मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
तोरणा (Torna) | किल्ल्याची ऊंची :  1400 | ||||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||||
जिल्हा : पुणे | श्रेणी : मध्यम | ||||
शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले, त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव "तोरणा" पडले. महाराजांनी गडाची पाहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून असलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत. तर दुसर्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. |
|||||
|
|||||
इतिहास : | |||||
तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन येथे शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले. गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला, त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घुण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये तोरणा महारजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. |
|||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||
वेल्हे गावातून आपला किल्ल्यावर जातांना प्रथम बिनी दरवाजा लागतो. या प्रवेशव्दारातून किल्ल्यावर चढत गेल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा कोठी दरवाजा लागतो. या दरवाजा जवळ तोरणजाई देवीचे मंदिर आहे. त्याच्या पुढे दोन तलाव पाहायला मिळतात. या भागात घरांची उध्वस्त जोती पाहायला मिळतात. हे सर्व पाहून किल्ल्याच्या माथ्यावर गेल्यावर समोरच मेंगाई देवीचे मंदिर आहे. त्याच्या जवळच तोरणेश्वराचे मंदिर आहे. या भागात घरांची उध्वस्त जोती पाहायला मिळतात. मंदिरांच्या मागच्या बाजूला खालच्या पातळीवर पाण्याची दोन टाकी आहेत. तोरणा किल्ल्याच्या माथ्यावर आल्यावर आपल्याला किल्ल्याच्या झुंजार , बुधला आणि विशाळा या माच्यांवर जाता येते. मेंगाई मंदिराच्या पूर्वेला आणि पश्चिमेला गड माथा पसरलेला पाहायला मिळतो. मेंगाई मंदिराच्या पूर्वेला असलेल्या झुंजार माचीकडे (बुरुजाकडे) जातांना वाटेत घरांची उध्वस्त जोती पाहायला मिळतात. पुढे चालत गेल्यावर किल्ल्याच्या पश्चिमे टोकावर असलेला झुंजार बुरुज पाहायला मिळतो. त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. बुरुजाच्या जवळ असलेल्या तटबंदीत गुप्त दरवाजा आहे. या दरवाजातून झुंजार माचीवर जाता येते. तोरणा किल्ल्याची झुंझार माची पाहून पुन्हा मेंगाई देवीच्या मंदिर जवळ येऊन पूर्वेकडे चालायला सुरुवात करावी हीच वाट पुढे राजगड किल्ल्याकडे जाते. या वाटेवर प्रथम कोकण दरवाजा लागतो. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर पुढे चालत गेल्यावर हत्तीमाळ लागतो. या माळाच्या टोकावर हत्तीमाळ बुरुज आहे. बुरुजापासून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला पाण्याची टाकी पाहायला मिळतात. टाकी पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला भगत दरवाजा आहे. या वाटेने पुढे पूर्वेकडे चालत गेल्यावर वकंजाई दरवाजा आहे. या ठिकाणी दोन वाटा फ़ुटतात डावीकडे जाणारी वाट राजगड किल्ल्याकडे जाते. या वाटेवर एक पाण्याचे टाके आहे. तर सरळ जाणारी वाट बुधला माचीकडे जाते. बुधला माची पाहून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला चित्ता दरवाजा आहे. हा दरवाजा पाहून पुढे चालत गेल्यावर विशाळा माची आहे. या माचीच्या पुढे एक पाण्याचे टाक आहे . त्या पुढे किल्ल्याच्या पूर्व टोकाला बुरुज आहे. हा फ्र्व टोका वरील बुरुज पाहून मेंगाई मंदिरापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. | |||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||
पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. वेल्हेला जाण्यासाठी मुंबई - बंगलोर हायवे (NH-4) वरील पुण्या पुढील नसरापूर फाटा गाठावा. पुण्या पासून नसरापूर ३६ किमी वर आहे. नसरापूर वरून वेल्हे गावात जाण्यासाठी जीप मिळतात. नसरापूर ते वेल्हे हे अंतर २९ किमी आहे. | |||||
राहाण्याची सोय : | |||||
गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. | |||||
जेवणाची सोय : | |||||
जेवणाची सोय आपण स्वत:च करावी. | |||||
पाण्याची सोय : | |||||
मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारामही पाण्याचे टाके आहे. | |||||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||||
१) वेल्हेमार्गे अडीच तास लागतात. २) राजगड - तोरणा मार्गे ६ ते ८ तास लागतात. |
Depot | Village | From Depot | From Village | km |
Swargate | Velhe | 6:15, 7:30, 8:00, 8:30, 9:30, 10:00, 11:15, 11:45, | - | 10 |
श्रेणी: Medium | आड (Aad) | आमनेर (Aamner) | अचला (Achala) | अहिवंत (Ahivant) |
अजिंक्यतारा (Ajinkyatara) | अजमेरा (Ajmera) | आजोबा (आजा पर्वत) (Ajoba) | अंबागड (Ambagad) |
अंजनेरी (Anjaneri) | अंकाई(अणकाई) (Ankai) | अंतुर (Antoor) | अर्जूनगड (Arjungad) |
आसावा (Asawa) | अशेरीगड (Asherigad) | अवचितगड (Avchitgad) | बहुला (Bahula) |
बळवंतगड (Balwantgad) | बाणकोट (Bankot) | बारवाई (Barvai) | भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara)) |
भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale)) | भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje)) | भामेर (Bhamer) | भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg) |
भास्करगड (बसगड) (Bhaskargad) | भवानीगड (Bhavanigad) | भिवागड (Bhivagad) | भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad)) |
भोरगिरी (Bhorgiri) | भोरवाडीचा किल्ला (Bhorwadi Fort) | भुदरगड (Bhudargad) | भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad)) |
भूपतगड (Bhupatgad) | भूषणगड (Bhushangad) | बिरवाडी (Birwadi) | बिष्टा (Bishta) |
चांभारगड (Chambhargad) | चंदन वंदन (Chandan-vandan) | चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad)) | चौगावचा किल्ला (Chaugaon Fort) |
चौल्हेर (Chaulher) | चावंड (Chavand) | दातेगड (Dategad) | देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad)) |
डेरमाळ (Dermal) | देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad)) | धाकोबा (Dhakoba) | धोडप (Dhodap) |
द्रोणागिरी (Dronagiri) | दुंधा किल्ला (Dundha) | दुर्ग (Durg) | गगनगड (Gagangad) |
किल्ले गाळणा (Galna) | गंभीरगड (Gambhirgad) | गंधर्वगड (Gandharvgad) | घनगड (Ghangad) |
घारापुरी (Gharapuri) | घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) | घोसाळगड (Ghosalgad) | घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara)) |
गोपाळगड (Gopalgad) | गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad)) | गोवळकोट (Gowalkot) | गुणवंतगड (Gunawantgad) |
हडसर (Hadsar) | हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri)) | हनुमंतगड (Hanumantgad(Sindhudurg)) | हरगड (Hargad) |
हरिहर (Harihar) | हरिश्चंद्रगड (Harishchandragad) | हातगड (Hatgad) | हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri) |
होन्नुर किल्ला (Honnur Fort) | इंद्रगड (Indragad) | इंद्राई (Indrai) | ईरशाळ (Irshalgad) |
जंगली जयगड (Jangli Jaigad) | जंजाळा (वैशागड) (Janjala (Vaishagad)) | जवळ्या (Jawlya) | जीवधन (Jivdhan) |
कैलासगड (Kailasgad) | कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad)) | काळदुर्ग (Kaldurg) | कळसूबाई (Kalsubai) |
कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri)) | कमळगड (Kamalgad) | कामणदुर्ग (Kamandurg) | कनकदुर्ग (Kanakdurg) |
कांचन (Kanchan) | कण्हेरगड (Kanhergad(Nashik)) | कंक्राळा (Kankrala) | कर्हा (Karha) |
कर्नाळा (Karnala) | कात्रा (Katra) | कावनई (Kavnai) | केंजळगड (Kenjalgad) |
खांदेरी (Khanderi) | कोहोजगड (Kohoj) | कोकणदिवा (Kokandiva) | कोळदुर्ग (Koldurg) |
कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) | कोंढवी (Kondhavi) | कोरीगड (कोराईगड) (Korigad) | कोर्लई (Korlai) |
कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) | कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad) | लळिंग (Laling) | लोहगड (Lohgad) |
मच्छिंद्रगड (Machindragad) | मधुमकरंदगड (Madhu makarandgad) | महिमानगड (Mahimangad) | महिमतगड (Mahimatgad) |
महिपालगड (Mahipalgad) | महिपतगड (Mahipatgad) | माहुली (Mahuli) | माहूर (Mahurgad) |
मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) | मंडणगड (Mandangad) | मानगड (Mangad) | मंगळगड (Mangalgad) |
मांगी - तुंगी (Mangi-Tungi) | माणिकदूर्ग (Manikdurg) | माणिकगड (Manikgad) | मणिकपूंज (Manikpunj) |
मांजरसुभा (Manjarsubha Fort) | मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad) | मार्कंड्या (Markandeya) | मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) |
मोहनगड (Mohangad) | मोरागड (Moragad) | मोरधन (Mordhan) | मृगगड (Mrugagad) |
मुडागड (Mudagad) | मुल्हेर (Mulher) | नाणेघाट (Naneghat) | नारायणगड (Narayangad) |
निमगिरी (Nimgiri) | पाबरगड (Pabargad) | पद्मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa)) | पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan)) |
पांडवगड (Pandavgad) | पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) | पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort) | पारगड (Pargad) |
पारनेरा किल्ला (Parnera Fort) | पर्वतगड (Parvatgad) | पाटेश्वर (Pateshwar) | पट्टागड (Patta) |
पेब (विकटगड) (Peb) | पेडका (Pedka) | पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad)) | पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad)) |
पिंपळा (Pimpla) | पिसोळ किल्ला (Pisol) | प्रबळगड (Prabalgad) | प्रेमगिरी (Premgiri) |
पुरंदर (Purandar) | रायगड (Raigad) | रायकोट (Raikot) | रायरेश्वर (Raireshwar) |
राजदेहेर (ढेरी) (Rajdeher) | राजधेर (Rajdher) | राजगड (Rajgad) | राजमाची (Rajmachi) |
रामदरणे (Ramdarne) | रामगड (Ramgad) | रामशेज (Ramshej) | रामटेक (Ramtek) |
रांगणा (Rangana) | रांजणगिरी (Ranjangiri) | रसाळगड (Rasalgad) | रतनगड (Ratangad) |
रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg)) | रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg) | रोहीडा (Rohida) | रोहिलगड (Rohilgad) |
सडा किल्ला (Sada Fort) | सदानंदगड (Sadanandgad) | सदाशिवगड (Sadashivgad) | सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) |
सज्जनगड (Sajjangad) | साल्हेर (Salher) | सालोटा (Salota) | सामानगड (Samangad) |
संतोषगड (Santoshgad) | सप्तश्रुंगी (Saptashrungi) | सरसगड (Sarasgad) | सेगवा किल्ला (Segawa) |
शिवगड (Shivgad) | शिवनेरी (Shivneri) | सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan)) | सिंदोळा (Sindola) |
सिंहगड (Sinhagad) | सोंडाई (Sondai) | सोनगड (Songad) | सोनगिर (धुळे) (Songir (Dhule)) |
सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat)) | सुमारगड (Sumargad) | सुरगड (Surgad) | सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) |
सूवर्णदूर्ग (Suvarnadurg) | ताहुली (Tahuli) | टकमक गड (Takmak) | तळगड (Talgad) |
तांदुळवाडी (Tandulwadi) | टंकाई (टणकाई) (Tankai) | थाळनेर (Thalner) | तिकोना (Tikona) |
तोरणा (Torna) | त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad) | त्रिंगलवाडी (Tringalwadi) | तुंग (Tung) |
तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat)) | उंबरखिंड (Umberkhind) | उंदेरी (Underi) | वैराटगड (Vairatgad) |
वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur)) | वर्धनगड (Vardhangad) | वारुगड (Varugad) | वसंतगड (Vasantgad) |
वासोटा (Vasota) | वेताळगड (Vetalgad) | वेताळवाडी गड (Vetalwadi gad) | विजयगड (Vijaygad) |
विलासगड (Vilasgad (Mallikarjun)) | विसापूर (Visapur) | विशाळगड (Vishalgad) | वाघेरा किल्ला (Waghera) |