मदनगड
प्रस्तावना
सह्याद्री मधील सर करायला कठीण अशा गडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड किल्ला होय. तसा हा किल्ला बराच प्राचीन आहे आणि तेवढाच दुर्गम सुद्धा आहे. या परिसरातील भटकंती करायची असेल तर सर्वात योग्य असा कालावधी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिने. अलंग , मदन , कुलंग या तीनही किल्ल्यांचा ट्रेक एकत्र केला जातो.
महत्त्वाची ठिकाणे
गडमाथा तसा लहानच आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा आहे. गडावरून सभोवतालचा परिसर फारच छान दिसतो. मदनगडावरून अलंग, कुलंग ,छोटा कुलंग, रतनगड, आजोबा गड, कात्राबाई ,डांग्या सुळका ,हरिहर,त्रिबंकगड हे किल्ले दिसतात. गडफेरीस अर्धातास लागतो.
कसे पोहोचावे
गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्ग अलंग आणि मदनच्या खिंडीतूनच जातात.
१ आंबेवाडी मार्गे :-
मदनगडावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे. इगतपुरी/कसारा - घोटी - पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस टी सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ किमी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६०० वाजताची बस आहे.
आंबेवाडीतून समोरच अलंग,मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदनच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फार दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहोचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवीकडचा मदन किल्ला होय.
येथून मदनवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. उजवीकडे वळल्यावर थोड्याच वेळात पायर्या लागतात.या पायर्या चढून गेल्यावर एक सरळसोट ५० फूट उंचीचा कडा लागतो. येथून प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. खिंडीपासून गडमाथा गाठण्यासाठी २ तास लागतात.
२ घोटी - भंडारदरा मार्गे घाटघर :-
किल्ल्यावर येण्यासाठी दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी - भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून चार तासात आपण अलंग आणि मदन यांच्या खिंडीपाशी पोहचतो.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ आंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गडावर एक गुहा आहे. यात साधारण ३० जण राहू शकतात.
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाणी उपलब्धता
किल्ल्यावर फक्त फेब्रुवारी पर्यंत पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते.
सर्वोत्तम काळ
🌤️ N/A
अतिरिक्त माहिती
गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.
जवळील गावे
आंबेवाडी.
या परिसरातील इतर किल्ले कळसूबाई
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.