काळदुर्ग

गिरीदुर्ग पालघर पालघर
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
1550
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
पालघर

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Kaldurg

Kaldurg

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

ठाणे जिल्ह्यातील पालघर विभागात अनेक डोंगरी किल्ले आहेत. शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे हे किल्ले मुंबईकरांना एका दिवसात आरामात पाहता येतात. हे सर्व किल्ले ठाणे आणि जव्हारच्या सीमेवर आहेत.

महत्त्वाची ठिकाणे

काळदुर्गला हा टेहळणीचा किल्ला होता. किल्ला गडमाथा आणि खालचे पठार या दोन स्तरांमध्ये विभागलेला आहे. गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडा आहे. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गड चढायला सुरवात केल्यानंतर साधारण अर्ध्या तासात आपण पठारावर पोहोचतो. या पठाराला गडाची माची म्हणता येईल. येथून पुढे ठळक पायवाटेने आपण गडाच्या मुख्य डोंगराला भिडतो. मुख्य डोंगराचा खडा चढ चढल्यावर आपलं गडाच्या पहिल्या टाक्या पाशी पोहोचतो. टाक्यापासून आठ-दहा पावले वर चढून गेलो की आपण गडाच्या दुसर्‍या मुख्य माचीवर पोहोचतो. या माचीच्या डाव्या बाजूला मळलेल्या वाटेने चालत गेल्यावर दोन मिनिटात आपण गडावरील सर्वात मोठ्या टाक्यापाशी पोहोचतो. पुढे गेल्यावर आपल्याला कातळात खोदलेला गोल खड्डा दिसतो. टेहळणीसाठी बसणार्‍या पहारेकार्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी अशाप्रकारचे कातळकोरीव गोल खड्डॆ कोरलेले पाहायला मिळतात. या कातळ कोरीव खड्ड्याला लागून असलेल्या पायवाटेने आपण गड विरुद्ध दिशेने उतरायला सुरवात करावी. साधारणपणे १०-१५ मिनिटात आपण मेघोबाच्या मंदिर जवळ पोहोचतो. येथे आपल्याला भग्न अवस्थेतील शंकराची पिंड, नंदी व इतर काही मुर्ती दिसतात. उत्तर कोकणातील पाऊस प्रथम या मंदिरावर पडत असे अशी आख्यायिका आहे म्हणून या देवाला मेघोबा असे नाव पडले आहे. पुन्हा आल्या वाटेने गड चढून दुसर्‍या माचीपाशी यावे. या माचीवरुन गडमाथ्यावर जाण्यास २ ते ३ पायर्‍या आहेत. गडमाथ्यावर पाण्याचे एक टाके आहे. येथून दुरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो.

कसे पोहोचावे

वाघोबा खिंड मार्गे :-
मुंबईहून विरारमार्गे पालघर गाठावे. अथवा कल्याणहून एसटीने पालघरला जावे. पालघरहून मनोरेला जाणारी बसने ८ कि.मी. वरील ’वाघोबा’ नावाच्या देवळाच्या (’वाघोबा खिंड") थांब्यावर उतरावे. येथूनच गडावर जाण्याची वाट फुटते. या ’वाघोबा’ देवळाच्या उजवीकडे जाणार्‍या वाटेने आपण गडावर पोहोचू शकतो. ’हातपंप’ ही खूण लक्षात ठेवणे. हातपंपच्या समोरुन वर जाणारी वाट पकडावी. ही वाट पुढे तीन भागांत विभागली जाते. डाव्या व उजव्या बाजूची वाट सोडून द्यावी, सरळ वर जाणार्‍या वाटेने काळदुर्ग गाठता येतो.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ वाघोबा खिंडीतून दीड तास लागतो.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

जेवणाची सोय आपण स्वत…च करावी.

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.

सर्वोत्तम काळ

🌤️ सर्व ऋतुत जाता येते.

जवळील गावे

वाघोबा खिंडी (मंदिर)

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा

किल्ले स्वच्छ ठेवा

किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.