मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

संतोषगड (Santoshgad) किल्ल्याची ऊंची :  2900
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: म्हसोबा ,सातारा
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. शंभूमहादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग. यापैकी म्हसोबा डोंगररंगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत. हा सर्व परिसर तसा कमी पावसाचाच मात्र ऊसाच्या शेतीमुळे सर्व परिसर सधन झालेला आहे. माण तालुक्यात असणार्‍या या किल्ल्यांना पाहण्यासाठी दोन दिवस लागतात. संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असेही म्हणतात.
10 Photos available for this fort
Santoshgad
Santoshgad
Santoshgad
पहाण्याची ठिकाणे :
संतोषगड हा तीन भागात विभागला आहे. पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुसया टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्लाचा भाग आहे.
किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर एक मठ आहेया मठाच्याच बाजूला एक गुहा आहे. या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. एक वाल्मिकी ऋषिंची मूर्ती आहे. मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे. मात्र येथपर्यंत पोहोचण्यासाठी वळसा घालून यावे लागते. मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते. पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते. येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाजातच घेऊन जाते.
आज किल्ल्याचा दरवाजा मात्र केवळ नाममात्रच शिल्लक रा्हीलेला आहे. दरवाज्यामधील पहारेकयांचा देवड्या आजही सुस्थितित आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच हनूमानाचे टाके आहे. त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष आहेत. धान्य कोठारांच्या भिंती उभ्या आहेत. पण छप्पर उडालेले आहे. याच्याच मागच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे. लांबवरून पाहिल्यास एखादी विहीरच वाटते मात्र जवळ गेल्यावर समजते की खाली प्रचंड मोठ पाण्याचं टाकं आहे आणि टाक्यात उतरण्यासाठी चक्क कातळभिंत कोरून पायर्‍या केलेल्या आहेत. पायर्‍या उतरून टाक्यात गेल्यावर महादेवाचे मंदिर आहे. किल्ल्याची पहिल्या टप्प्यावर असणारी संरक्षक तटबंदी, बुरुज आजही चांगल्या परिस्थित उभे आहेत.किल्ल्याचा संपूर्ण परिसर भटकण्यास दोन तास लागतात. गडावरून फार दूरच्या प्रदेशावर नजर ठेवता येत असे . किल्ल्याच्या पश्चिमेस मोळघाट आहे. याच दक्षिणपूर्व पसरलेल्या डोंगररांगेवर सीताबाईचा डोंगर व वारूगड आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
संतोषगडावर फलटण आणि सातारा दोन्ही शहरातून जाता येते. ताथवडे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. ताथवडेला अनेक मार्गांनी पोहोचता येते. फलटण ते ताथवडे अशी एस टी सेवा दर अर्ध्या तासाला उपलब्ध आहे. फलटण ते ताथवडे हे साधारण १९ किमी चे अंतर आहे. सातार्‍याहून पुसेगाव मोळघाटमार्गे फलटणला जाणार्‍या बसने ताथवडेला उतरता येते. पुसेगाव ते ताथवडे हे साधारण २३ किमी चे अंतर आहे. ताथवडे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित वाट आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. ताथवडे गावात ‘बालसिध्दचे जीर्णोध्दार’ केलेले मंदिर आहे. मंदिराच्या पायरीवरून सन १७६२ मध्ये किल्ल्याचा जीर्णोध्दार केल्याचे समजते.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही ,आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
ताथवडे गावातून अर्धा तास लागतो.
जिल्हा Satara
 अजिंक्यतारा (Ajinkyatara)  भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))  भूषणगड (Bhushangad)  चंदन वंदन (Chandan-vandan)
 दातेगड (Dategad)  गुणवंतगड (Gunawantgad)  जंगली जयगड (Jangli Jaigad)  कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri))
 कमळगड (Kamalgad)  केंजळगड (Kenjalgad)  मधुमकरंदगड (Madhu makarandgad)  महिमानगड (Mahimangad)
 पांडवगड (Pandavgad)  पाटेश्वर (Pateshwar)  प्रतापगड (Pratapgad)  सदाशिवगड (Sadashivgad)
 सज्जनगड (Sajjangad)  संतोषगड (Santoshgad)  वैराटगड (Vairatgad)  वर्धनगड (Vardhangad)
 वारुगड (Varugad)  वसंतगड (Vasantgad)  वासोटा (Vasota)