जंगली जयगड

गिरीदुर्ग सातारा महाबळेश्वर कोयना
🏔️
अवघडीनुसार स्तर
मध्यम
📏
समुद्रसपाटीपासून उंची
3164
⏱️
ट्रेकसाठी लागणारा वेळ
पायथ्यापासून गडाव�
🌤️
सर्वोत्तम काळ
N/A

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Small pinnacles on Junglee jaigad called as Deepmal

Small pinnacles on Junglee jaigad called as Deepmal

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ धरण आहे. या धरणाच्या भिंतीजवळ कोयनानगर हे छोटस टुमदार गाव वसलेल आहे. या गावापासून १२ किमीवर जंगली जयगड हा किल्ला आहे. या किल्ल्यावर व आजूबाजूस असलेल्या दाट जंगलामुळे या किल्ल्याला जंगली जयगड हे नाव देण्यात आले होते. आजही या भागात दाट जंगल असून जंगलात वाघ, बिबटे, अस्वल इत्यादी प्राणी असल्याने या गडावर कोणीही रात्री मुक्काम करत नाही. घाटमाथ्याच्या टोकावर असणार्‍या या किल्ल्यावरून कोकणाच विस्तृत दर्शन होत. या गडाचे स्थान पहाता याचा उपयोग कुंभार्ली घाटावर व आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा. हा किल्ला चढण्यास सोपा असून गर्द जंगलातून जाणार्‍या रस्त्यामुळे हा एक दिवसाचा ट्रेक अल्हाददायक होतो.

Jangli Jaigad

कसे पोहोचावे

चिपळूण - पाटण - कराड रस्त्यावर चिपळूण पासून ४३ किमीवर कोयनानगर गाव आहे. कोयना नगरहून नवजा गाव ११ किमी अंतरावर आहे. नवजा गावापर्यंत जाण्यासाठी कोयनानगरहून दर तासाला बसेस आहेत. नवजा गावापुढे "पंचधारा" या कोयनेवरील पहिल्या बोगद्याकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर ५०० मीटरवर एक चौकी आहे, ती ओलांडल्यावर साधारणपणे ५०० मीटरवर डाव्या हाताला एक कच्चा रस्ता डोंगरात गेलेला दिसतो. येथेपर्यंत खाजगी वहानाने जाता येते. येथून डोंगर चढण्यास सुरुवात करावी.वाट मळलेली असून गर्द झाडीतून जाते. साधारण अर्ध्या तासाने आपण पाण्याच्या झर्‍याजवळ पोहोचतो. या झर्‍याला फेब्रुवारी पर्यंत पाणी असते. येथेच एक सिमेंटचा चौथरा बांधलेला आहे. पुढे १५ मिनिटात आपण सह्याद्रीचा मुख्य डोंगर चढून कोकणाच्या बाजूला आल्यावर समोर लांबवर पसरलेला सह्याद्रीचा फाटा व त्यावरील किल्ला दिसतो. येथून किल्ल्याच्या टोकावर जाण्यास अर्धा तास लागतो. पायथ्यापासून गडावर जाण्यास सव्वा तास (१ तास १५ मिनिटे) लागतो.

महत्त्वाची ठिकाणे

जंगली जयगड किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून बाहेर आलेल्या फाट्यावर बांधलेला आहे. कोयनानगरच्या बाजूने सह्याद्रीचा मुख्य डोंगर चढून कोकणाच्या बाजूला आल्यावर समोर लांबवर पसरलेला सह्याद्रीचा फाटा व त्यावरील किल्ला दिसतो. येथेच गडाचे उव्धस्त प्रवेशव्दार आहे. झाडीत विखुरलेल्या घडीव दगडांवरून ते ओळखता येते. गडाच्या टोकाकडे जातांना आपल्याला दोन छोट्या कातळ सुळक्यांना वळसा घालून जावे लागते, या सुळक्यांना स्थानिक लोक "दिपमाळ" या नावाने ओळखतात. या सुळक्याच्या बाजूने पुढे गेल्यावर एक उव्धस्त/ पडके मंदिर दिसते. या मंदिरात देवीची पूर्ण झिजलेली मुर्ती आहे. किल्ल्याच्या टोकावर भगवा झेंडा लावलेला आहे. किल्ल्यावरून कोकणाच विस्तृत दर्शन होत. उजव्या बाजूस खाली कोळकेवाडी धरण व त्याच्या बाजूच्या डोंगरावरील कोळकेवाडी किल्ला दिसतो. समोरच्या बाजूस दूरवर चिपळूण शहर व वासिष्टी खाडी दिसते. जर वातावरण चांगल असेल तर समुद्राची निळी रेघही दिसते. डाव्या बाजूला खाली कुंभार्ली घाट दिसतो. किल्ला छोटा असल्यामुळे ३० मिनिटात पाहून होतो.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

गडावर रहाण्याची सोय नाही, कोयनानगर गावात आहे किंवा नवजा गावतील शाळेत मुक्काम करता येईल.

🍽️

अन्न व्यवस्था

गडावर जेवणाची सोय नाही, कोयनानगर गावत आहे .

💧

पाणी उपलब्धता

गडावर जातांना वाटेत असलेल्या झर्‍यात जानेवारी - फेब्रूवारी महिन्यापर्यंतच पाणी असते.

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

अतिरिक्त माहिती

१) नवजा गावात गडावर जाण्यासाठी गाईड मिळतात त्यांना बरोबर घेउन जावे. कारण नवजा गावातून गडावर जातांना वाटेत जी चौकी लागते तेथून परवानगी असल्याशिवाय पुढे सोडत नाहीत.अशावेळी स्थानिक वाटाड्यांची मदत होते.
२) किल्ल्याची वाट दाट जंगलातून जात असल्यामुळे नवजा गावातून वाटाड्या घ्यावा.
३) गडावरून कोकणात उतरण्यासाठी वाट नसल्यामुळे आल्या वाटेनेच खाली उतरावे.
४) कोळकेवाडी दुर्गाची माहिती साईटवर दिलेली आहे.

जवळील गावे

Navaja

या परिसरातील इतर किल्ले महाबळेश्वर कोयना

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा