बहुला
प्रस्तावना
बहुला हा किल्ला लष्कराच्या तोफ़गोळा सरावाच्या टप्प्यात असल्याने हा किल्ला आणि परिसर लष्कराच्या ताब्यात आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी लष्कराची परवानगी आवश्यक आहे. परवानगी न घेता किल्ल्यावर किंवा या परिसरात गेल्यास कारवाई होऊ शकते.
महत्त्वाची ठिकाणे
बहुला किल्ला चढाईच्या शेवटच्या भागात सोपा कातळटप्पा पार करून आपण किल्ल्याच्या उत्तरकड्यापाशी पोहोचतो. उत्तर कड्याच्या मध्यभागी एक गुहा आहे, यात ग्रामदैवत भैरोबाची मूर्ती आहे . भैरोबाचे दर्शन घेऊन कडा डाव्या हाताला ठेवून, उजवीकडची वाटेने पुढे गेल्यावर आपण कातळकड्यात कोरलेल्या गुहांपाशी येऊन पोहोचतो. यांपैकी पहिली गुहा आकाराने मोठी असून, तिच्या आतील भागात आणखी दोन दालने आहेत. गुहेच्या पुढून जाणारी वाट आपल्याला किल्ल्याच्या पश्चिमेला एका कड्यापाशी थेट आणून सोडते.. या कड्याच्या घळीत कातळकोरीव पायऱ्या आहेत. पहिल्या पंचवीस पायऱ्यांची पडझड झाली असल्याने त्या चढण्यासाठी डावीकडच्या कातळात कोरलेल्या खोबण्यांचा आधार घ्यावा लागतो. अंदाजे ४० ते ४५ पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याच्या उध्वस्त पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.
गडमाथा छोटासाच आहे . गडमाथ्यावर दक्षिण दिशेला पाण्याचे एक फुटलेले टाके आहे. या टाक्याच्या उजवीकडे चालत गेल्यावर, अर्धवट अवस्थेत कातळकड्यात खोदलेले पाण्याचे टाके आहे. टाक्यांच्या समोरच एक घळ आहे. या घळीतून कोणी वर येऊ नये म्हणून त्याच्या वाटेत एक बुरूज बांधलेला आहे.
गडमाथ्यावरुन घरगड (गडगडा) , रांजणगिरी, मग अंजनेरीचा हे किल्ले दिसतात.
कसे पोहोचावे
मुंबई-नाशिक रस्त्यावर घोटी सोडल्यानंतर १५ कि.मी. वर मुख्य रस्त्याला दोन फाटे फुटतात डावीकडचा फाटा जातेगाव-मुळेगावमार्गे अंजनेरी किल्ल्याकडे जातो, तर दुसरा उजवीकडचा फाटा 'आंबे बहुला' या गावाकडे जातो. गावातून बाहेर पडल्यावर ओढ्यावर बांधलेला एक मोठा बंधारा लागतो. बंधाऱ्यावरून चालत बहुला किल्ल्याचा पायथा गाठायला पाऊण तास लागतो. डोंगरावर तिरक्या रेषेत चढणारी वाट वीस मिनिटांत बहुला आणि त्याच्या समोरच्या डोंगरामुळे निर्माण झालेल्या खिंडीत आणून सोडते. खिंडीतून उजवीकडे वर जाणारी वाट धरायची, थोड्या अंतरावरील एक सोपा कातळटप्पा पार करून आपण किल्ल्याच्या उत्तरकड्यापाशी पोहोचतो.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ N/A
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गडावर राहाण्याची सोय नाही
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय मुंबई - नाशिक महामार्गावर आहे
पाणी उपलब्धता
गडावर पाण्याची सोय नाही
सर्वोत्तम काळ
🌤️ N/A
जवळील गावे
आंबे बहुला
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.