मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

कंक्राळा (Kankrala) किल्ल्याची ऊंची :  2400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: गाळणा टेकड्या
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यात सीमेवर मालेगाव तालुक्यात एक छोटा किल्ला आहे, याचे नाव कंक्राळा किल्ला. कंक्राळा या छोट्याश्या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात असलेली पाण्याची टाकी हे त्याच वैशिष्ट्य आहे. कंक्राळा आणि गाळणा हे दोन किल्ले खाजगी वहान असल्यास एका दिवसात पाहाता येतात.

9 Photos available for this fort
Kankrala
Kankrala
Kankrala
पहाण्याची ठिकाणे :
कंक्राळा गावातून एक रस्ता कंक्राळा किल्ल्याकडे जातो. गावाची वस्ती मागे पडल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला एक तलाव लागतो. तलावाच्या पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूला हिंगलाज मातेचे मंदिर आहे. हे मंदिर मुक्कामास योग्य आहे. मंदिरापासून कच्चा रस्ता किल्ल्याच्या दिशेने जातो. वाटेत दोन घरे आहेत त्या ठिकाणी रस्ता सोडून पायवाट पकडावी. पायवाटेवरुन कंक्राळ्याच्या डोंगरातली खिंड दिसते. पायवाट सोडून शेतातून या खिंडीच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. दहा मिनिटे डोंगर चढल्यावर मध्ये मध्ये दगड व्यवस्थित लावून बनवलेली प्राचीन वाट दिसते. त्या वाटेने अर्धातास चढल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली टाकी दिसतात. याठिकाणी ऐन टाक्यावर कोणीतरी अलिकडेच एका दगडाला पांढरा रंग लावून पीराचे थडग बनवलेले आहे. हा पांढरा रंग दुरवरुनही नजरेस पडतो. या पिरामुळे येथे लोकांचे येणे जाणे वाढले असावे. कारण टाक्यात अगरबत्तीची पाकीटे आणि प्लास्टीक तरंगताना दिसत होते. या टाक्यातील पाणी अजून तरी पिण्यायोग्य आहे. या ठिकाणी बाजूबाजूला दोन पाण्याची टाकी आहेत. त्यांच्या खालच्या बाजूस अजून दोन पाण्याची टाकी आहेत. हे सर्व पाहून परत पायवाटेवर यायचे. पायवाटेने ५ मिनिटे चढून गेल्यावर डाव्या बाजूस बुरुज आणि तटबंदी दिसते, तर उजव्या बाजूस वळल्यावर उध्वस्त प्रवेशव्दार दिसते. या प्रवेशव्दाराची डाव्या बाजूची भिंत अजूनही तग धरुन उभी आहे. त्यावर कोरीवकाम केलेली दगडाची पट्टी आहे.

प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली दोन पाण्याची टाकी आहेत. त्यातील पहिल्या टाक्याच्या आत एक टाके खोदलेल आहे. ही दोन्ही टाकी पाहून टाकी पाहून पायवाटेवर येऊन पुढे चालत गेल्यावर हनुमानाची शेंदुर लावलेली मुर्ती, पिंड आणि नंदी उघड्यावर दगडी कपांऊड मध्ये ठेवलेले पाहायला मिळतात. या ठिकाणाहून दोन्ही बाजूंना पठार आहेत. त्यातील उजव्या बाजूचे पठार मोठे आणि डाव्या बाजूचे पठार लहान आहे. प्रथम उजव्या बाजूच्या पठारावर जावे. या ठिकाणी वाटेत काही घरांचे उध्वस्त चौथरे आहेत. पुढे गेल्यावर कड्याजवळ कातळात खोदलेली ५ टाकी आहेत. टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाक्याच्या पुढे गेल्यावर आपण परत खिंडीच्या वरच्या बाजूला येतो. याठिकाणी खालच्या बाजूस कातळात कोरलेली दोन पाण्याची टाकी आहेत. ती मात्र वरुनच पाहावी लागतात. ही टाकी पाहून आपण परत प्रवेशव्दारापाशी येतो. उजव्या बाजूचे पठार फ़िरायला १० मिनिटे लागतात. प्रवेशव्दाराच्या बाजूने असलेल्या पायवाटेने डाव्या बाजूच्या पठारावर चढून गेल्यावर खिंडीतून दिसणार्‍या बुरुज आणि तटबंदीवर आपण पोहोचतो. या पठारावर उध्वस्त वास्तूंचे काही चौथरे आहेत. ते पाहात - पाहात पठाराला फ़ेरी मारुन प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ल्याचा फेरफटका मारण्यास अर्धा तास पुरतो. कंक्राळ्याहून गाळण्याचा किल्ला दिसतो
पोहोचण्याच्या वाटा :
नाशिक मार्गे मालेगावला यावे. मालेगावहून डोंगराळेकडे जातांना मालेगाव पासून ३० कि.मी अंतरावर करंजगव्हाण नावाचे गाव आहे. या गावा पासून ८ ते १० किमी अंतरावर कंक्राळा गाव आहे. मालेगावहून करंजगव्हाण पर्यंत जाण्यास जीपगाड्या मिळतात. कधी कधी काही गाड्या थेट कंक्राळ्या पर्यंत सुध्दा जातात. कंक्राळा गावातून किल्ल्याचे सुंदर दर्शन होते. कंक्राळा गाव ते किल्ला यामध्ये बरेच अंतर आहे. किल्ल्याचा पायथा गाठण्यासाठी किमान दोन कि.मी पायी तंगडतोड करावी लागते. खाजगी वहानाने थेट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या घरांपर्यंत जाता येते. पायथ्याला फक्त दोन घरांची वस्ती आहे. वस्ती पासून किल्ल्यावर पोहोचण्यास अर्धा तास लागतो. वाट मळलेली असल्याने आणि टाक्याच्या बाजूला फ़ासलेल्या पांढर्‍या रंगामुळे किल्ल्याची वाट चुकणे अशक्य आहे.
राहाण्याची सोय :
कंक्राळा गावा बाहेरील हिंगलाज माता मंदिरात ३० जणांची राहाण्याची सोय होते..
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर प्रवेशव्दाराच्या अगोदर असणार्‍या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
कंक्राळा गावातून अर्धा तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते फ़ेब्रुवारी
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: K
 कैलासगड (Kailasgad)  काकती किल्ला (Kakati Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)  कलाडगड (Kaladgad)
 कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad))  काळदुर्ग (Kaldurg)  कळसूबाई (Kalsubai)  कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri))
 कमळगड (Kamalgad)  कामणदुर्ग (Kamandurg)  कनकदुर्ग (Kanakdurg)  कांचन (Kanchan)
 कंधार (Kandhar)  कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon))  कण्हेरगड (Kanhergad(Nashik))  कंक्राळा (Kankrala)
 कर्‍हा (Karha)  करमाळा (Karmala Fort)  कर्नाळा (Karnala)  कात्रा (Katra)
 कावनई (Kavnai)  केळवे किल्ला (Kelve Fort)  केळवे पाणकोट (Kelve Pankot)  केंजळगड (Kenjalgad)
 खैराई किल्ला (Khairai)  खांदेरी (Khanderi)  खारेपाटण (Kharepatan fort)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))
 कोहोजगड (Kohoj)  कोकणदिवा (Kokandiva)  कोळदुर्ग (Koldurg)  कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi)
 कोंढवी (Kondhavi)  कोरीगड (कोराईगड) (Korigad)  कोर्लई (Korlai)  कोटकामते (Kotkamate)
 कुलंग (Kulang)  कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad))  कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)