भूपतगड

गिरीदुर्ग ठाणे जव्हार
🏔️
अवघडीनुसार स्तर
मध्यम
📏
समुद्रसपाटीपासून उंची
1600
⏱️
ट्रेकसाठी लागणारा वेळ
गडावर पिण्याच्या प
🌤️
सर्वोत्तम काळ
N/A

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Bhupatgad

Bhupatgad

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

Fort

Fort

Fort

Fort

सर्व नकाशे पहा

प्रस्तावना

जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. याच जव्हारच्या जवळ, एका दिवसात जाऊन पाहून येण्यासारखा किल्ला आहे. त्याचे नाव भूपतगड. या आदिवासी परिसरात उन्हाळ्यामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर जाणवते. प्राचिनकाळी डहाणू , (नाला) सोपारा बंदरांमध्ये उतरलेला माल जव्हार मार्गे गोंडा गाट, थळ घाटाने त्र्यंबकेश्वर डोंगररांग ओलांडून नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी समुद्र किनार्‍यावर डहाणूचा किल्ला, घाटाखाली भूपतगड व त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत बसगड (भास्करगड), हरिहर, त्र्यंबक, त्रिंगलवाडी हे गड बांधण्यात आले.


Bhupatgad

कसे पोहोचावे

१) मुंबईहुन - भिवंडी - वाडामार्गे अथवा कसारा - खोडाळामार्गे जव्हार (दोन्ही मार्गांनी अंतर अंदाजे १३० कि.मी.) गाठावे. जव्हारपासून १७ कि.मी अंतरावर झाप नावाचे गाव आहे. येथे २ फाटे फुटतात. या ठिकाणी उजव्या बाजूचा रस्ता झाप गावात जातो आणि सरळ जाणारा रस्ता १ किमी अंतरावर चिंचवाडी गावात जातो. या फाट्यापासून १० मिनिटांवर चिंचवाडी आहे. चिंचवाडीतून कच्च्या रस्त्याने एक टेकाड पार केल्यावर आपण भूपतगडाच्या पायथ्याशी पोहोचतो.गडाचा चिंचवाडीतून गडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या पायथ्यापासून गड डावीकडे ठेवत वाट तिरपी तिरपी वर जाते. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास सुमारे अर्धा तास लागतो.

२) मुंबईहुन पश्चिम द्रुतगती मार्गाने बोरीवली -मनोर -विक्रमगड - जव्हार (अंतर अंदाजे १४८ कि.मी.) गाठावे. जव्हारपासून १७ कि.मी अंतरावर झाप नावाचे गाव आहे. येथे २ फाटे फुटतात ऊजवी कडचा रस्ता झाप गावात जातो आणि सरळ जाणारा रस्ता १ किमी अंतरावर चिंचवाडी गावात जातो. या फाट्यापासून १० मिनिटांवर चिंचवाडी आहे. चिंचवाडीतून कच्च्या रस्त्याने एक टेकाड पार केल्यावर आपण भूपतगडाच्या पायथ्याशी पोहोचतो.गडाचा चिंचवाडीतून गडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या पायथ्यापासून गड डावीकडे ठेवत वाट तिरपी वर जाते. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास सुमारे अर्धा तास लागतो.

महत्त्वाची ठिकाणे

भूपतगडावर आपला प्रवेश नष्ट झालेल्या दरवाज्याच्या अवशेषामधून होतो. गडाला उत्तरेकडे व दक्षिणेकडे असे एकूण दोन दरवाजे होते. आज हे दोन्ही दरवाजे नष्ट झालेले आढळतात. प्रवेशव्दारापाशी असणारे बुरुज कसेबसे तग धरुन उभे आहेत. प्रवेशव्दारापाशी एक म्हसोबाची मूर्ती आहे. आत शिरल्यावर समोर हनुमानाची मूर्ती दिसते. गडमाथा बराच विस्तीर्ण आहे. माथ्यावर एका मोठ्या पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. या वाड्याच्या भिंती अजूनही काही ठिकाणी शिल्लक आहेत. वाड्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा हौद आहे. गडाच्या ४ पाण्याची खोदीव टाकी दिसतात. या टाक्यांजवळच एक कोरडा तलाव आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धा तास लागतो. गडावरुन त्रिंगलवाडी, हरिहर, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा असा सर्व परिसर दिसतो.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

गडावर रहाण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

जव्हार मध्ये जेवणाची सोय होऊ शकते

💧

पाणी उपलब्धता

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

अतिरिक्त माहिती

भूपतगड हा छोटासा किल्ला पाहुन झाल्यावर, स्वतःचे वाहान असल्यास १) जव्हार मधील राजवाडा , २) हनुमान पॊइंट , ३) दाभोसा धबधबा , ४)शिर्पाचा माळ (सुरतेवर स्वारीला जातांना शिवाजी महाराजांच्या सैन्याने या माळावर मुक्काम केला होता. या ठिकाणी कमान उभारुन स्मारक बनविण्यात आले आहे.) इत्यादी ठिकाण पाहाता येतील.

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा