शस्त्र यादीकडे परत

भाला

शीत शस्त्र प्राचीन व मध्ययुगीन
Bhala spear first

प्रस्तावना

भाला हे अश्मयुगापासून वापरले जाणारे शस्त्र असून आदिमानवाने शिकार व संरक्षणासाठी हाताची लांबी वाढवण्यासाठी त्याचा वापर केला.

इतिहास

प्रारंभी काठीला गारगोटीचे टोक बांधून भाले बनविले जात. धातूचा शोध लागल्यानंतर पोलादी पात्यांचे भाले तयार झाले. भाला युद्धाच्या सुरुवातीला तसेच हातघाईत प्रभावी ठरला.

तंत्रज्ञान

दांड्यावर बसविलेले भोसकणे व फेकण्याचे शस्त्र

तांत्रिक माहिती

साहित्य:
लाकूड, दगड, लोखंड, पोलाद
वजन:
मध्यम
पल्ला:
जवळची लढाई व फेकण्याचा पल्ला
कार्यपद्धती:
हाताने भोसकणे व फेकणे

भारतातील वापर

पायदळ, घोडदळ व गजदळात मोठ्या प्रमाणावर वापर

फायदे

वापरण्यास सोपे, लांब पल्ल्याचा वार, प्रभावी संरक्षण व आक्रमण

मर्यादा

अतिजवळच्या लढाईत मर्यादित उपयोग

टीपा

भाल्याचे प्रकार: पदांती भाला, अश्वकुंत, गजकुंत, मानाचा भाला, वल्लभ, सांग, बर्ची, विटं, करबल. कुशल भालाचालकाला “भालाईत” म्हणत.