वासोटा

गिरीदुर्ग बामणोली, सातारा
🏔️
अवघडीनुसार स्तर
मध्यम
📏
समुद्रसपाटीपासून उंची
4267
⏱️
ट्रेकसाठी लागणारा वेळ
मेट इंदवली मार्गे �
🌤️
सर्वोत्तम काळ
N/A

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Pinnacle Of Nageshwar

Pinnacle Of Nageshwar

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

Fort

Fort

सर्व नकाशे पहा

प्रस्तावना

महाराष्ट्रातील, कोयना नदीच्या खोर्‍य़ात, निबिड अरण्यात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले वासोटा’. ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ ’आश्रयस्थान’ असा दिला आहे. वासोट्यालाच ’व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच शिवसागर जलाशयात येत असल्यामुळे हा भाग दुर्गम बनलेला आहे, तसेच वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे.त्यामुळेच वासोटा किल्ल्याची भेट वैशिष्ट्यपूर्ण ठरते. वासोटा - नागेश्वर हा शरीर - मनाची कसोटी पाहाणारा ट्रेक एका दिवसात करता येतो.
(वासोटा - नागेश्वर ट्रेकची विस्तृत माहिती www. trekshitiz.com साईटवरील डिस्कशन फ़ोरम मधील रेंज ट्रेक सेक्शन मधे दिलेली आहे.)

ऐतिहासिक पार्श्वभूमी

वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत ’वसिष्ठ’ हे नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा’ झाले. प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही, हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत ’वसंतगड’ या नावाने उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा. मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीवरून शिवरायांनी जावळी विजयानंतर वासोटा घेतला असे सांगितले जाते, पण ते खरे नाही जावळी घेताना, जावळीतील तसेच कोकणातील इतर किल्ले शिवरायांनी घेतले. पण वासोटा दूर असल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी बरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठदहा महिने प्रखर झुंज देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

कसे पोहोचावे

वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक सातारामार्गे आणि दुसरा थेट चिपळुणहुन - नागेश्वर मार्गे वासोट्याकडे
१) सातारामार्गे वासोटा :- खालील तिनही मार्गाने जातांना प्रथम कोयना धरणाचा " शिवसागर जलाशय " बोटीने पार करावा लागतो.

अ) मेट इंदवली मार्गे :-
वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी वापरली जाणारी सर्वात प्रचलित वाट मेट इंदवलीहून आहे. त्यासाठी सातार्‍याहून बामणोली या गावी यावे. सातरा -बामणोली अंतर ३० किमी आहे. सातारा - कास पठार - बामणोली या सुंदर रस्त्याने तासभरात बामणोलीला पोहोचता येते. बामणोलीला जाण्यासाठी सातार्‍याहून बसची सोय आहे. बामणोलीहून कोयना धरणाचा शिवसागर जलाशय लाँचने पार करून मेट इंदवलीला पोहोचायला दिड तास लागतो.

मेट इंदवलीला वनखात्याचे ऑफ़िस आहे तिथे आपली व आपल्याकडील पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या यांची नोंद होते व त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूसाठी रुपये १०/- डिपॉझिट भरल्यावर गडावर जाण्याची परवानगी मिळते. ( ट्रेक हून परत येताना नेलेल्या सर्व वस्तू परत दाखवल्यावर डिपॉझिट परत केले जाते. जंगलात होणारा प्लास्टीकचा कचरा कमी करण्यासाठी जंगलखात्याने ही अभिनव योजना चालू केली आहे.)

वन खात्याच्या कार्यालया मागून जाणारी वाट १५ मिनिटात एका छप्पर नसलेल्या मंदिरापाशी घेउन येते येथे हनुमानाची व गणपतीची मुर्ती आहे. पुढे ओढा ओलांडल्यावर वासोट्याचा चढ चालू होतो. येथून साधारणपणे १ ते १.३० तासात आपण वासोटा आणि नागेश्वरच्या फ़ाट्यावर पोहोचतो. येथून उजवीकडे जाणारी वाट नागेश्वरला जाते. तर सरळ चढत जाणार्‍या वाटेने ३० मिनिटात गडावर पोहोचता येते. मेट इदंवलीहून मळलेल्या वाटेने २ ते २.३० तासात गडावर पोहोचता येते.

ब) खिरकंडी मार्गे:-
सातार्‍याहून बसने ’वाघाली देवाची’ या गावी यावे. येथून लाँचच्या सहाय्याने जलाशय पार करून खिरकंडी या गावी यावे. येथून धनगर वाडी पासून जाणारी वाट ’मेट इंदवली’ या गावात घेऊन जाते. सातार्‍याहून इथवरचा प्रवास आठ- नऊ तासांचा आहे. येथून पुढे पाच - सहा तासात वासोट्यावर जाता येते.

क) कुसापूर मार्गे:-
सातार्‍याहून बामणोली या गावी यावे. सकाळी ९ वाजता सातार्‍याहून बसची सोय आहे. येथून कुसापूरला कोयना धरणाचा जलाशय लाँचने पार करून जाता येते.तेथून दाट जंगलात दोन वाटा जातात. उजवीकडे जाणारी वाट आठ मैलांवरील नागेश्वराकडे जाते. तर डावीकडे जाणारी वाट वासोट्यावर घेऊन जाते.

ड) महाबळेश्वर मार्गे :-
महाबळेश्वरहून ‘तापोळे’ गावी येऊन लाँचने कुसापूर गाठता येते, आणि तेथून दाट जंगलात दोन वाटा जातात. उजवीकडे जाणारी वाट आठ मैलांवरील नागेश्वराकडे जाते. तर डावीकडे जाणारी वाट वासोट्यावर घेऊन जाते.

२) चिपळूणहून वासोटा :-
अ) चिपळूणहून सकाळी ८.३० वाजताच्या बसने ‘चोरवणे’ या गावी यावे. येथून ४ ते ५ तासाचा उभा चढ चढून नागेश्वरला पोहोचता येते. (या मार्गात वाटेत कुठेच पाणी नसल्यामुळे आपल्याकडे पाण्याचा भरपूर साठा घेऊन जावे.) या वाटेने वर गेल्यावर एक पठार लागते. पठारावरून डावीकडे जाणारी वाट नागेश्वरकडे तर उजवीकडची वाट वासोट्याला जाते. तर सरळ खाली जाणारी वाट नागेश्वर कुंडाकडे जाते. पोढे हि वाट धबधब्याच्या वाटेला मिळते. या वाटेने दगड धोंड्यातून चातल २ ते ३ तासात मेट इंदवलीला पोहोचता येते.
नागेश्वरहून वासोटा समोर दिसतो. डोंगराच्या धारेवरून पुढे खोट्या नागेश्वरला वळसा घालून २ ते ३ तासात वासोट्याला पोहोचता येते.

ब) चिपळूणहून ‘तिवरे’ या गावी यावे, येथून रेडे घाटाने वासोट्याला जाता येते.

Via Nageshwar

It can be said that a visit to Vasota is incomplete without visiting Nageshwar. On our way to Vasota a distinct pinnacle catches our attention. This pinnacle is named Nageshwar. A cave is carved in this pinnacle with a Mahadeo temple inside it. Thousands of devotees crowd this place on Shivratri. Water droplets fall on the Shivling from the rooftop of the cave throughout the year. Most of the trekkers generally visit Nageshwar on their way to Vasota; the only constraint being a walk for a few miles.

Directly to Vasota

a)From Satara:
One can reach Vasota from Satara by three different routes.

i)Via Kusapur:
Board a bus at 9 a.m. from Satara and reach Bamnoli. From here one should come to Kusapur by launch. From Kusapur 2 ways go through dense forest, the left towards Vasota and the one on the right towards Nageshwar.

ii)Via Khirkandi:
Catch a bus from Satara and reach village ‘Waghali Devachi’. Then crossing the Koyana waters by launch arrive at village Khirkandi. From here a way from DhangarWadi takes us at village ‘Met Indavli’. The journey from Satara to this village takes a total of 8-9 hours. You can reach the fort of Vasota from this village after a climb of 5-6 hours.

iii)From Mahabaleshwar:
From Mahabaleshwar get to Tapole village and then further arrive at Kusapur by launch. From Kusapur one can reach Vasota as described above.

b)From Chiplun:

i)Board a bus from Chiplun at 8.30 a.m. and alight at village Choravane. It takes 5-6 hours to reach Vasota from this village. It is to be noted that there is no water on the way and one has to carry his own supply. After climbing for some time one comes across a plateau from where the path on the left goes to Nageshwar and the one on the right to Vasota. As we move ahead along the way to Nageshwar we see another path below that goes to a well through dense forest. We can cut short the total time to Vasota to just 2 hours if we take this path.

ii) Arrive at Tivre village from Chiplun. From here we can reach Vasota via the Rede Ghat.

महत्त्वाची ठिकाणे

वासोटा किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यात पायर्‍या लागतात. या पायर्‍यांपासून उजव्या बाजूला एक पायवाट जाते या वाटेने पुढे गेल्यावर एक दरवाजा दिसतो. या दरवाजाजवळ एक हत्तीचे शिल्पही पडलेले दिसते.हा दरवाजा पाहून परत पाय‍र्‍यांनी वर चढल्यावर आपण वासोटा किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजाने गडावर प्रवेश करतो. वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन दरवाजे होते. यातील पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दुसर्‍य़ा दरवाजाने गडावर प्रवेश केल्यावर समोरच मारुतीचं बिन छपराचं मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते.येथे झाडीत लपलेले वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. पूढे ही वाट कड्यापाशी जाते येथून नागेश्वर व कोकणाचे दर्शन होते. परत मारुती मंदिरापाशी येउन उजव्या बाजूस जाणारी वाट पकडावी ही वाट ’काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. या वाटेवर पहिल्यांदा डाव्या हाताला एक मोठा तलाव दिसतो.या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे गेल्यावर महादेवाचे सुंदर मंदिर व त्याबाजूची वास्तू पाहायला मिळते. येथून चिंचोळी वाट माचीवर घेऊन जाते. या माचीला पाहून लोहगडच्या विंचूकाट्याची आठवण येते. या माचीलाच काळकाईचे ठाणे म्हणतात. या माचीवरून दिसणारा आजुबाजूचा घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव, रसाळ, सुमार, महिपतगड, कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे.

काळकाईचे ठाणे पाहून पुन्हा मारुतीच्या देवळापाशी आल्यावर डावीकडे जाणार्‍या वाटेवर एक चुन्याचा घाणा पडलेला आहे. पुढे गेल्यावर जोड टाकी आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे ही वाट जंगलात शिरते आणि आपण बाबु कड्यापाशी येऊन पोहोचतो. या कड्याचा आकार इंग्रजी ’यू’ अक्षरा सारखा आहे. याला पाहून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण येते. या कड्यावरून समोरच दिसणारा आणि आपले लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच ‘जुना वासोटा’ होय.

जुना वासोटा

नव्या वासोट्याच्या बाबु कड्यावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा डोंगर म्हणजे जुना वासोटा. आता या गडावर जाणारी वाट अस्तित्वात नाही. तसेच पाण्याचाही तुटवडा आहे. घनदाट झाडे व वन्यश्वापदेही असल्याने सहसा येथे कोणी जात नाही.

वासोटा - नागेश्वर ट्रेक :-
नागेश्वरला भेट दिल्याशिवाय वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत नाही. वासोट्यावरुन समोरच एक सुळका आपले लक्ष वेधून घेतो, तो खोटा (छोटा) नागेश्वर , त्याच्या पुढे दुरवर एक सुळका दिसतो त्यालाच नागेश्वर म्हणतात. या सुळक्याच्या पोटात एक गुहा असून, तेथे महादेवाचे मंदिर आहे. हजारो नागरिक दर शिवरात्रीला या पवित्र स्थानी दर्शनास येतात. गुहेच्या छतावरून बाराही महिने पाण्याच्या थेंबांचा अभिषेक शिवलिंगावर होत असतो. बहुतेक ट्रेकर्स प्रथम नागेश्वराचे दर्शन घेऊन मग वासोट्याला जातात. त्यासाठी फक्त लांबचा पल्ला चालण्याची तयारी असावी लागते.

खालील चार वाटांनी वासोटा- नागेश्वर ट्रेक करता येतो
१) सातारा - बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - आल्यावाटेने परत मेट इंदवली.
२) सातारा - बामणोली -मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - नागेश्वर कुंड - ओढ्याची वाट - मेट इंदवली
३) चिपळूण - चोरवणे - नागेश्वर - वासोटा - मेट इंदवली - बामणोली - सातारा.
४) सातारा - बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - चोरवणे - चिपळूण
वरील चारही मार्गाने शरीर - मनाची कसोटी पाहाणारा ट्रेक वेळेचे व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास एका दिवसात करता येतो.

अधिक माहिती फ़ोरमवरील रेंज ट्रेक सेक्शनमधे दिलेली आहे.

Old Vasota

The mountain that is seen from the Babukada on Vasota is Old Vasota. No way exists now that takes us to this fort. In addition there is an acute shortage of water. Also presence of wild animals in the area keeps the trekkers away from this fort.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

वासोटा - नागेश्वर ही दोनही ठिकाणे कोयना अभयरण्यात असल्यामुळे रात्री राहाण्यास परवानगी नाही. तरी आणिबाणीच्या वेळेला खालील ठिकाणी मुक्काम करता येईल.

१) वासोट्यावरील महादेवाच्या मंदिरात २ ते ३ जणांची राहण्याची सोय होते.
२) वासोट्यावर जोड टाक्यांच्या शेजारील पठारावरही राहता येते.
३) नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम जागा आहे. येथे २० ते २५ जण आरामात राहू शकतात.

🍽️

अन्न व्यवस्था

जेवणाची सोय आपण स्वत: …च करावी. अभयारण्य क्षेत्र असल्याने आग पेटवण्यास परवानगी नाही.

💧

पाणी उपलब्धता

वासोट्या वरील जोड टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे.
वासोट्याहून नागेश्वराच्या गुहेकडे जातांना, गुहेच्या अलिकडे (जिथे चोरवण्याहून येणारी वाट मिळते तेथे) उजवीकडून जंगलात जाणारी वाट नागेश्वर कुंडापाशी घेऊन जाते. या कुंडात वर्षभर पाणी असते.

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

अतिरिक्त माहिती

१) बामणोली येथून मेट इंदवलीला जाण्यासाठी बोटी मिळतात. एका बोटीत १२ माणसे घेतात. १ माणुस असो की १२ माणस असोत, एका बोटीचा दर रुपये ३०००/- (२०१४ साली) आहे.
२) बामणोली - मेट इंदवली - वासोटा - नागेश्वर - मेट इंदवली हा ट्रेक करणार असल्यास सूर्य मावळण्यापूर्वी बामणोलीला पोहोचणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी. सूर्य मावळल्या नंतर पोहोचल्यास बामणोली येथे वनखात्याकडून कारवाई केली जाते. (पंचनामा केला जातो व माणशी रुपये १००/- दंड आकारला जातो.) तसेच अंधार पडल्यावर बोट चालवणारे अडवणूक करतात त्यांनाही जास्तीचे पैसे द्यावे लागतात.
३) वासोटा - नागेश्वर परीसर कोयना अभयारण्यात गेल्यामुळे तेथे राहाण्याची परवानगी नाही.
४) चिपळूणहून चोरवणे मार्गे नागेश्वर - वासोट्याला जाताना वाटेत पाण्याची कुठेही सोय नाही, तेव्हा पाण्याचा पुरेसा साठा जवळ बाळगणे आवश्यक आहे.
५) वासोट्याला पावसाळ्यात जळवांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो, तेव्हा आवश्यक ती काळजी घ्यावी.

जवळील गावे

"Bamnoli,Met Indavali,Chorawane"

या परिसरातील इतर किल्ले बामणोली, सातारा

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा