| मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
| सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug)) | किल्ल्याची ऊंची :  0 | ||
| किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||
| जिल्हा : रायगड | श्रेणी : सोपी | ||
| अलिबागच्या समुद्रात कुलाबा व सर्जेकोट हे जोडकिल्ले उभे आहेत. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारात मोडतात. हे किल्ले भरतीच्यावेळी चहूबाजूंनी वेढल्यामुळे ‘‘जलदूर्ग‘‘ बनतात, तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडल्यामुळे ‘‘भुईकोट‘‘ बनतात. शिवाजी महाराज आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, ‘‘किल्ल्या जवळ डोंगर(पर्वत) असल्यास तो सुरुंग लावून फोडावा आणि शक्य नसल्यास त्या डोंगरावरही किल्ला बांधावा‘‘. यामुळे मुख्य किल्ल्याला संरक्षण मिळते. अन्यथा शत्रु बाजुच्या मोक्याच्या जागेवर मोर्चे लावून किल्ला जिंकून घेऊ शकतो. आज्ञापत्रातील महाराजांच्या या आज्ञेप्रमाणेच बहुतेक संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्या जवळील खडकावर सर्जेकोट किल्ला बांधला. यापूर्वी १६७९ साली खांदेरी बेटावर किल्ला बांधताना जवळच असलेल्या उंदेरी बेटाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सिद्दीने उंदेरीचा ताबा घेतला व त्यावर किल्ला बांधला व मराठ्यांना कायमची डोकेदुखी झाली. कदाचित ह्या घटनेपासून बोध घेऊन सर्जेकोट व त्याला कुलाबा किल्ल्याशी जोडणारा दगडी सेतू(कॉजवे) संभाजी महाराजांनी बांधला. |
|||
|
|||
| पहाण्याची ठिकाणे : | |||
| हा दुर्ग अतिशय छोटा आहे. २६ मीटर × २७ मीटर आकाराच्या ह्या किल्ल्याला ५ बुरुज व तटबंदी आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार वायव्येकडे असून कुलाबा किल्ल्याकडे तोंड करुन आहे. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी जिने आहेत किल्ल्यातील विहीर बुजलेली व झाडाझुडुपांनी झाकलेली आहे. किल्ल्यात वेताळ मंदिर होते असा उल्लेख आहे. | |||
| पोहोचण्याच्या वाटा : | |||
| मुंबईहून पनवेल, वडखळ मार्गे अलिबागला जावे. अलिबागच्या समुद्रकिनार्यावरुन ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते. ओहोटीच्या वेळा तिथी प्रमाणे बदलतात. | |||
| राहाण्याची सोय : | |||
| गडावर राहण्याची सोय नाही, सोय अलिबाग मध्ये आहे. | |||
| जेवणाची सोय : | |||
| गडावर जेवणाची सोय नाही, सोय अलिबाग मध्ये आहे. | |||
| पाण्याची सोय : | |||
| गडावर पाण्याची सोय नाही, सोय अलिबाग मध्ये आहे. | |||
| सूचना : | |||
| किल्ल्यात जाण्यासाठी सोयीस्कर ओहोटीच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत. तिथी वेळ तिथी वेळ प्रतिपदा ४:०० ते ६:०० अष्टमी ९:०० ते १२:०० द्वितीया ५:०० ते ७:०० नवमी १०:०० ते १२:३० तृतीया ५:३० ते ८:०० दशमी ११:०० ते १३:०० चतुर्थी ६:०० ते ९:०० एकादशी ११:३० ते १४:०० पंचमी ७:०० ते ९:३० द्वादशी १२:०० ते १५:०० षष्टी ८: ०० ते १०:०० त्रयोदशी १३:०० ते १६:०० सप्तमी ८:३० ते ११:०० चर्तुदशी १३:०० ते १६:०० पौर्णिमा / अमावस्या १४:३० ते १७:०० | |||
| जिल्हा Raigad | अवचितगड (Avchitgad) | भीमाशंकर (Bhimashankar) | भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad)) | बिरवाडी (Birwadi) |
| चांभारगड (Chambhargad) | चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat) | चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad)) | कुलाबा किल्ला (Colaba) |
| दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) | ढाक बहिरी (Dhak-Bahiri) | द्रोणागिरी (Dronagiri) | घारापुरी (Gharapuri) |
| घोसाळगड (Ghosalgad) | हिराकोट (Hirakot) | ईरशाळ (Irshalgad) | जंजिरा (Janjira) |
| कर्नाळा (Karnala) | खांदेरी (Khanderi) | खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort)) | कोकणदिवा (Kokandiva) |
| कोंढवी (Kondhavi) | कोर्लई (Korlai) | कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad) | लिंगाणा (Lingana) |
| मदगड (Madgad) | मानगड (Mangad) | मंगळगड (Mangalgad) | माणिकगड (Manikgad) |
| मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) | मृगगड (Mrugagad) | पाचाड कोट (Pachad Fort) | पदरगड (Padargad) |
| पद्मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa)) | पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) | पेब (विकटगड) (Peb) | पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad)) |
| प्रबळगड (Prabalgad) | रायगड (Raigad) | रामदरणे (Ramdarne) | रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg)) |
| रेवदंडा (Revdanda) | सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) | सामराजगड (Samrajgad) | सांकशीचा किल्ला (Sankshi) |
| सरसगड (Sarasgad) | सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug)) | शिवथरघळ (Shivtharghal) | सोंडाई (Sondai) |
| सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat)) | सुधागड (Sudhagad) | सुरगड (Surgad) | तळगड (Talgad) |
| तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat)) | उंदेरी (Underi) | ||