सोनगिरी (कर्जत जवळ)

गिरीदुर्ग रायगड लोणावळा
🏔️
अवघडीनुसार स्तर
मध्यम
📏
समुद्रसपाटीपासून उंची
2500
⏱️
ट्रेकसाठी लागणारा वेळ
नावली मार्गे २ ते ३
🌤️
सर्वोत्तम काळ
वर्षभर

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Fort Songir

Fort Songir

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

महाराष्ट्रात सोनगिरी नावाचे काही किल्ले आहेत. एक नाशिक जिल्ह्या्तील सोनगिरी, तर दुसरा धुळ्या जवळचा सोनगिरी आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळचा सोनगिरी. गडकिल्ल्यांचा अभ्यास करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांचे स्थान. गडकिल्ले साधारणत: घाटाच्या पायथ्याशी, घाटाच्या माथ्यावर बांधलेले आढळतात. रायगड जिल्ह्यातील हा सोनगिरीचा किल्ला सुध्दा ऐन बोरघाटाच्या पायथ्याशीच आहे. या किल्ल्याला ‘आवळसचा किल्ला’ असे ही म्हणतात.

कसे पोहोचावे

१) पळसदरी मार्गे :-
पळसदरी हे खंडाळा घाटाच्या पायथ्याचे रेल्वे स्थानक. रेल्वे स्थानकाच्या बाहेरच एक छोटेसे धरण आहे. मुंबईहून रेल्वेने कर्जतच्या पुढे ३ किमी अंतरावर असणार्‍या पळसदरी रेल्वे स्थानकावर उतरायचे. पळसदरी रेल्वे स्थानकावरुन समोरच सोनगिरीचा किल्ला दिसतो. पळसदरी मधून १५ मिनिटाच्या अंतरावर ‘आवळस ’ गावात पोहोचायचे. आवळसपासून पुढे १५ मिनिटाच्या अंतरावर असणार्‍या ‘नावली’ गावात पोहोचायचे. हेच किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्यासाठी ठळक वाट आहे. गावातून किल्ल्यावर जातांना दोन टेकाडं ओलांडावी लागतात. साधारणत: एक ते सव्वा तासात आपण किल्ल्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो.

कातळकड्याच्या पायथ्यापासून डावीकडची वाट धरायची आणि कातळकडा उजवीकडे ठेवून एका घळीतून वर चढायचे. किल्ला आणि त्याच्या बाजूला असणार्‍या डोंगराच्या बेचक्यात आपण पोहोचतो. घळीतून वर जाणारी वाट निसरडी असल्याने जरा जपूनच चढावे लागते. बेचक्यातून उजवीकडे वर जाणारी वाट धरायची आणि ५ मिनिटात गडमाथा गाठायचा.

२) जामरूंग मार्गे :-
कर्जत - खोपोली रेल्वेमार्गावर पळसदरीच्या पुढे जामरूंग स्टेशन आहे. येथे उतरून मुंबईच्या दिशेला चालत येतांना वाटेत रेल्वेचा बोगदा लागतो. या बोगद्याच्यावर जाणारी वाट पकडून वर गेल्यावर किल्ल्याच्या डोंगराची एक धार खाली उतरलेली दिसते. या धारेवरून किल्ल्यावर जाता येते. पुढे या वाटेला पळसदरी मार्गे येणारी वाट मिळते.


3) बीड (कर्जत) मार्गे :-
कर्जतच्या श्रीराम पुलावरून बीड गावात जायला टम टम रिक्षा मिळतात. कर्जत ते बीड 20 रुपये घेतात. बीड गावामधून मराठी शाळेच्या मागून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. या वाटेने किल्ल्यावर जायला दीड तास लागतो.

महत्त्वाची ठिकाणे

गडावर जातांना थोडीशी तटबंदी लागते. गडमाथा फारच चिंचोळा आहे. त्यावर पाण्याच्या दोन टाक्यां व वाड्यांचे चौथरे आहेत. गडावरुन बोरघाटाचे सुंदर दृश्य दिसते. समोरच राजमाची, ढाकगड, भिवगड, प्रबळगड असे सर्व किल्ले लक्ष वेधून घेत असतात.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

गडावर राहण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

गडावर जेवणाची सोय नाही.

💧

पाणी उपलब्धता

गडावर पिण्याचे पाणी नाही.

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

जवळील गावे

"Navali,Beed"

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा