प्रस्तावना
दापोलीजवळील मुरुड हर्णे या प्राचीन बंदर गावात वसलेले दुर्गादेवीचे हे पुरातन मंदिर आहे.
महत्त्व
हे मंदिर पोर्तुगीज घंटा, गध्देगाळ व अष्टभुज दुर्गादेवीच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.
इतिहास
सध्याच्या मंदिराचा जिर्णोध्दार इ.स. १७६३ मध्ये करण्यात आला. मुरुड हर्णे हे प्राचीन बंदर असल्याने मंदिराचा परिसर ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे.
स्थापत्यशास्त्र
सभामंडप कोरीव लाकडी खांबांवर तोललेला असून खांबांवर शरभ व हत्ती कोरलेले आहेत. गाभाऱ्याच्या द्वारपट्टीवर गणेश कोरलेला आहे. दुर्गादेवीची अष्टभुज मूर्ती कर्नाटकातील गंडकी नदीतील शिळेपासून बनवलेली आहे.
कसे पोहोचावे
मुंबईहून दापोली गाठावे. दापोलीहून ८ किमी अंतरावर मुरुड हर्णे गाव असून दुर्गादेवी मंदिरापर्यंत वाहनाने थेट जाता येते.
भेट देण्याचा उत्तम काळ
ऑक्टोबर ते फेब्रुवारी
टीपा
सभामंडपात पोर्तुगीज घंटा असून मंदिराबाहेर झिजलेला गध्देगाळ ठेवलेला आहे.