सुमारगड
(Sumargad) |
किल्ल्याची ऊंची : 
2000 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: महाबळेश्वर कोयना |
जिल्हा : रत्नागिरी |
श्रेणी : मध्यम |
सुमारगड हा नावाप्रमाणेच "सुमार" आहे. ‘उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागतं.‘ असा गोनीदांनी या किल्ल्याबद्दलच्या वर्णनात म्हटलेले आहे. रसाळगड आणि महिपतगड यांच्या बरोबर मध्ये हा किल्ला येतो. आजुबाजूला असणारे जंगल आणि किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यामुळे किल्ला फारच दुर्लक्षित झालेला आहे.
|
|
पहाण्याची ठिकाणे : |
किल्ल्यावर वर पोहोचल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी आहेत. टाक्यांच्या पोटातच एक गुहा आहे. यात शिवाची पिंड आणि देवीची मूर्ती आहे. पाण्याच्या टाक्यांच्या उजव्या अंगास थोडे वर गेल्यावर एकखांबी पाण्याचे टाके लागते. एक वाट समोरच्या टेकाडावर जाते तर, दुसरी टेकाडाला वळसा घालून पुन्हा टाक्यांपाशी येते. समोरच्या टेकडीला वळसा मारताना एका ठिकाणी दगडमातीने बुजलेली गुहा दिसते. या गुहेत दोन खोल्या आहेत. मात्र यात बर्याच मोठ्या प्रमाणावर माती जमा झालेली आहे. गडमाथा फारच लहान असल्यामुळे गडफेरीस अर्धा तास पुरतो.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
सुमारगडावर जाण्यासाठी महिपत गडावरून वाडीबेलदार या गावात न उतरता उलट्या दिशेने खाली उतरावे. वाटेत धनगराची दोन तीन घरे लागतात. येथून थोडे खाली उतरल्यावर एक ओढा लागतो, तो पार करून समोरचा डोंगर चढावा, पुढे अर्ध्या तासातच आपण एका खिंडीपाशी पोहोचतो. खिंडीतून डावीकडे वर चढणारी वाट थेट सुमारगडावर घेऊन जाते. या वाटेने पुढे गेल्यावर थोड्याच वेळात आपण एका कड्यापाशी पोहोचतो. कड्याला लागूनच वाट पुढे जाते. पुढची वाट अवघड आहे. जवळ रोप असल्यास फारच उत्तम, खिंडीपासून किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास लागतो. रसाळगडावरून सुमारगडाकडे यायचे झाल्यास वाटेत एक राया धनगराचा झाप लागतो. मात्र रसाळगड ते सुमारगड हे अंतर साडेचार तासांचे आहे. |
राहाण्याची सोय : |
गडावर राहण्याची सोय नाही.
|
जेवणाची सोय : |
गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत
: करावी
|
पाण्याची सोय : |
पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.
|
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
महिपतगडामार्गे अडीच तास लागतात. |
सूचना : |
सूमारगडावर जातांना जवळ रोप असल्यास कड्याचा भाग व्यवस्थित पार करता येतो. |