मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
विजयगड (Vijaygad) | किल्ल्याची ऊंची :  400 | ||||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||||
जिल्हा : रत्नागिरी | श्रेणी : मध्यम | ||||
जयगड खाडी जेथे समुद्राला मिळते त्या ठिकाणी दोन किल्ले बांधलेले आहेत. खाडीच्या उत्तर तीरावर असलेला विजयगड किल्ला आणि खाडीच्या दक्षिण तीरावर असलेला जयगड किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभे आहेत. जयगड खाडी मार्गे चालणार्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. रत्नागिरी किंवा गुहागर येथून हे दोन्ही किल्ले एका दिवसात पाहून होतात. |
|||||
|
|||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||
हेदवीकडून तवसाळ गावाकडे जातांना तवसाळ गावाच्या अगोदर सडा लागतो . या सड्याच्या टोकाला (तवसाळ जेट्टीला जाण्यासाठी घाट उतरायला सुरुवात केल्यावर) उजव्या बाजूला विजयगड किल्ल्याचा भव्य बुरुज दिसतो. यावर भगवे झेंडे लावलेले आहेत. रस्त्या लगतच्या भव्या बुरुजावर जाण्यासाठी पायर्या आहेत. बुरुजावर चढून बुरुज पाहून घ्यावा . बुरुजावरुन जयगड खाडी, समुद्र आणि जयगडचा किल्ला असा मोठा प्रदेश दॄष्टीक्षेपात येतो. बुरुज आणि किल्ल्याची तटबंदी जांभ्या दगडात बांधलेली आहे. बुरुजावरुन खाली उतरुन बुरुज उजव्या बाजूला ठेऊन वळसा घालून पुढे गेल्यावर कोसळलेल्या तटबंदीतून किल्ल्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच उध्वस्त प्रवेशव्दाराचे अवशेष दिसतात. प्रवेशव्दारजवळ देवड्या आहेत. पुढे उध्वस्त वास्तूंचे प्रशस्त चौथरे दिसतात. चौथरे पाहून पुढे बुरुजाला लागून उतरत गेलेल्या तटबंदीच्या दिशेने जाऊन तटबंदीच्या बाजूने खाली उतरल्यावर समोर दगडात कोरलेली वैशिष्ट्यपूर्ण विहिर आहे. विहिरीच्या पुढे डाव्या बाजूला उध्वस्त वास्तूंच्या भिंती पाहायला मिळतात. या वास्तूंमधून किल्याच्या डाव्या बाजूच्या तटबंदी पर्यंत जाता येते. येथून खालच्या बाजूला तवसाळ बीच दिसतो. आल्या मार्गाने पुन्हा विहिरीपाशी येउन विहिरीला वळसा घालून पुढे गेल्यावर आपण तटबंदीवर पोहोचतो. किल्ल्याला दोन बाजूला उतरत जाणार्या तटबंदी आहेत तशाच ठराविक अंतरावर आडव्या तटबंद्या आहेत. यशवंतगड (नाटे) किल्ल्यावरही अशा प्रकारची रचना आढळून येते. तटबंदी वरुन डाव्या बाजूला चालत गेल्यावर आपण थोड्या वेळापूर्वी ज्या तटबंदीवरुन तवसाळ किनारा पाहिला होता त्याच्या बाहेरच्या बाजूला येतो. येथे तटबंदीला लागून चौकोनी बांधीव तलावासारखी रचना केलेली आहे. कदाचित यात पाणी साठवत असावेत. येथून आल्या मार्गाने तटबंदीवर यावे. तटबंदीतून खाली दाट झाडी दिसते. या झाडीत एक फ़ट आहे. त्यातून एक निसरडी पायवाट खाली उतरते. यावाटेने थोडे अंतर गेल्यावर झाडी दाट होत जाते. सध्या तरी पुढे मार्ग नसल्याने आल्या मार्गाने पुन्हा किल्ला चढून बुरुजापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. किल्ल्याचा संपूर्ण डोंगर पहाण्यासाठी तवसाळ घाट उतरल्यावर उजव्या बाजूला एक रस्ता सुरुच्या बनातून तवसाळ किनार्यावर जातो. या बनातून किनार्यावर आल्यावर उजव्या बाजूला विजयगड किल्ल्याचा झाडी भरला डोंगर दिसतो. ओहोटी असल्यास या डोंगरापर्यंत जाता येते. डोंगराचा खालचा भाग कातळाचा आहे. समुद्राच्या लाटांनी तो कोरुन काढला आहे. हा सलग सरळ कातळकडा डोंगराच्या पाव उंची पर्यंत आहे. त्यावर जिथे आवश्यकता आहे तिथे तटबंदी बांधलेली आढळते. समुद्राकडून डोंगराला अर्धगोलाकार फ़ेरी मारल्यावर कातळ कड्यामुळे किनार्यावरुन किल्ल्यावर जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याचे आढळले. किल्ला पाहाण्यासाठी पाऊण ते एक तास लागतो. | |||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||
१) मुंबई - चिपळूण - शृंगारतळी - तवसाळ यामार्गाने तवसाळ गाठावे. तवसाळ जेट्टीकडे जाणार्या रस्त्यावर घाट उतरायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला विजयगड किल्ल्याचा भव्य बुरुज दिसतो. येथूनच सध्या किल्ल्यात जाण्याचा मार्ग आहे. २) गुहागर मार्गे :- गुहागर जवळ गोपाळगड (अंजनवेलचा किल्ला) आहे. तो पाहून गुहागर- वेळणेश्वर - हेदवी मार्गे तवसाळ (अंतर ४८ किलो्मीटर) गाठाता येते. गुहागर ते नरवण दर तासाला एसटी बस आहेत. या बसने नरवण पर्यंत जाऊन पुढे रिक्षाने तवसाळ जेट्टीकडे जाण्याच्या रस्त्यावर (अंतर ६ किलोमीटर) रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या विजयगडच्या बुरुजापर्यंत जाता येते. ३) रत्नागिरी मार्गे :- रत्नागिरी- गणपतीपुळे मार्गे जयगड अंतर ५३ किलोमिटर आहे. रत्नागिरीहून खाजगी वाहानाने किंवा एसटीने जयगड किल्ल्यावर जाता येते. जयगड किल्ला पाहून बोटीने पलिकडील काठावर असलेले तवसाळ गाठावे. तवसाळ जेट्टीपासून १ किलोमीटरवर विजयगड किल्ल्याचा भव्य बुरुज रस्त्यालगतच आहे. खाजगी वहान असल्यास रत्नागिरीहून जयगड किल्ला पाहून गाडी बोटीने खाडी पलिकडे जाता येते. तेथुन विजयगड किल्ला पाहून गुहागर मार्गे अंजनवेल (गोपाळगड) किल्ला पाहात येतो. मुक्काम गुहागर, वेळणेश्वर किंवा चिपळूण येथे करता येईल. | |||||
राहाण्याची सोय : | |||||
राहाण्याची सोय वेळणेश्वर, हेदवी येथे आहे. | |||||
जेवणाची सोय : | |||||
जेवणाची सोय वेळणेश्वर, हेदवी येथे आहे. | |||||
पाण्याची सोय : | |||||
किल्ल्यावर पाणी नाही. | |||||
जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||||
नोव्हेंबर ते मे |
श्रेणी: Medium | आड (Aad) | आमनेर (Aamner) | अचला (Achala) | अहिवंत (Ahivant) |
अजिंक्यतारा (Ajinkyatara) | अजमेरा (Ajmera) | आजोबा (आजा पर्वत) (Ajoba) | अंबागड (Ambagad) |
अंजनेरी (Anjaneri) | अंकाई(अणकाई) (Ankai) | अंतुर (Antoor) | अर्जूनगड (Arjungad) |
आसावा (Asawa) | अशेरीगड (Asherigad) | अवचितगड (Avchitgad) | बहुला (Bahula) |
बळवंतगड (Balwantgad) | बाणकोट (Bankot) | बारवाई (Barvai) | भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara)) |
भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale)) | भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje)) | भामेर (Bhamer) | भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg) |
भास्करगड (बसगड) (Bhaskargad) | भवानीगड (Bhavanigad) | भिवागड (Bhivagad) | भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad)) |
भोरगिरी (Bhorgiri) | भोरवाडीचा किल्ला (Bhorwadi Fort) | भुदरगड (Bhudargad) | भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad)) |
भूपतगड (Bhupatgad) | भूषणगड (Bhushangad) | बिरवाडी (Birwadi) | बिष्टा (Bishta) |
चांभारगड (Chambhargad) | चंदन वंदन (Chandan-vandan) | चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad)) | चौगावचा किल्ला (Chaugaon Fort) |
चौल्हेर (Chaulher) | चावंड (Chavand) | दातेगड (Dategad) | देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad)) |
डेरमाळ (Dermal) | देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad)) | धाकोबा (Dhakoba) | धोडप (Dhodap) |
द्रोणागिरी (Dronagiri) | दुंधा किल्ला (Dundha) | दुर्ग (Durg) | फिरंगकोट (Firang kot) |
गगनगड (Gagangad) | किल्ले गाळणा (Galna) | गंभीरगड (Gambhirgad) | गंधर्वगड (Gandharvgad) |
घनगड (Ghangad) | घारापुरी (Gharapuri) | घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) | घोसाळगड (Ghosalgad) |
घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara)) | गोपाळगड (Gopalgad) | गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad)) | गोवळकोट (Gowalkot) |
गुणवंतगड (Gunawantgad) | हडसर (Hadsar) | हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri)) | हनुमंतगड (Hanumantgad(Sindhudurg)) |
हरगड (Hargad) | हरिहर (Harihar) | हरिश्चंद्रगड (Harishchandragad) | हातगड (Hatgad) |
हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri) | होन्नुर किल्ला (Honnur Fort) | इंद्रगड (Indragad) | इंद्राई (Indrai) |
ईरशाळ (Irshalgad) | जंगली जयगड (Jangli Jaigad) | जंजाळा (वैशागड) (Janjala (Vaishagad)) | जवळ्या (Jawlya) |
जीवधन (Jivdhan) | जुना पन्हाळा किल्ला (Juna Panhala) | कैलासगड (Kailasgad) | कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad)) |
काळदुर्ग (Kaldurg) | कळसूबाई (Kalsubai) | कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri)) | कमळगड (Kamalgad) |
कामणदुर्ग (Kamandurg) | कनकदुर्ग (Kanakdurg) | कांचन (Kanchan) | कण्हेरगड (Kanhergad(Nashik)) |
कंक्राळा (Kankrala) | कर्हा (Karha) | कर्नाळा (Karnala) | कात्रा (Katra) |
कावनई (Kavnai) | केंजळगड (Kenjalgad) | खांदेरी (Khanderi) | कोहोजगड (Kohoj) |
कोकणदिवा (Kokandiva) | कोळदुर्ग (Koldurg) | कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) | कोंढवी (Kondhavi) |
कोरीगड (कोराईगड) (Korigad) | कोर्लई (Korlai) | कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) | कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad) |
लळिंग (Laling) | लोहगड (Lohgad) | मच्छिंद्रगड (Machindragad) | मदगड (Madgad) |
मधुमकरंदगड (Madhu makarandgad) | महिमानगड (Mahimangad) | महिमतगड (Mahimatgad) | महिपालगड (Mahipalgad) |
महिपतगड (Mahipatgad) | माहुली (Mahuli) | माहूर (Mahurgad) | मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) |
मंडणगड (Mandangad) | मानगड (Mangad) | मंगळगड (Mangalgad) | मांगी - तुंगी (Mangi-Tungi) |
माणिकदूर्ग (Manikdurg) | माणिकगड (Manikgad) | मणिकपूंज (Manikpunj) | मांजरसुभा (Manjarsubha Fort) |
मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad) | मार्कंड्या (Markandeya) | मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) | मोहनगड (Mohangad) |
मोरागड (Moragad) | मोरधन (Mordhan) | मृगगड (Mrugagad) | मुडागड (Mudagad) |
मुल्हेर (Mulher) | नाणेघाट (Naneghat) | नारायणगड (Narayangad) | निमगिरी (Nimgiri) |
पाबरगड (Pabargad) | पद्मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa)) | पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan)) | पांडवगड (Pandavgad) |
पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) | पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort) | पारगड (Pargad) | पारनेरा किल्ला (Parnera Fort) |
पर्वतगड (Parvatgad) | पाटेश्वर (Pateshwar) | पट्टागड (Patta) | पावनगड (Pawangad) |
पेब (विकटगड) (Peb) | पेडका (Pedka) | पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad)) | पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad)) |
पिंपळा (Pimpla) | पिसोळ किल्ला (Pisol) | प्रबळगड (Prabalgad) | प्रेमगिरी (Premgiri) |
पुरंदर (Purandar) | रायगड (Raigad) | रायकोट (Raikot) | रायरेश्वर (Raireshwar) |
राजदेहेर (ढेरी) (Rajdeher) | राजधेर (Rajdher) | राजगड (Rajgad) | राजमाची (Rajmachi) |
रामदरणे (Ramdarne) | रामगड (Ramgad) | रामशेज (Ramshej) | रामटेक (Ramtek) |
रांगणा (Rangana) | रांजणगिरी (Ranjangiri) | रसाळगड (Rasalgad) | रतनगड (Ratangad) |
रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg)) | रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg) | रोहीडा (Rohida) | रोहिलगड (Rohilgad) |
सडा किल्ला (Sada Fort) | सदानंदगड (Sadanandgad) | सदाशिवगड (Sadashivgad) | सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) |
सज्जनगड (Sajjangad) | साल्हेर (Salher) | सालोटा (Salota) | सामानगड (Samangad) |
संतोषगड (Santoshgad) | सप्तश्रुंगी (Saptashrungi) | सरसगड (Sarasgad) | सेगवा किल्ला (Segawa) |
शिवगड (Shivgad) | शिवनेरी (Shivneri) | सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan)) | सिंदोळा (Sindola) |
सिंहगड (Sinhagad) | सोंडाई (Sondai) | सोनगड (Songad) | सोनगिर (धुळे) (Songir (Dhule)) |
सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat)) | सुमारगड (Sumargad) | सुरगड (Surgad) | सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort)) |
सूवर्णदूर्ग (Suvarnadurg) | ताहुली (Tahuli) | टकमक गड (Takmak) | तळगड (Talgad) |
तांदुळवाडी (Tandulwadi) | टंकाई (टणकाई) (Tankai) | थाळनेर (Thalner) | तिकोना (Tikona) |
तोरणा (Torna) | त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad) | त्रिंगलवाडी (Tringalwadi) | तुंग (Tung) |
तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat)) | उंबरखिंड (Umberkhind) | उंदेरी (Underi) | वैराटगड (Vairatgad) |
वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur)) | वर्धनगड (Vardhangad) | वारुगड (Varugad) | वसंतगड (Vasantgad) |
वासोटा (Vasota) | वेताळगड (Vetalgad) | वेताळवाडी गड (Vetalwadi gad) | विजयगड (Vijaygad) |
विलासगड (Vilasgad (Mallikarjun)) | विसापूर (Visapur) | विशाळगड (Vishalgad) | वाघेरा किल्ला (Waghera) |