मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

फोर्ट जॉर्ज (बॉम्बे फोर्ट, मुंबई) (Fort Gorge) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : मुंबई श्रेणी : सोपी
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागून असलेल्या सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या आवारात फोर्ट जॉर्जचे अवशेष आहेत.
6 Photos available for this fort
Fort Gorge
इतिहास :
इंग्रजांनी बॉम्बे फोर्टला संरक्षित करण्यासाठी किल्ल्याच्या उत्तरेला ब्रिटिश राजा जॉर्ज तृतीय (१७६०-१८२० इ.स.) यांच्या सन्मानार्थ नाव असलेल्या फोर्ट जॉर्ज या किल्ल्याची पायाभरणी दि. १ जानेवारी, इ.स.१७७० रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर थॉमस हॉजेस यांच्या आदेशान्वये करण्यात आली होती. बॉम्बे फोर्टला लागून असलेला हा किल्ला फ्रेंचांच्या संभाव्य हल्ल्यापासून बचावाचा उपाय म्हणून बांधण्यात आला होता.

गव्हर्नर सर हेन्री बार्टल फ्रायर (१८६२-१८६५ इ.स.) यांच्या आदेशानुसार तत्कालीन मुंबईतील कालबाह्य झालेल्या इमारती आणि वास्तु सन १८६२-६५ या कालवधीमध्ये पाडण्यात आल्या. या वास्तुंमध्ये बॉम्बे फोर्टची तटबंदी आणि फोर्ट जॉर्ज यांचा समावेश होता.

पहाण्याची ठिकाणे :
या किल्ल्याच्या मूळ आराखड्यामध्ये तीन बुरुज, बाह्य तटबंदी, दगडी ओटे, बॉम्बप्रूफ केसमेंट, दोन दारुगोळा कोठारे आणि पावसाचे पाणी साठविण्यासाठी टाकी यांचा समावेश होता. या किल्ल्याला खंदकाद्वारे संरक्षित करण्यात आले होते आणि खंदकावर झुलते पूल होते.

सद्यस्थितीत, फोर्ट जॉर्ज मधील केवळ एका दारुगोळा कोठाराचे अवशेष उरलेले असून सदर कोठाराच्या भितींवर जंग्या आणि गोळीवार गवाक्षे आहेत. दक्षिणाभिमुखी असलेले हे दारुगोळ्याचे कोठार आयताकृती असून कोठाराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागात मार्गिका आहेत. उत्तरेकडे दारुगोळ्याच्या कोठाराच्या लगतच छोटी खोली आहे. मार्गिकांच्या वरचे छत अर्धअंडाकृती आहे. ही इमारत ब्रिटिश वसाहतीवादी कालखंडातील लष्करी स्थापत्याचा प्रतिनिधीक नमुना आहे.

या वास्तूत पुरातत्व खात्याचे कार्यालय असल्यामुळे वास्तूचे जतन उत्तम प्रकारे केलेले आहे. या वास्तूच्या भिंतींत असलेल्या लांबलचक जंग्या आजही पाहाता येतात. या वास्तूच्या आवारात एक जूनी तोफ ठेवलेली आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागून असलेल्या सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या आवारात फोर्ट सेंट जॉर्जचे अवशेष आहेत. पी डीमेलो रस्त्यावरुनही किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Junnar   Mumbai   13.30 via Malshej
15.30,21.30 via Lonavala
  -   
Khed   Mumbai   5.45,8.00,9.00,14.00,15.00, 22.00   -   
Pali   Mumbai   7,13.00   -   

प्रकार: Coastal Forts
 आंबोळगड (Ambolgad)  बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  बेतुल किल्ला (Betul Fort)  खोलगड (कोबा द राम ) (Cabo de Rama (Kholgad))
 डहाणू किल्ला (Dahanu Fort)  दांडा किल्ला (Danda Fort)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)  फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)
 फोर्ट जॉर्ज (बॉम्बे फोर्ट, मुंबई) (Fort Gorge)  गोवा किल्ला (Goa Fort)  जयगड (Jaigad)  कनकदुर्ग (Kanakdurg)
 केळवे किल्ला (Kelve Fort)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  माहीमचा किल्ला (Mahim Fort)
 माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))  मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)  नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))  पूर्णगड (Purnagad)
 राजकोट (Rajkot)  रेवदंडा (Revdanda)  सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))  साटवलीचा किल्ला (Satavali Fort)
 तारापुर किल्ला (Tarapur Fort)  वसई (Vasai)  वेहेळे कोट (Vehele Kot)  वरळीचा किल्ला (Worli Fort)