| मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
| जुना पन्हाळा किल्ला (Juna Panhala) | किल्ल्याची ऊंची :  3120 | ||||||
| किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: जुना पन्हाळा | ||||||
| जिल्हा : सांगली | श्रेणी : मध्यम | ||||||
| सांगली जिल्ह्यात जूना पन्हाळा नावाचा किल्ला आहे. हा किल्ला मोठ्या पठारावर पसरलेला आहे. या किल्ल्याच्या डोंगरावर असलेली लेणी आणि याच परिसरात  असलेली डोंगरोबा डोंगरावरील लेणी पाहाता हा किल्ला एकेकाळच्या व्यापारी मार्गावर असावा. कालांतराने राजवटी बदलल्यामुळे या मार्गाचा वापर बंद किंवा कमी झाल्यामुळे या किल्ल्याचे आणि लेण्यांचे महत्व कमी झाले असण्याची शक्यता आहे. जुना पन्हाळा किल्ल्यावर पराशर ऋषींची समाधी आहे तशीच ती कोल्हापूर जवळच्या पन्हाळा किल्ल्यावरही पाहायला मिळते. जुना पन्हाळा किल्ला अल्पपरिचित असला तरी, त्यावर असलेले अवशेष, लेणी आणि लांबलचक पसरलेले पठार पाहण्यासाठी या किल्ल्याला भेट दिलीच पाहिजे सांगली जिल्ह्यातील जुना पन्हाळा, रामगड किल्ला, डफळापूरची गढी आणि अंनतपुरचा भुईकोट किल्ला हे किल्ले खाजगी वहानाने एका दिवसात पाहाता येतात. | |||||||
| 
 | |||||||
| पहाण्याची ठिकाणे : | |||||||
| जुना पन्हाळा किल्ला आणि त्याचे अवशेष खूप मोठ्या पठारावर ( सड्यावर ) पसरलेले आहेत. हे पठार ज्याठिकाणी अरुंद होते तेथे खंदक खणलेला आहे. किल्ल्याचे अवशेष पाहाण्यासाठी आपल्यापुढे दोन पर्याय आहेत. १) किल्ल्याच्या पायथ्याच्या कुकटोळी गावातून किल्ला चढून किल्ल्यावरचे गिरीलिंग मंदिर आणि त्याबाजूचे अवशेष पाहून ५ किलोमीटर लांबीचे पठार पार करून किल्ल्याचे उर्वरित अवशेष पाहून गौसिद्ध मंदिरा जवळून खालच्या कदमवाडी (बेळंकी) गावाच्या हनुमान खिंडीत उतरणे. २) कुकटोळी गावातून किल्ला चढून गिरीलिंग मंदिर आणि त्याबाजूचे किल्ल्याचे अवशेष पाहून पुन्हा कुकटोळी गावात उतरून गाडीने बेळंकी गावाजवळची हनुमान खिंड गाठुन, किल्ला चढून गौसिद्ध मंदिर आणि अवशेष पाहून किल्ला उतरणे. या दोन्ही पैकी कुठल्याही मार्गाने किल्ल्यावर गेलात तरी पूर्ण किल्ला पाहायला प्रचंड पायापीट करावी लागते. फक्त पहिल्या पर्याया मध्ये प्रचंड मोठे पठार ओलांडताना दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे किल्ला कसा पाहावा हे प्रत्येकाने त्याचा अनुभवाप्रमाणे आणि सोईनुसार ठरवावे. इथे पर्याय (१) नुसार किल्ला कसा पाहावा ते सविस्तर लिहिलेले आहे. किल्ल्याच्या पायथ्याच्या कुकटोळी गावातून गिरीलिंग मंदिरापर्यंत कच्चा रस्ता आहे. त्या रस्त्याने जीप सारखे वहान लेण्यापर्यंत जाऊ शकते. पायाथ्या पासून मधल्या मार्गाने गिरीलिंग मंदिरापर्यंत चढत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. वाटेत एक पाण्याची विहीर आहे. त्याचेच पाणी मंदिरात आणलेले आहे. गिरीलिंग मंदिर एका गुहेत आहे. गुहा जांभा दगडात खोदलेली आहे गुहेचा सभामंडप चार दगडी खाबंवर तोललेला आहे. दगडी खाब जांभ्या दगडात न बनवता बाहेरून दगड आणून बनवलेले आहेत. सभामंडपात नंदी आहे. गर्भगृहात गुहेत शिवालिंग आहे. या गिरीलिंग मंदिरासमोर पराशर ऋषींची समाधी आहे. गिरीलिंग गुहेच्या बाजूला अजून दोन गुहा आहेत. त्यातील एका गुहेत शिवलिंग असून दुसऱ्या गुहेत साधुचे वास्तव्य आहे. या गुहांकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूला पठारावर जाण्यासाठी नवीन बनवलेला जिना आहे. तिथे न जाता गिरीलिंग मंदिराच्या डाव्या बाजूने बाहेर पडावे. तेथून एक पायवाट जंगलात जाते. या वाटेने ५ मिनिटे चालत गेल्यावर आपण एका जांभ्या दगडात कोरलेल्या गुहेपाशी पोहोचतो. या गुहेत शिवलिंग आणि गणेशाची भग्न मुर्ती पाहायला मिळते. ही गुहा पाहून परत गिरीलिंग मंदिरापाशी येऊन पायाऱ्यांनी पठारावर चढून गेल्यावर आपला गड माथ्यावर प्रवेश होतो. गड माथ्यावर उजव्या बाजूला एक नवीन बांधलेले मायाक्का देवीचे मंदिर दिसते. तर डाव्या बाजूला एक तलाव आहे. पहिल्यांदा मायाक्का देवी मंदिराकडे जाऊन, दर्शन घेऊन मंदिराच्या पुढे जाणाऱ्या मळलेल्या वाटेने ५ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूला (कड्याच्या बाजूला) एक बारव दिसते . बारवेत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या बारवेत भरपूर झाडे-झुडपे उगवल्यामुळे ती पटकन नजरेस पडत नाही. ही बारव पाहून आल्या वाटेने परत मायाक्का मंदिराकडे येऊन तळ्याच्या दिशेने जावे. या तळ्याला एका बाजूने मातीचा बांध आहे. या बांधाने तळ्याच्या दुसऱ्या टोकाला गेल्यावर आपण पठाराच्या कडेला पोहोचतो. पठाराच्या कडेकडेने ५ मिनिटे चालत गेल्यावर डाव्या बाजूला खाली उतरण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या दिसतात. या पायऱ्यांनी खाली उतरल्यावर वाट तिघई लेण्याकडे जाते. ही वाट फारशी वापरात नसल्यामुळे त्यावर झाडी- झुडप वाढलेली आहेत. तिघई लेणी ४ खांबांवर तोललेली आहेत. या खाबांमुळे तीन दालन तयार झालेली आहेत. लेण्यामध्ये वटवाघुळांचा वावर आहे .ही लेणी पाहून पुन्हा तलावापाशी आल्यावर आपलें गडावरील गिरीलिंग मंदिराच्या बाजूचे अवशेष पाहून होतात. किल्ल्याच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी पूर्ण पठार ओलांडावे लागते. ते ओलांडण्यासाठी कुठल्याही खाणाखुणा नाहीत. तलावपासुन सरळ रेषेत पूर्व दिशेला चालत जावे लागते. वाटेत गवत, काटेरी झुडपे आणि बाभळीची मोठी झाडे आहेत. मधेमधे काही ठिकाणी शेत जमिनी आहेत. किल्ल्यावर जांभा दगड असला तरी शेतातली माती काळ्या रंगाची आहे. या सर्वातून मार्ग काढत (पूर्व दिशा न सोडता ) चालत गेल्यावर ३० ते ४० मिनिटात आपण दोन पठारा मधील खंदकापाशी पोहोचतो. किल्ल्याची दोन पठार वेगळी करण्यासाठी याठिकाणी खंदक खोदलेला आहे. खंदकातील दगड वापरून किल्ल्यावरील तटबंदी व इतर वास्तू बांधलेल्या होत्या. या खंदकाच्या डाव्या बाजूने एक कच्चा रस्ता जातो. त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे खंदकाच्या उजव्या बाजूने पुढे पठाराच्या कडेने चालत गेल्यावर आपल्याला कातळात खोदलेले खगळे दिसतात. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला जांभा दगडात खोदलेल्या काही पायाऱ्या दिसतात. या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर आपण उंदरोबा (बौद्ध लेणी ) लेण्यापाशी पोहोचतो. ही लेणी जांभा दगडात कोरलेली आहेस. लेण्याचा सभामंडप ४ खांबांवर तोललेला होता. काळाच्या ओघात ते खांब आता नष्ट झालेले आहेत. त्याचे अवशेष छतावर पाहायला मिळतात. लेण्याच्या गर्भगृहात एक ओबड धोबड स्तूप पाहायला मिळतो. उंदरोबा लेणी पाहून पुन्हा पठारावर येऊन पुढे चालत गेल्यावर एक चौकोनी उथळ टाक लागते. (उंदरोबा लेण्याकडे जाण्यासाठी रस्ता शोधताना हे चौकोनी टाक महत्वाचे आहे. या टाक्याच्या टोकापासुन २ मिनिटे खंदकाच्या दिशेने चालत गेल्यावर उंदरोबा लेण्याकडे उतरणारी वाट आहे. ) चौकोनी टाकं पाहून पुढे गेल्यावर कातळात खोदलेले मोठे आयताकृती टाकं पाहायला मिळते. या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. टाक्याच्या एका भिंतीत पठारावरून वाहात येणारे पाणी टाक्यात जाण्यासाठी सांडवे ठेवलेले आहेत. आयताकृती टाक पाहून पुढे गेल्यावर एका वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. या वास्तू जवळ एक पाण्याचे टाकं आहे. किल्ल्यावरील तीनही टाकी कोरडी आहेत. या वास्तूच्या पुढे कड्या जवळून खाली उतरण्यासाठी पायाऱ्या आहेत. जांभा दगडात खोदलेल्या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर आपण गौसिद्ध लेण्यांपाशी पोहोचतो. या ठिकाणी उजव्या बाजूला हनुमान - गणपती मंदिर आहे. गौसिद्ध लेण्यांमध्ये दोन लेणी वरच्या बाजूला आणि दोन लेणी खालच्या बाजूला आहेत. वरच्या बाजूला असलेल्या दोन लेण्यांपैकी एका लेण्याचे सभागृह आणि गर्भगृह असे दोन भाग आहेत. गर्भगृहात शिवपिंड आहे. या ठिकाणी गौतम ऋषींनी तपश्चर्या केली होती . दुसऱ्या गुहेत ( लेण्यात ) सध्या साधुचे वास्तव्य आहे. गौसिद्ध लेणी पाहून झाल्यावर आपले जुना पन्हाळा किल्ल्याचे या भागातले अवशेष पाहून होतात. गौसिद्ध लेण्यांपासुन एक वाट खाली उतरते. या वाटेने थोडे उतरून गेल्यावर एक बारव लागते. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या बारवेत १२ महिने पाणी असते. तेच पाणी गौसिद्ध लेण्यांसाठी वापरले जाते. ही बारव पाहून पायवाटेने खाली उतरल्यावर आपण कालव्यापाशी ( कॅनॉल ) पोहोचतो. गौसिद्ध लेण्यापासुन कालव्यापर्यंत पोहोचण्यास अर्धातास लागतो. कालव्याच्या बाजूने जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने हनुमान खिंडीत पोहोचण्यासाठी १० मिनिटे लागतात. हनुमान खिंड ते बेळंकी गाव अंतर ३ किलोमीटर आहे. | |||||||
| पोहोचण्याच्या वाटा : | |||||||
| जुना पन्हाळा पाहाण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक मिरज आहे. मिरज वरुन खाजगी गाडी करुन जूना पन्हाळा किल्ला पाहाणे योग्य आहे. १) बेळंकी - गौसिध्द मंदिर (लेणी) मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी मिरजहून बेळंकी गाव गाठावे . बेळंकी गावच्या पुढे कदमवाडी आहे. येथेच रस्त्यावर खिंडीतील हनुमान मंदिर आहे. मिरज ते खिंडीतील हनुमान मंदिर हे अंतर ३० किलोमीटर आहे. खिंडीतील हनुमान मंदिराच्या अलिकडे एक कालव्यावरचा (कॅनॉल) पूल आहे . तो पूल ओलांडल्यावर डावीकडे वळून कालव्याला समांतर जाणार्या रस्त्याने १० मिनिटे चालत गेल्यावर उजवीकडे गौसिध्द मंदिर (लेणी) कडे जाणारी पायवाट आहे. या वाटेने अर्ध्या तासात लेण्यांपाशी पोहोचता येते. २) कुकटोळी - गिरिलिंग मंदिर (लेणी) मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी मिरजहून २८ किलोमीटर अंतरावरील कुकटोळी गाव गाठावे . गावच्या मागे डोंगर आहे, गावातून डांबरी रस्ता डोंगराच्या पायथ्या पर्यंत जातो. तेथून गिरिलिंग मंदिरापर्यंत कच्चा रस्ता आहे. जीप सारखे वहान या रस्त्यावरुन जाऊ शकते. अन्यथा गाडी डोंगराच्या पायथ्याशी लावून पायवाटेने गिरीलिंग मंदिर (लेण्या) पर्यंत चढत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. कुकटोळीतून (गिरीलिंग मंदिर (लेण्या)) किल्ला चढून गौसिध्द मंदिराकडून उतरणार असल्यास गाडी खिंडीतील हनुमान मंदिरापाशी आणायला सांगावी. कुकटोळी - डोंगरवाडी - कदमवाडी - खिंडीतील हनुमान हे अंतर ९ किलोमीटर आहे. ३) डोंगरवाडी गावातून मिरज ते डोंगरवाडी हे अंतर २७ किलोमीटर आहे. डोंगरवाडीतून कच्चा रस्ता पठारावरुन गौसिध्द मंदिर (लेणी) आणि गिरिलिंग मंदिर (लेणी) येथेपर्यंत गेलेला आहे. जीप सारखे वहान या रस्त्यावरुन जाऊ शकते. | |||||||
| राहाण्याची सोय : | |||||||
| किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही. | |||||||
| जेवणाची सोय : | |||||||
| किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. | |||||||
| पाण्याची सोय : | |||||||
| किल्ल्यावर पिण्याचे पाणी आहे. | |||||||
| जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||||||
| पठारवरुन चालून किल्ला पाहायचा असल्यास गवत सुकल्यावर डिसेंबर ते मे , बेळंकी आणि कुकटोळी गावातून पाहायचा असल्यास वर्षभर जाता येते. | |||||||
| श्रेणी: Medium | आड (Aad) | आमनेर (Aamner) | अचला (Achala) | अहिवंत (Ahivant) | 
| अजिंक्यतारा (Ajinkyatara) | अजमेरा (Ajmera) | आजोबा (आजा पर्वत) (Ajoba) | अंबागड (Ambagad) | 
| अंजनेरी (Anjaneri) | अंकाई(अणकाई) (Ankai) | अंतुर (Antoor) | अर्जूनगड (Arjungad) | 
| आसावा (Asawa) | अशेरीगड (Asherigad) | अवचितगड (Avchitgad) | बहुला (Bahula) | 
| बळवंतगड (Balwantgad) | बाणकोट (Bankot) | बारवाई (Barvai) | भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara)) | 
| भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale)) | भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje)) | भामेर (Bhamer) | भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg) | 
| भास्करगड (बसगड) (Bhaskargad) | भवानीगड (Bhavanigad) | भिवागड (Bhivagad) | भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad)) | 
| भोरगिरी (Bhorgiri) | भोरवाडीचा किल्ला (Bhorwadi Fort) | भुदरगड (Bhudargad) | भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad)) | 
| भूपतगड (Bhupatgad) | भूषणगड (Bhushangad) | बिरवाडी (Birwadi) | बिष्टा (Bishta) | 
| खोलगड (कोबा द राम ) (Cabo de Rama (Kholgad)) | चांभारगड (Chambhargad) | चंदन वंदन (Chandan-vandan) | चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad)) | 
| चौगावचा किल्ला (Chaugaon Fort) | चौल्हेर (Chaulher) | चावंड (Chavand) | दातेगड (Dategad) | 
| देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad)) | डेरमाळ (Dermal) | देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad)) | धाकोबा (Dhakoba) | 
| धोडप (Dhodap) | द्रोणागिरी (Dronagiri) | दुंधा किल्ला (Dundha) | दुर्ग (Durg) | 
| फिरंगकोट (Firang kot) | गगनगड (Gagangad) | किल्ले गाळणा (Galna) | गंभीरगड (Gambhirgad) | 
| गंधर्वगड (Gandharvgad) | घनगड (Ghangad) | घारापुरी (Gharapuri) | घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) | 
| घोसाळगड (Ghosalgad) | घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara)) | गोपाळगड (Gopalgad) | गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad)) | 
| गोवळकोट (Gowalkot) | गुणवंतगड (Gunawantgad) | हडसर (Hadsar) | हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri)) | 
| हनुमंतगड (Hanumantgad(Sindhudurg)) | हरगड (Hargad) | हरिहर (Harihar) | हरिश्चंद्रगड (Harishchandragad) | 
| हातगड (Hatgad) | हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri) | होन्नुर किल्ला (Honnur Fort) | इंद्रगड (Indragad) | 
| इंद्राई (Indrai) | ईरशाळ (Irshalgad) | जंगली जयगड (Jangli Jaigad) | जंजाळा (वैशागड) (Janjala (Vaishagad)) | 
| जवळ्या (Jawlya) | जीवधन (Jivdhan) | जुना पन्हाळा किल्ला (Juna Panhala) | कैलासगड (Kailasgad) | 
| कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad)) | काळदुर्ग (Kaldurg) | कळसूबाई (Kalsubai) | कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri)) | 
| कमळगड (Kamalgad) | कामणदुर्ग (Kamandurg) | कनकदुर्ग (Kanakdurg) | कांचन (Kanchan) | 
| कण्हेरगड (Kanhergad(Nashik)) | कंक्राळा (Kankrala) | कर्हा (Karha) | कर्नाळा (Karnala) | 
| कात्रा (Katra) | कावनई (Kavnai) | केंजळगड (Kenjalgad) | खांदेरी (Khanderi) | 
| कोहोजगड (Kohoj) | कोकणदिवा (Kokandiva) | कोळदुर्ग (Koldurg) | कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) | 
| कोंढवी (Kondhavi) | कोरीगड (कोराईगड) (Korigad) | कोर्लई (Korlai) | कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) | 
| कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad) | लळिंग (Laling) | लोहगड (Lohgad) | मच्छिंद्रगड (Machindragad) | 
| मदगड (Madgad) | मधुमकरंदगड (Madhu makarandgad) | महिमानगड (Mahimangad) | महिमतगड (Mahimatgad) | 
| महिपालगड (Mahipalgad) | महिपतगड (Mahipatgad) | माहुली (Mahuli) | माहूर (Mahurgad) | 
| मैलगड (महलगड) (Mailgad (Mahalgad)) | मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) | मंडणगड (Mandangad) | मानगड (Mangad) | 
| मंगळगड (Mangalgad) | मांगी - तुंगी (Mangi-Tungi) | माणिकदूर्ग (Manikdurg) | माणिकगड (Manikgad) | 
| मणिकपूंज (Manikpunj) | मांजरसुभा (Manjarsubha Fort) | मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad) | मार्कंड्या (Markandeya) | 
| मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) | मोहनगड (Mohangad) | मोरागड (Moragad) | मोरधन (Mordhan) | 
| मृगगड (Mrugagad) | मुडागड (Mudagad) | मुल्हेर (Mulher) | नाणेघाट (Naneghat) | 
| नारायणगड (Narayangad) | निमगिरी (Nimgiri) | पाबरगड (Pabargad) | पद्मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa)) | 
| पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan)) | पांडवगड (Pandavgad) | पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) | पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort) | 
| पारगड (Pargad) | पारनेरा किल्ला (Parnera Fort) | पर्वतगड (Parvatgad) | पाटेश्वर (Pateshwar) | 
| पट्टागड (Patta) | पावनगड (Pawangad) | पेब (विकटगड) (Peb) | पेडका (Pedka) | 
| पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad)) | पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad)) | पिंपळा (Pimpla) | पिसोळ किल्ला (Pisol) | 
| प्रबळगड (Prabalgad) | प्रेमगिरी (Premgiri) | पुरंदर (Purandar) | रायगड (Raigad) | 
| रायकोट (Raikot) | रायरेश्वर (Raireshwar) | राजदेहेर (ढेरी) (Rajdeher) | राजधेर (Rajdher) | 
| राजगड (Rajgad) | राजमाची (Rajmachi) | रामदरणे (Ramdarne) | रामगड (Ramgad) | 
| रामशेज (Ramshej) | रामटेक (Ramtek) | रांगणा (Rangana) | रांजणगिरी (Ranjangiri) | 
| रसाळगड (Rasalgad) | रतनगड (Ratangad) | रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg)) | रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg) | 
| रोहीडा (Rohida) | रोहिलगड (Rohilgad) | सडा किल्ला (Sada Fort) | सदानंदगड (Sadanandgad) | 
| सदाशिवगड (Sadashivgad) | सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) | सज्जनगड (Sajjangad) | साल्हेर (Salher) | 
| सालोटा (Salota) | सामानगड (Samangad) | संतोषगड (Santoshgad) | सप्तश्रुंगी (Saptashrungi) | 
| सरसगड (Sarasgad) | सेगवा किल्ला (Segawa) | शिवगड (Shivgad) | शिवनेरी (Shivneri) | 
| सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan)) | सिंदोळा (Sindola) | सिंहगड (Sinhagad) | सोंडाई (Sondai) | 
| सोनगड (Songad) | सोनगिर (धुळे) (Songir (Dhule)) | सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat)) | सुमारगड (Sumargad) | 
| सुरगड (Surgad) | सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) | सूवर्णदूर्ग (Suvarnadurg) | ताहुली (Tahuli) | 
| टकमक गड (Takmak) | तळगड (Talgad) | तांदुळवाडी (Tandulwadi) | टंकाई (टणकाई) (Tankai) | 
| थाळनेर (Thalner) | तिकोना (Tikona) | तोरणा (Torna) | त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad) | 
| त्रिंगलवाडी (Tringalwadi) | तुंग (Tung) | तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat)) | उंबरखिंड (Umberkhind) | 
| उंदेरी (Underi) | वैराटगड (Vairatgad) | वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur)) | वर्धनगड (Vardhangad) | 
| वारुगड (Varugad) | वसंतगड (Vasantgad) | वासोटा (Vasota) | वेताळगड (Vetalgad) | 
| वेताळवाडी गड (Vetalwadi gad) | विजयगड (Vijaygad) | विलासगड (Vilasgad (Mallikarjun)) | विसापूर (Visapur) | 
| विशाळगड (Vishalgad) | वाघेरा किल्ला (Waghera) | ||