शस्त्र यादीकडे परत

खंजीर

शीत शस्त्र प्राचीन व मध्ययुगीन
khanjir photo first

प्रस्तावना

खंजीर हे हलके, लहान पण अत्यंत घातक शस्त्र आहे. याच्या दुधारी पात्यास दोन ठिकाणी वळणे असल्यामुळे पाते नागमोडी दिसते.

इतिहास

खंजीर हे मुघलांचे प्रमुख अस्त्र होते. ओमान देशात खंजीर हे पारंपरिक शस्त्र असून ओमानच्या राष्ट्रीय ध्वजावर त्याचे प्रतीक आहे. पौगंडावस्थेत पदार्पण केल्यानंतर पुरुष खंजीर बाळगू लागतो. १९७० नंतर खंजीर प्रामुख्याने शोभेचे शस्त्र बनले.

तंत्रज्ञान

दुधारी नागमोडी पात्याचे शस्त्र

तांत्रिक माहिती

साहित्य:
लाकूड, हस्तीदंत, सोने, चांदी
पल्ला:
अतिजवळची लढाई

फायदे

नागमोडी पात्यामुळे घाव खोलवर व जीवघेणा होतो; हलके व सहज वाहून नेता येते

मर्यादा

मर्यादित पल्ला; अगदी जवळून वापर करावा लागतो

टीपा

खंजीराचे पाते साधारण ६ ते १५ इंच लांब असून ते चांदीने मढवलेल्या म्यानात ठेवले जाते.