मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim)) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : ठाणे श्रेणी : सोपी
मुंबईकरांना सुपरिचित असलेल्या केळवे बीच पासून ४ किमी अंतरावर माहीम गाव आहे. या गावातच महिकावती देवीचे मंदीर आहे. यावरुन या गावाला माहीम नाव पडले. या प्रचिन गावाला लागून तितकाच प्रचिन माहिमचा किल्ला होता. आज याचा फक्त बालेकिल्ला सुस्थितीत आहे.


(Mahim Fort ( Kelve - Mahim))
7 Photos available for this fort
Mahim Fort ( Kelve - Mahim)
इतिहास :
केळवे माहिमचे मुळ नाव मत्स्यमत्‌, त्याचे पुढे झाले महकावती व नंतरच्या काळात माहिम. प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळूकेश्वरापर्यंतच्या (आजची मुंबई) समुद्र किनार्‍यावर आपले राज्य स्थापन करुन त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. त्याच काळात माहिमचा मुळ किल्ला बांधण्यात आला. पुढील काळात सरदार भिमराव याने हा किल्ला ताब्यात घेतला. १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला.

इ.स १५३४ मध्ये पोर्तुगिजांनी हा गड जिंकून घेतला व त्याची डागडूजी करुन त्यास मजबूती आणली. छत्रपती संभाजी महाराजांनी इ.स १६८४ मध्ये माहिमवर हल्ला चढविला होता; पण वेढा देऊन बसण्या इतका वेळ मराठ्यांकडे नसल्यामुळे किल्ला ताब्यात आला नाही.

इ.स १७३७ साली मराठ्यांनी माहिम किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी मराठे व पोर्तुगिज यांच्यात मोठी लढाई झाली. मराठ्यांची संख्या कमी होती, त्यातच रामचंद्रपंत यांच्या हाताला गोळी लागल्यामुळे मराठ्यांनी माघार घेतली त्यात अनेक मराठे ठार झाले.

९ जानेवारी १७३९ रोजी चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, शंकराजीपंत व आठ हजार घोडेस्वार, सहा हजार हशम व १२ तोफांच्या मदतीने माहिमला वेढा घातला. किल्ल्याच्या तटांवर तोफांचा प्रखर मारा करुन त्याला जिकडे तिकडे भगदाडे पाडली. शेवटी २० जानेवारी १७३९ रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. इ.स १८१८ रोजी इंग्रजांनी तो जिंकून घेतला १८६२ पर्यंत येथे ठाण्याच्या जिल्हाधिकार्‍याचा बंगला होता.


पहाण्याची ठिकाणे :
माहिमच्या किल्ल्याच्या पश्चिमेस समुद्र व दक्षिणेस माहिमची खाडी आहे. प्राचिनकाळी समुद्राचे पाणी किल्ल्याच्या तटास भिडत असे त्यावेळी किल्ल्याचा आकार बराच मोठा होता. आता केवळ बालेकिल्ल्याचा भाग शिल्लक आहे.

पूर्वाभिमूख प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर डाव्याबाजूस उध्वस्त वास्तूचे अवशेष असून, उजव्या बाजूस तटामध्ये एक खोली आहे. प्रवेशद्वारासमोर एक सुंदर जिना आहे. या जिन्याकडे जाताना उजव्या हाताला एक कोरडी विहिर आहे. जिन्यावर चढून गेल्यावर आपण फांजीवर पोहोचतो. त्यावरुन किल्ल्याला प्रदक्षिणा मारता येते.जिन्याच्या टोकाला दूसरे प्रवेशद्वार आहे. ते ओलांडून गेल्यावर आपण किल्ल्याच्या मागच्या पचकोनी भागात प्रवेश करतो. या भागात तटबंदीत अनेक झरोके आहेत. त्यांचा उपयोग टेहाळणीसाठी व तोफा ठेवण्यासाठी केला जात असे. किल्ल्याच्या बाहेर भवानी मंदिर आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
केळवे - पालघर रस्त्यावर, केळवे गावापासून ४ किमीवर माहिम आहे. माहिमच्या सरकारी दवाखान्याच्या मागे माहिमचा किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही, पण केळवे गावात होऊ शकते.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पाण्याची सोय नाही
सूचना :
१) भवानगड(१५ किमी), दांडा किल्ला, फुटका बुरुज, कस्टम किल्ला (१५किमी), केळवे पाणकोट (१५ किमी) केळवे भुईकोट (३ किमी) माहिमचा किल्ला व (५ किमी) शिरगावचा किल्ला हे सर्व किल्ले एका दिवसात पाहून होतात. परंतु यासाठी समुद्राच्या भरती ओहोटीची वेळ माहित असणे फार महत्वाचे आहे. कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पहाता येतो. ओहोटीची वेळ पाहून व्यवस्थित नियोजन केल्यास सर्व किल्ले एका दिवसात आरामात पहाता येतात. पालघर किंवा केळवेहून दिवसभरासाठी ६ आसनी रिक्षा मिळू शकते.

२) केळवे माहिम परिसरातील ६ किल्ले स्वत:च्या वाहनाने किंवा रिक्षाने एका दिवसात पहाता येतात. त्यासाठी प्रथम भरती ओहोटीचे वेळापत्रक पहावे, कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पहाता येतो.

जर ओहोटी सकाळी असेल तर प्रथम केळवे पाणकोट पहावा. नंतर दांडा किल्ला, भवानगड पाहून परत केळवेत यावे. जेवण करुन केळवे भूईकोट, माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला पाहून पालघरला जावे.

ओहोटी संध्याकाळी असल्यास पालघर स्थानकात उतरुन रिक्षा करुन ५ किमी वरील शिरगाव (५ किमी) वरील माहिमचा किल्ला, महकावती देवीचे मंदीर (४ किमी वरील) केळवे भूईकोट (३ कि मी) वरील भवानगड पाहून शेवटी परत केळवे गावात येऊन ओहोटीला केळवे पाणकोट पहावा व ८ किमी वरील केळवे स्थानक गाठावे.

भवानगड, दांडा किल्ला, केळवे पाणकोट, केळवे किल्ला, शिरगावचा किल्ला यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
जिल्हा Thane
 आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  बळवंतगड (Balwantgad)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)  भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi))
 भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg)  भवानगड (Bhavangad)  भूपतगड (Bhupatgad)  चंदेरी (Chanderi)
 दांडा किल्ला (Danda Fort)  दार्‍या घाट (Darya Ghat)  धारावी किल्ला (Dharavi Fort)  दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)
 गंभीरगड (Gambhirgad)  घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))  गोरखगड (Gorakhgad)
 कामणदुर्ग (Kamandurg)  केळवे किल्ला (Kelve Fort)  केळवे पाणकोट (Kelve Pankot)  माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))
 माहुली (Mahuli)  मलंगगड (Malanggad)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  पिंपळास कोट (Pimplas Kot)
 शिरगावचा किल्ला (Shirgaon)  सिध्दगड (Sidhhagad)  ताहुली (Tahuli)  टकमक गड (Takmak)
 तांदुळवाडी (Tandulwadi)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वसई (Vasai)