बेतुल किल्ला
(Betul Fort) |
किल्ल्याची ऊंची : 
0 |
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : गोवा |
श्रेणी : सोपी |
दक्षिण गोव्यात असलेल्या वेराणा गावात जवळ उगम पावणारी साळ नदी ४० किलोमीटरचा प्रवास करून बेतुल गावा जवळ समुद्राला मिळते. साळ नदीच्या मुखावर असलेल्या टेकडीवर बेतुल किल्ल्याचे अवशेष आज कसेबसे काळाशी झुंजत उभे आहेत. किल्ल्यावरून नदी आणि सागराचा संगम आणि समोरच्या बाजूस असलेल्या किनाऱ्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
बेतुल किल्ल्या पासून ७ किलोमीटर अंतरावर काबो दे राम उर्फ खोलगड किल्ला आहे. मडगावाहून खाजगी वाहनाने दोन्ही किल्ले अर्ध्या दिवसात पाहून होतात.
|
|
इतिहास : |
इसवीसन १६७६ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती. इसविसन १७६३- ६४ मध्ये पोर्तुगीजानी हा किल्ला जिंकून घेतला.
|
पहाण्याची ठिकाणे : |
बेतुल गावातून एक रस्ता थेट किल्ल्याच्या पायाथ्या पर्यंत जातो. येथून १०-१२ पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला किल्ल्याचा एकमेव बुरुज पाहायला मिळतो . या बुरुजावर एक पुसट झालेला शिलालेख आहे. बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे. बुरुजावरून नदी आणि सागराचा संगम आणि समोरच्या बाजूस असलेल्या किनाऱ्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
बुरुज पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला चिऱ्यात बांधलेल्या वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. पोर्तुगीजानी किल्ल्यावर पोस्ट ऑफिस, कस्टम हाऊस, पोलीस स्टेशन इत्यादी इमारती बांधल्या होत्या. त्यापैकी एखाद्या इमारतीचे हे अवशेष असावेत. येथून पुढे गेल्यावर टेकडीच्या उतारावर लावलेली नाराळाची बाग पाहायला मिळते. या बागेसाठी जमीन तयार करताना किल्ल्याचे अवशेष नष्ट झाले असावेत. या ठिकाणाहून पुढे न जाता आल्या वाटेने परत किल्ल्याच्या पायाथ्याशी यावे आणि किनाऱ्यावर दिसणाऱ्या देवळाकडे जावे. या ठिकाणी संगमावर बांधलेले श्री खाणी देवाचे मंदिर पाहायला मिळते. हे राखणदाराचे मंदिर असून त्यातील मुर्ती मात्र नवीन आहे.
हे सर्व पाहून किल्ल्याच्या पायाथ्याशी आल्यावर आपले किल्ल्याचे अवशेष पाहून होतात.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
गोव्यातील मडगाव पासून १८ किलोमीटर अंतरावर बेतुल किल्ला आहे. |
राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
|
जेवणाची सोय : |
बेतुल गावात जेवणासाठी हॉटेल्स आहेत. |
पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
|
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
वर्षभर |