मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort)) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : दमण श्रेणी : सोपी
दमणगंगा नदीच्या दक्षिण तीरावर मोटी दमण किल्ला आहे. नानी दमण आणि मोटी दमन या दोन किल्ल्यामध्ये मोटी दमण किल्ला आकाराने मोठा आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला. भारत स्वतंत्र झाल्यावर इसवीसन १९६१ मध्ये हा किल्ला भारताच्या ताब्यात आला. नानी दमण किल्ला आणि मोटी दमण किल्ला दमणगंगा नदीच्या उत्तर आणि दक्षिण तीरावर समोरासमोर आहेत.
11 Photos available for this fort
Nani Daman Fort (St.Jerome Fort)
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच्या दमण गंगा नदीकडील दरवाजाने आपला किल्ल्यात प्रवेश होतो. प्रवेशव्दारांवर शिलालेख आणि कोट ऑफ़ आर्म कोरलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला तटबंदीला लागून असलेल्या फ़ांजीवर चढून जावे. फ़ांजीवरुन संपूर्ण किल्ला फ़िरता येतो. किल्ल्याला ३ बाणांच्या आकाराचे बुरुज आहेत. किल्ल्याला पूर्वेला मुख्य प्रवेशव्दार आहे. फ़ांजीवरुन प्रवेशव्दारा पर्यंत उतरण्यासाठी जीना आहे. किल्ल्याच्या या प्रवेशव्दाराच्या बाजूला एक छोटे प्रवेशव्दार आहे. त्याच्या बाजूला किल्ल्या वरची शाळा आणि चर्च आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावर झेंडा लावण्यासाठी असलेला लाकडी खांब आहे. किल्ला पाहाण्यासाठी अर्धा तास पुरतो.
पोहोचण्याच्या वाटा :
वापी ते दमण १२ किलोमीटर अंतर आहे. वापीहून बस, रिक्षा आणि खाजगी वहानाने दमणला जाता येते.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते मार्च
जिल्हा Daman
 मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)  नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))