सोनगिरी (नाशिक)

गिरीदुर्ग नाशिक पेठ, नाशिक
🏔️
अवघडीनुसार स्तर
सोपी
📏
समुद्रसपाटीपासून उंची
1571
⏱️
ट्रेकसाठी लागणारा वेळ
भुवन फाट्यावरुन सा
🌤️
सर्वोत्तम काळ
जून ते मार्च

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Songir (Nashik)

Songir (Nashik)

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

नाशिकपासून वायव्य दिशेस साधारण ५५ किमी अंतरावर पेठ हे तालुक्याचे ठिकाण आहे. पेठच्या पश्चिमेस साधारण दहा किलोमीटर वर गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांची सीमा आहे. हा पूर्ण प्रदेश अनेक छोट्या छोट्या टेकड्यांनी व्यापलेला आहे. पेठच्या साधारण नैऋत्येस पाच-दहा किलोमीटरवर तोंडवळ आणि भुवनही गावे आहेत. या दोन गावांना एका घाट रस्त्याने जोडले आहे. या घाटावर सोनगिरी हा टेहळणीचा किल्ला आहे. त्यामुळे तोंडवळ आणि भुवन ही दोन्ही या किल्ल्याच्या पायथ्याची गावे आहेत.

कसे पोहोचावे

नाशिकपासून वायव्येस साधारण ५५ किलोमीटरवर पेठ हे गाव आहे. येथून नैऋत्येस साधारण १० किलोमीटरवर भुवनफाटा आहे. या भुवन फाट्यावरुन भुवन किल्ल्यावर जाता येते. हा प्रदेश मुख्य शहरापासून दूर असल्याने खाजगी वाहन असल्यास उत्तम.

महत्त्वाची ठिकाणे

तोंडवळ वरुन भुवनकडे येताना जिथे घाटरस्ता भुवन गावाकडे वळतो, त्या ठिकाणाला भुवन फाटा म्हणतात. या भुवन फाट्यावरुन एक लाल मातीची वाट मुख्य रस्ता सोडून उजवीकडे जाते. या वाटेवरुन साधारण पंधरा मिनिटे चढल्या नंतर समोर भुवन गाव आणि त्यामागे दमणगंगा नदी दिसते. पठारावर खुरासणीच्या फुलांची शेती आहे. येथून साधारण पाच मिनिटात आपण गड माथ्यावर पोहोचतो. गड माथ्यावर आल्यावर फक्त एक चौथरा दिसतो. येथे पूर्वी रेणुकामातेचे मंदिर होते. आता त्या मंदिराची पडझड झाली आहे. त्यामुळे रेणुकामातेची मुर्ती गावकऱ्यांनी भुवन गावात नेली आहे. माथ्यावर एक बुजलेले पाण्याचे टाके आहे. किल्ल्यावर पहाण्या सारखे बाकी काहीही नाही. नाशिकवरुन सुरतला जाणारानाशिक - पेठ - धरमपूर या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली असावी.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

जेवणाची सोय पेठ येथे होवू शकते.

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर पाण्याची सोय नाही.

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

अतिरिक्त माहिती

खैराई सोनगिरी वाघेरा आणि ब्रम्हगिरी असा तीन दिवसांचा ट्रेक करता येतो. खैराई वाघेरा आणि ब्रम्हगिरी या किल्ल्यांची माहिती साईटवर उपलब्ध आहे.

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा