मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
आजोबा (आजा पर्वत) (Ajoba) | किल्ल्याची ऊंची :  4511 | ||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: बालाघाट रांग | ||
जिल्हा : ठाणे | श्रेणी : मध्यम | ||
बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला " आजापर्वत " उर्फ " आजोबाचा डोंगर " एखाद्या पुराण पुरुषाप्रमाणे भासतो. घनदाट झाडाझुडुपांनी नटलेला हा आजोबाचा गड हरिशचंद्र अभयारण्याचा भाग आहे. वाल्मिकी आश्रमामुळे या भागाला तिर्थक्षेत्राचा दर्जा आहे, त्या अंतर्गत इथे लवकरच पक्का रस्ता होणार आहे. सर्वसाधारण ट्रेकर्स करतात तो आजोबा गडाचा ट्रेक म्हणजे "सीतेचा पाळणा" या ठिकाणा पर्यंतचा ट्रेक आहे. या पुढील आजोबा गड चढून त्याचा शिखर माथा गाठण्यासाठी गिर्यारोहण साहित्य आणि गिर्यारोहणाचा प्रदिर्घ अनुभव आवश्यक आहे. |
|||
|
|||
इतिहास : | |||
गडाचे नाव आजोबा कसे पडले यावर एक पुराणकथा प्रसिद्ध आहे याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी " रामायण " हा धर्मग्रंथ लिहिला. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना " आजोबा " म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबाचा गड पडले. अशी कथा सांगितली जाते. येथे गडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम व त्यांची समाधीसुद्धा आहे. |
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
देहेणेहून वाल्मिकी आश्रमा पर्यंत रस्ता आहे. साधारणपणे आश्रमाच्या अलिकडे दोन किलोमीटर पर्यंत पक्का रस्ता आहे तेथपर्यंत वहानाने जाता येते. पुढे कच्च्या रस्त्याने वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी पोहोचण्यासाठी साधारणपणे अर्धा ते पाऊण तास लागतो. दुचाकी किंवा जीप सारख्या वहानाने थेट आश्रमापर्यंत जाता येते. या ठिकाणी वाल्मिकी ऋषींचे मंदिर, कालभैरव , शंकर मंदिर आणि काही वीरगळी व समाधी शिळा आहेत. येथे भक्त निवास आणि ध्यान कक्ष आहे. आश्रमा समोर एक पायर्यांची वाट खाली उतरते . पन्नास पायर्या उतरल्यावर दोन पाण्याची टाकं आहेत. यात वर्षभर पाणी असते. या आश्रमा मागून धबधब्याच्या वाटेने चढत गेल्यास तासा दिड तासात आपण एका खिंडीत पोहोचतो . येथे डाव्या बाजूला वर एक गुहा आहे. तेथे जाण्यासाठी १५ फ़ूटाचा छोटा रॉक पॅच आहे. येथे सध्या लोखंडी शिडी बसवलेली आहे. शिडीवरुन गुहेत चढून गेल्यावर लवकुशाच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत. तेथेच लव कुशांचा पाळणा लावलेला आहे. गुहेच्या डावीकडे एक पाण्याचे कोरडे टाके आहे. हे सर्व पाहून झाल्यावर आल्या मार्गाने आश्रमात परतावे. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
११) कल्याण - आसनगाव ( लोकल ट्रेनने ३५ मिनीटे ) -(रिक्षा/बसने ३ कि.मी) शहापूर -(बसने ३० कि.मी.) डोळ्खांब - (जीपने १२ कि.मी.) -देहेणे. देहेणेहून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतॊ. तिथून सीतेच्या पाळ्ण्या पर्यंत जाण्यासाठी १ ते १. ३० तास लागतॊ. २) कल्याण - मुरबाड - टोकवडे - देहेणे या मार्गाने (८९ किलोमीटर ) देहेणे गावी पोहोचता येते. ३) कसारा - घोटी - राजूर - कुमशेत मार्गे:- गडाचा माथा पहाण्यासाठी कसारा - घोटी - राजूर - कुमशेत मार्गे जाता येते. | |||
राहाण्याची सोय : | |||
गडाच्या पायथ्याशी राहाण्यासाठी आश्रम आहे. | |||
जेवणाची सोय : | |||
येथे जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वत:च घेऊन यावे. | |||
पाण्याची सोय : | |||
येथे बारामाही पाण्याचा झरा आहे. | |||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||
देहेणेहून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत अर्धा तास व आह्रम ते सीतेचा पाळाणा १.३० तास लागतो. | |||
सूचना : | |||
गडावर सापांचे फार वास्तव्य असल्याने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. |
जिल्हा Thane | आजोबा (आजा पर्वत) (Ajoba) | बळवंतगड (Balwantgad) | बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) | भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi)) |
भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg) | भवानगड (Bhavangad) | भूपतगड (Bhupatgad) | चंदेरी (Chanderi) |
दांडा किल्ला (Danda Fort) | दार्या घाट (Darya Ghat) | धारावी किल्ला (Dharavi Fort) | दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort) |
फिरंगकोट (Firang kot) | गंभीरगड (Gambhirgad) | घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) | घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara)) |
गोरखगड (Gorakhgad) | कामणदुर्ग (Kamandurg) | कांबे कोट (Kambe Kot) | केळवे किल्ला (Kelve Fort) |
केळवे पाणकोट (Kelve Pankot) | खारबाव कोट (Kharbao kot) | माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim)) | माहुली (Mahuli) |
मलंगगड (Malanggad) | नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort) | नांदरुखी कोट (Nandrukhi Kot) | पिंपळास कोट (Pimplas Kot) |
शिरगावचा किल्ला (Shirgaon) | सिध्दगड (Sidhhagad) | ताहुली (Tahuli) | टकमक गड (Takmak) |
तांदुळवाडी (Tandulwadi) | वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai)) | वसई (Vasai) | वेहेळे कोट (Vehele Kot) |