्‍या रस्त्याने खाडीवर जाऊन खाडीला समांतर असलेल्या रस्त्याने काफ़्रोबा देवस्थानापर्यंत जावे. या ठिकाणी दगडात बांधलेल्या दोन पडक्या भिंती आहेत . त्या ठिकाणी वेहळे चौकी होती. (किल्ल्याच्या अवशेषांचे कॉऑरडीनेट्स (Vehele Fort 19°13'59.60"N, 73° 3'57.29"E)). कोटाच्या एका भिंतीत गध्देगळचे दोन तुकडे बसवलेले आहेत . त्याला शेंदुर लावून त्यांचीच काफ़्रोबा म्हणून पूजा होते. याशिवाय येथे कोठलेही अवशेष पाहायला मिळत नाहीत.

पिंपळास कोट येथून जवळच आहे. त्यामुळे खाजगी वहानाने हे दोन्ही किल्ले १ तासात पाहून होतात.
पोहोचण्याच्या वाटा :
वेहेळे हे गाव उल्हास नदीवर डोंबिवलीच्या पलिकडे आहे. आता या खाडीवर माणकोली पूल झाल्याने वेहेळे गावात जाणे सोपे झालेले आहे. डोंबिवलीहून ठाण्याकडे जातांना माणकोली पुल जेथे संपतो तेथे उजव्या बाजूला वेहेळे गावात जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने वेहेळे गावात न जाता कांदळवनाकडे जाणार्‍या रस्त्याने खाडीवर जाऊन खाडीला समांतर असलेल्या रस्त्याने काफ़्रोबा देवस्थानापर्यंत जावे. या ठिकाणी दगडात बांधलेल्या दोन पडक्या भिंती आहेत . कॉ ऑरडीनेट्स (Vehele Fort 19°13'59.60"N, 73° 3'57.29"E)).
राहाण्याची सोय :
राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
प्रकार: Coastal Forts
 आंबोळगड (Ambolgad)  बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  डहाणू किल्ला (Dahanu Fort)  दांडा किल्ला (Danda Fort)
 देवगडचा किल्ला (Devgad Fort)  फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)  गोवा किल्ला (Goa Fort)  जयगड (Jaigad)
 कनकदुर्ग (Kanakdurg)  केळवे किल्ला (Kelve Fort)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))
 माहीमचा किल्ला (Mahim Fort)  माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))  मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)  नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))
 पूर्णगड (Purnagad)  राजकोट (Rajkot)  रेवदंडा (Revdanda)  सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))
 साटवलीचा किल्ला (Satavali Fort)  तारापुर किल्ला (Tarapur Fort)  वसई (Vasai)  वेहेळे कोट (Vehele Kot)
 वरळीचा किल्ला (Worli Fort)