जीवधन

गिरीदुर्ग पुणे नाणेघाट
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
3754
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
पुणे

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Darwaja on Jivdhan Fort.

Darwaja on Jivdhan Fort.

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

प्रस्तावना

घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती, १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज ’मूर्तिजा निजाम’ याला जीवधन या गडावर कैदेत असताना त्याला सोडवून संगमनेरजवळ असणार्‍या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. त्याला निजामशहा म्हणून घोषित केले आणि स्व:त… वजीर बनले. गाव गोरक्षगडाप्रमाणे या गडांचा दरवाजादेखील कातळकड्यामध्ये कोरलेला आहे

महत्त्वाची ठिकाणे

गडाचा आकार आयताकृती आहे. पश्चिम दरवाज्याने गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे गावकरी याला ’कोठी’ असे संबोधितात. जवळच पाण्याची टाके आहेत. दक्षिणेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. तसेच गडावर अंतर्भागात एकात एक अशी पाच धान्यकोठारं आहेत. आत कमलपुष्पे कोरलेली आहेत. शेवटच्या इंग्रज मराठे युद्धात १८१८ मध्ये या कोठारांना आग लागली होती. ती राख आजही या कोठारांमध्ये आढळते. गडाच्या एका टोकाला गेल्यावर समोरच दोन हजार फूटांचा वांदरलिंगी सुळका लक्ष वेधून घेतो. गडावरून नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्वराचे मंदिर, धसइचे छोटेसे धरण, माळशेज घाटातील काळे तुकतुकीत रस्ते न्याहाळता येतात.

कसे पोहोचावे

१ कल्याण - नगर मार्गे :-
कल्याण - नगर मार्गात नाणेघाट चढून गेल्यावर पठार लागते. या पठारावरून उजवीकडे जंगलात एक वाट जाते. या वाटेने दोन ओढे लागतात, हे ओढे पार केल्यावर एक कातळभिंत लागते. या भिंतीला चिकटून उजवीकडे जाणारी वाट वांदरलिंगी सुळक्यापाशी घेऊन जाते, तर डावीकडे जाणारी वाट एका खिंडीपाशी पोहोचते. जीव मुठीत धरून त्या उभ्या कातळभिंती पार केल्यावर पुन्हा कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. सन १८१८ नंतर सुरुंग लावून इंग्रजांनी हा मार्ग चिणून काढला व पश्चिम दरवाज्याची वाट बुजवून टाकली. या दरवाज्याने वर जाण्यास अनेक वानरयुक्त्या योजाव्या लागतात. वाट जरा अवघडच असल्याने जपूनच जावे लागते. (नाणेघाटला कसे पोहोचावे हे पाहाण्यासाठी साईट वरील नाणेघाटाची माहिती वाचावी.)


२ जुन्नर - घाटघर मार्गे :-
गडावर जाणारी दुसरी वाट जुन्नर - घाटघर मार्गे राजदरवाज्याची आहे. ही वाट घाटघरहून सरळ गडावर जाते. हि वाट अत्यंत सोपी आहे.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ घाटघर गावातून जीवधनवर जाण्यास २ तास लागतात.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

गडावर रहाण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

जेवणाची सोय आपण स्वत:…च करावी.

💧

पाणी उपलब्धता

गडावर बारमाही पाण्याची टाकी आहेत.

सर्वोत्तम काळ

🌤️ N/A

जवळील गावे

घाटघर

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा

किल्ले स्वच्छ ठेवा

किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.