मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
सोलापूर जिल्हा हा तिथे असलेले मजबूत भुईकोट किल्ले/गढी यांसाठी ओळखला जातो. इतिहासातील अनेक नामवंत सरदार पदाधिकारी यांच्या गढया जिल्ह्यात सर्वत्र पहावयास मिळतात. त्यांचे अवशेष काही प्रमाणात आजही त्यांच्या ऐतिहासिक पणाची साक्ष देत आहेत.
12 Photos available for this fort
Mohol Fort
पहाण्याची ठिकाणे :
सोलापूर-पुणे महामार्गावर सोलापूर पासून सुमारे तीस कि मी अंतरावर मोहोळ हे तालुक्याचे गाव आहे. गावामध्ये प्रवेश करताच नागनाथ मंदिर विचारताच आपल्याला लगेच उत्तर मिळते कारण कोट किंवा किल्ला असे कोणतेही सलग अवशेष आपणास आज पहावयास मिळत नाहीत. नागेश्वर मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारावरूनच मंदिराच्या प्राचिनतेची साक्ष पटते. मंदिराचे दगडी बांधकाम कलात्मकतेने रंगविले झाले. प्रवेशद्वारावर नगारखान्याची रचना केलेली आहे. मंदिर पाहून बाहेर आल्यावर डावीकडे आणखी दोन मंदिरे दृष्टीस पडतात. त्यांच्या परिसरात वीरगळी मांडून ठेवल्या आहेत. याच वाटेने पुढे गेल्यास डाविकडे कोटाचे प्रवेशद्वार दृष्टीस पडते. दोन बाजुंना बुरुज आणि पडलेली तटबंदी आहे. याच वाटेने पुढे उजवीकडे गेल्यावर जमिनीस समांतर अशी एक बारव दिसते. बारवेच्या आत उतरण्यासाठी पायऱ्या असून चारही बाजुंनी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. बारवेच्या वरील बाजूस पाणी बाहेर खेचण्यासाठी दोन मोटांची सोय केलेली दिसते. बारवे तील पाणी पिण्यायोग्य नाही. याला लागूनच कबरींचे काही अवशेष पाहायला मिळतात.याच रस्त्याने पुढे डावीकडे जुन्या घुमटीचे अवशेष नजरेस पडतात. यावरून किल्ल्याच्या मध्ययुगीन बांधकामाची कल्पना येते. आल्या वाटेने आपण आधी पाहिलेल्या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येऊन त्यातून पायऱ्यांच्या रस्त्याने सरळ बालेकिल्ल्याकडे जाता येते. पुढे काही अंतरावर देशमुखांचा वाडा पहावयास मिळतो. गावात याशिवाय भानेश्वराचे जुने मंदिर पाहण्यासारखे आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
सोलापूर - पुणे महामार्गावर मोहोळ हे तालुक्याचे ठिकाण सोलापूर पासून ३५ किमी अंतरावर आहे.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
जिल्हा Solapur
 अकलूजचा किल्ला (Akluj Fort)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))  करमाळा (Karmala Fort)  माचणूर (Machnur)
 माढा गढी/किल्ला (Madha Fort)  मंगळवेढा (Mangalwedha)  मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort)  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)
 सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)