प्रस्तावना
अश्मयुगात झाडे तोडण्यासाठी माणसाने लांब दांड्याला दगडी त्रिकोण बसवून कुर्हाड तयार केली. पुढे दगडाच्या आकारात बदल होत गेले व लोहयुगात पूर्ण विकसित कुर्हाड अस्तित्वात आली.
इतिहास
युद्धात कुर्हाडीचा उपयोग पूर्वापार होत आला आहे. शिरस्त्राण व चिलखत भेदण्यासाठी कुर्हाड प्रभावी ठरत असे. मात्र लांब दांड्याच्या कुर्हाडी जड असल्याने युद्धात त्यांचा वापर हळूहळू कमी झाला.
तंत्रज्ञान
लांब दांड्यावर बसवलेले पात्याचे शस्त्र
तांत्रिक माहिती
साहित्य:
दगड, लोखंड, लाकूड
दगड, लोखंड, लाकूड
पल्ला:
जवळची व मध्यम अंतराची लढाई
जवळची व मध्यम अंतराची लढाई
फायदे
जोरदार घाव घालण्यास सक्षम; चिलखत भेदण्याची क्षमता
मर्यादा
जड वजनामुळे लवकर थकवा येतो
टीपा
कुर्हाडीचे पाते साधारणतः अर्धगोलाकार असून बर्हिवक्र, अंतर्वक्र किंवा सरळ प्रकारचे असते. दांड्याची लांबी २ ते ४ फूट असते. कुर्हाडीचे प्रकार: गदा, शश्पार, खारीमही, परशू, हैद्राबादी तबर. पवित्रे: प्रक्षेप, परिक्षेप, अभिक्षेप.