शिवनेरी
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Shivneri - On the way from fort of Chavand to Shivneri
प्रस्तावना
शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे हे जन्मस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून शिवनेरी हे महाराष्ट्राचे तिर्थक्षेत्र बनलेले आहे. आजही असंख्य अबालवृध्द या किल्ल्याला आणि शिव जन्मस्थानाला भेट देऊन नतमस्तक होतात.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
’जीर्णनगर’, ’जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग, या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावर दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर या भागात अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता.
इ.स. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक उत्तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक उत्तुजार प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला.
मोगल, निजामशाही , आदिलशाही यांच्या मध्ये चाललेल्या लढायांच्या धामधुमीत असलेल्या शहाजी राजांनी गरोदर असलेल्या जिजाबाईंना सुरक्षित प्रवेशव्दारांचे ठेवण्यासाठी जुन्नर मावळातल्या शिवनेरी किल्ल्याची निवड केली. किल्ल्याच्या डोंगराला असलेले ताशीव कडे, भक्कम तटबंदी , बलाढ्य बुरुज आणि किल्ल्याला असणार्या सात प्रवशेव्दारांचे संरक्षण यामुळे किल्ला सुरक्षित होता. जिजाबाईंसोबत सोबत ५०० स्वार देऊन शहाजी राजांनी त्यांना शिवनेरीवर पाठवले. त्यावेळी शिवनेरी गडाचे गडकरी विजयराव सिधोजी विश्वासराव हे शहाजी राजांच्या नात्यातले होते. गडाची अधिष्ठात्री शिवाई देवीला जिजाऊने मनोमन नवस केला "आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन ". शालिवाहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, उत्तरायणातं, फ़ाल्गुन महिन्यात, वद्य तृतीयेला, शिशिर ऋतूत, हस्त नक्षत्रावर, सिंह लग्नावर (दिनांक १९ फ़ेब्रुवारी १६३० रोजी) शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला .
इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये तो गड मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले, यात मोगलांचा विजय झाला. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत करण्यात आला.
इ.स. १७७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंधात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
कसे पोहोचावे
गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.
१) साखळीची वाट :-
या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात.डाव्या बाजूस जाणार्या रस्त्याने साधारणत: एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पायर्यांच्या साह्याने वर पोहोचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहोचण्यास पाऊण तास लागतो.
२) सात दरवाज्यांची वाट :-
शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी दीड तास लागतो.
३) मुंबईहून माळशेज मार्गे :-
जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटरवर ‘शिवनेरी १९ किमी’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहोचण्यास एक तास लागतो
Ways to reach Junnar
1) From Mumbai or Kalyan one can reach Junnar via Malshej Ghat or via Khandala Ghat. Route via Malshej Ghat is the preferable as it takes less time. Buses ply hourly from Kalyan towards Junnar. Distance from Mumbai is approximately 100 km.
2) From Pune or Shivaji Nagar one can take buses for Junnar. Buses ply hourly for Junnar from these bus stands.
3) On Kalyan – Nagar road there lie two diversions:
a) Bangar Phata
b) Aale Phata.
One can also descend at any one of these diversions and use local transport to reach Junnar city.
Ways to reach on Shivneri
1) A 2 km walk from Junnar bus stand takes us to the foothills of Shivneri, right up to the steps. This route is the main one, through 7 magnificent doors.
On this side is the temple of Goddess Shivai. Shivaji was named after the name of the deity. This is situated in the place where stands the cave carved by the Buddhists during the Satvaahan era. To the right of the temple are few more caves. On the walls of second cave is an inscription. Two more are found on the walls of neighboring caves. In all there are 64 caves carved in the walls of mountain on which Shivneri is built. Many people traverse through this route, as it is very easy.
2) Second route to climb this fort is to ascend from the eastern face. This route is little tiring. From this route it hardly takes 1 hour to reach at the top from the base stand. On the way there is a temple of Hanuman. One has to take a path on the right side of the temple. This small path takes us to the reserved forest. In this forest there lays the path to reach to top. One has to be careful, as there are many paths that can mislead us. Traversing upwards for 20 minutes takes us to the rock cut caves on the eastern side of the fort. On the left we can see steps running upwards. After ascending this steps we can reach top in 10 minutes.
महत्त्वाची ठिकाणे
जुन्नरहून डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर जातांना सात प्रवेशव्दारे लागतात. त्यांना काळाच्या ओघात प्रचलित झालेली नाव आहेत. पहिला महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा , तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा पीर दरवाजा , पाचवा हत्ती दरवाजा, सहावा मेणा दरवाजा, आणि सातवा कुलूप दरवाजा . यातील हत्ती दरवाजाच्या वरच्या बाजूस पाण्याचे टाके आणि गुहा आहे. जुन्नर या प्राचीन बाजारपेठेचा पाठीराखा असलेल्या या किल्ल्यावर अनेक राजवटींच्या काळात लेणी , टाकी खोदली गेली, बांधकामे केली गेली. किल्ल्याची भटकंती करतांना या मोठ्या काळात झालेले बदल पाहायला मिळतात.
सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पूढे गेल्यावर शिवाई दरवाजा लागतो. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे’ मंदिर लागते. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या मागे असणार्या कड्यात ६ ते ७ लेणी समुह (गुहा) आहेत. शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. पूर्वीच्या काळी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात, एक वाट समोरच असणार्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगाह आहे. या कोळी चौथर्याकडे जातांना उजव्या बाजूला काही टाकी आहेत. तसेच टेकडीच्या खालच्या टप्प्यावर काही टाकी आहेत.
अंबरखान्यापासून दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते, वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. जिजाउंच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी, हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा अविर्भावातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा’ मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला, तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी तलाव’ आहे. येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे. शिवनेरी किल्ल्यावरून चावंड, नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो . किल्ल्याच्या टोकावरुन पुन्हा शिवकुंजाशी आल्यावर दोन वाटा फ़ुटतात, एक वाट साखळदंडाच्या मार्गकडे जाते. या मार्गावर एक गुहा आणि त्यामध्ये टाक आहे. हे पाहून मागे वळून पुन्हा शिवकुंजाकडे येतांना एक वाट डावीकडे वळते. ही पायवाट वापरात नसल्याने अस्पष्ट आहे, या वाटेने पुढे जाऊन खाली उतरत गेल्यावर पाण्याची दोन मोठी बांधीव टाकी आहेत. ती टाकी पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला काही उध्वस्त वास्तू पाहायला मिळतात. पुढे हीच वाट कोठारापाशी येते. कोठारांपासून किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते.
किल्ला संपूर्ण पाहाण्यासाठी २ ते ३ तास लागतात.
1)Shiv Janmasthan:
This is the place on the fort where the birth of Shivaji Maharaj took place. This place is named as Shiv Mandir. Ahead of Shiv Mandir there is a huge water tank.
2) Kadelot point
This is the place where prisoners were punished by throwing them down the fort. This point is on the northern end of the fort.
3)Shiv Kunj
Shiv Kunj is a monument constructed by the state government, in honor of Chatrapati Shivaji Maharaj. Inside Shiv Kunj there is an idol of Bal Shivaji and Jijabai made of “Panchdhatu” (An alloy of 5 metals.)
4) Kamani Masjid
In front of Shiv Kunj on can see this Kamani Masjid. It might have been named Kamani because the top of this structure is like bow that is called as Kaman in Hindi. On the east-facing wall there is an inscription in Urdu.
5) Ganga Jamuna
These are the water cisterns behind the Shiv Kunj. Water in these cisterns is potable. On whole of Shivneri there are more than 10 water tanks.
6) Koli Chauthara
This monument is built in the place where Mughals killed thousands of Koli soldiers in the year 1650.
7) Ambarkhana
Every fort needs to have a warehouse for its storage of grains and food products. Ambarkhana is the place where huge amount of grain can be stored. The caretakers here keep this place very clean.
When descending/ascending through the way near Ambarkhana all the seven doors of the fort can be visited. These doors help us to imagine the strength this fort would have given to its defender. The sequence of these doors is as follows
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
या किल्ल्यावर शिवकुंजाच्या मागील बाजूस असणार्या वर्हांड्यामध्ये १० ते १२ जणांची रहाण्याची सोय होते.
अन्न व्यवस्था
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वत:च करावी.
पाणी उपलब्धता
गंगा व जमुना या टाक्यांमध्ये बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
जवळील गावे
Junnar
या परिसरातील इतर किल्ले नाणेघाट
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा