प्रस्तावना
मुंबई–शिर्डी मार्गावर सिन्नर येथे स्थित गोंदेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिर परिसर दगडी तटबंदीने वेढलेला असून उत्कृष्ट कोरीवकाम आढळते.
इतिहास
या मंदिराची नेमकी उभारणी केव्हा आणि कोणी केली याचा उल्लेख मिळत नाही. यादव राजवटीत बाराव्या शतकात हे मंदिर बांधले असावे.
स्थापत्यशास्त्र
हे मंदिर भूमिजा स्थापत्यशैलीत बांधलेले असून मंदिर संकुलात एकूण पाच मंदिरे आहेत. खांब, छत व भिंतींवर सुंदर नक्षीकाम व शिल्पकला आढळते.
कसे पोहोचावे
नाशिकहून सिन्नर हे गाव ३० किमी अंतरावर असून नाशिक–शिर्डी मार्गावर स्थित आहे. नाशिक ते सिन्नर बस सेवा उपलब्ध आहे.
भेट देण्याचा उत्तम काळ
ऑक्टोबर ते फेब्रुवारी
टीपा
मंदिराभोवती तटबंदी असून सभामंडपात मध्यभागी कासव कोरलेले आहे.