मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
सूवर्णदूर्ग (Suvarnadurg) | किल्ल्याची ऊंची :  0 | ||||
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||||
जिल्हा : रत्नागिरी | श्रेणी : मध्यम | ||||
हर्णे हे प्राचीनकाळी बंदर म्हणून प्रसिध्द होत. ह्या बंदराच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत येथे दुर्ग चौकडी बांधण्यात आली. त्यापैकी समुद्रातील बेटावर बांधण्यात आलेला सूवर्णदूर्ग मुख्य किल्ला व त्याचे रक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेले उपकिल्ले कनकदूर्ग, गोवाकिल्ला व फत्तेगड हे होत. १६८८ मध्ये मोगल सरदार सिद्दी कासीमने सुवर्णदुर्गाला वेढा घातला. सुवर्णदुर्गाचा किल्लेदार अचलोजी मोहिते मोगलांना फितूर झाला. ही गोष्ट कान्होजी आंग्रे ह्या २० वर्षाच्या तरूणाला कळल्यावर त्याने रातोरात गडावरील सहकार्यांना विश्वासात घेऊन किल्लेदाराला कैद केले व सरळ किल्ल्याबाहेर पडून मोगलांवर हल्ला केला. पण हल्ला साफ फसला आणि कान्होजी आणि त्याचे सहकारी मोघलांच्या कैदेत पडले. कान्होजीने शिताफीने मोघलांच्या कैदेतून सुटका करून घेतली व पोहत सुवर्णदुर्ग गाठला. या घटनेमुळे त्यांच्या सहकार्यांत उत्साह संचारला व त्यांनी पावसाळ्यापर्यंत गड लढवला. मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्दीने वेढा उठविला. या घटनेमुळे कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गाचा किल्लेदार बनला. ‘‘समुद्रावरील शिवाजी’’ म्हणून ओळखल्या जाणार्या कान्होजींची कारकीर्द याच सुवर्णदुर्गावर चालू झाली. | |||||
|
|||||
इतिहास : | |||||
शिलाहारांनी उभारलेला हा किल्ला, १६व्या शतकात आदिलशहाकडे होता. १६६० च्या सुमारास शिवरायांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला व त्याची फेरउभारणी करुन बळकट केला. किल्ल्याचे लपवलेले प्रवेशद्वार ह्याची साक्ष देत उभे आहे. राजाराम महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी सूवर्णदूर्गच्या किल्लेदाराची फितूरी मोडून काढली. पेशवे व तुळाजी आंग्रे ह्यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे आंग्र्यांचा बिमोड करण्यासाठी इ.स. १७५५ मध्ये पेशवे व इंग्रजांच्या संयुक्त सैन्याने सुवर्णदुर्गावर हल्ला केला व सूवर्णदूर्ग जिंकून घेतला. १८०२ साली यशवंतराव होळकरांच्या भीतीने सैरावैरा पळणारा दुसरा बाजीराव काही काळ सूवर्णदूर्गाच्या सुरक्षित आश्रयाला राहिला, नंतर स्वत:चा कुटुंबकबिला तिथेच सोडून वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेला. नोव्हेंबर १८१८ मध्ये कर्नल केनडी, कॅप्टन कॅपेल व लेफ्टनंट डॉमिनिसेट यांनी अवघ्या ५० शिपाई व ३० खलाशांनीशी हल्ला चढवून किल्ला ताब्यात घेतला. |
|||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||
सुवर्णदुर्ग किल्ला असलेल्या बेटावर उतरल्यावर वाळूची पूळण व त्यात पडलेल्या तोफा पाहायला मिळतात. या ठिकाणी पडक्या भिंतीचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराला अधिक संरक्षण देण्यासाठी बांधलेली होती. किल्ल्याचे प्रवेशव्दार गोमुखी प्रकारचे आहे. दोन बुरुजांमध्ये किल्ल्याचे प्रवेशद्वार लपवलेले आहे. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या उजव्या तटावर मारुतीची मूर्ती आहे. किल्ल्याच्या पायरीवर कासव कोरलेले आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आत मध्ये देवड्या आहेत. उजव्या बाजूने गडफेरी सुरु केल्यावर उजव्या बाजूला किल्ल्यावर पाणी पुरवठ्यासाठी विहीर खोदलेली पाहायला मिळते. पुढे डाव्या बाजूला दोन उध्वस्त चौथरे आहेत. किल्ल्याच्या टोकाकडील बुरुजाकडे चालत जाताना दारु कोठारांच्या इमारती पाहायला मिळतात .टोकाच्या बुरुजाकडून पुन्हा प्रवेशव्दाराकडे येतांना पाण्याचे टाक आणि त्यापुढे पावसाचे पाणी साठवण्यासाठी बनवलेला तलाव पाहायला मिळतो. त्याच्या पुढे चालत गेल्यावर किल्ल्याच्या तटबंदीत बनवलेला गुप्त(चोर) दरवाजा पाहायला मिळतो. प्रवेशव्दारापासून तिसर्या बुरुजावर शरभ शिल्प पाहायला मिळते. पुढे किल्ल्याच्या टोकाकडील बुरुजाकडे जातांना तटबंदीत शौचकुप पाहायला मिळते. अशा प्तकारे तटबंदीतील अजून दोन शौचकूपं समोरच्या तटबंदीतही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या या भागातील शेवटच्या बुरुजाखाली एक खोली आहे. जवळच एक कोठार आहे. हा बुरुज पाहून किल्ल्याच्या प्रवेशव्दाराकडे आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ल्याच्या नैऋत्य टोकावरील बुरुजावरुन कनहर्णेच्या किनार्यांवरील कदूर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला हे किल्ले दिसतात. किल्ल्याच्या सभोवार असणारा खडक समुद्राच्या पातळीत तासून सपाट केलेला आहे व मधल्या उंचवट्यावर किल्ला बांधलेला आहे. | |||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||
मुंबईहून दापोलीमार्गे १५ किमी वरील मुरूड हर्णेला जाता येते. हर्णे किनार्यांवरुन किल्ल्यावर जाण्यासाठी होड्या मिळतात. | |||||
राहाण्याची सोय : | |||||
गडावर राहण्याची सोय नाही, हर्णे गावात रहाण्याची सोय आहे. | |||||
जेवणाची सोय : | |||||
गडावर जेवणाची सोय नाही, हर्णे गावात जेवणाची सोय आहे. | |||||
पाण्याची सोय : | |||||
गडावर पाण्याची सोय नाही. | |||||
सूचना : | |||||
१) मुरुड हर्णेला राहून सूवर्णदुर्ग, गोवा किल्ला, कनकदुर्ग व फत्तेगड एका दिवसात पाहाता येतात. २) फत्तेगड, कनकदुर्ग व गोवा किल्ला यांची माहिती साईटवर दिलेली आहे. |
प्रकार: Sea forts | अर्नाळा (Arnala) | कुलाबा किल्ला (Colaba) | जंजिरा (Janjira) | केळवे पाणकोट (Kelve Pankot) |
खांदेरी (Khanderi) | पद्मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa)) | पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan)) | सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug)) |
सिंधुदुर्ग (Sindhudurg) | सूवर्णदूर्ग (Suvarnadurg) | उंदेरी (Underi) | विजयदुर्ग (Vijaydurg) |