प्रस्तावना
फलटण हे एक प्राचीन शहर असून यादव काळातील जरबेश्वर मंदिर आजही राजवाडा व श्रीराम मंदिराजवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे.
महत्त्व
हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण असून जैन व शैव परंपरेचा संगम दर्शविते.
इतिहास
जरबेश्वर मंदिर हे मूळचे जैन मंदिर असावे. चोवीस तीर्थंकरांच्या मूर्ती व ललाटबिंबातील जिनाची मूर्ती यावरून हे स्पष्ट होते. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३–१९१६) यांच्या काळात येथे महादेवाच्या पिंडीची स्थापना करण्यात आली.
स्थापत्यशास्त्र
उत्तराभिमुख मंदिरास गर्भगृह व प्रवेशमंडप आहे. गर्भगृहाच्या छताखाली चोवीस तीर्थंकरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. अष्टदिक्पाल, सुरसुंदरी, विठ्ठल–रुक्मिणी, नंदी, कासव, गणपती व पाच फण्यांची नागीण यांची शिल्पे उल्लेखनीय आहेत.
कसे पोहोचावे
फलटण शहर रस्त्याने सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. पुणे–फलटण ११० किमी व सातारा–फलटण ६५ किमी अंतरावर आहे.
भेट देण्याचा उत्तम काळ
ऑक्टोबर ते फेब्रुवारी
टीपा
मंदिराच्या बाहेरील मैथून शिल्पांची काही प्रमाणात मोडतोड झालेली आहे.