पन्हाळगड
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Water reservoir at Panhalgad
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
Fort
Fort
प्रस्तावना
महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्य साधारण महत्व असलेला किल्ला म्हणजे पन्हाळा किल्ला होय. वेगवेगळ्या काळात दोन वेळा राजधानीचा मान मिळालेला हा किल्ला आजही नांदता आहे. कोकण व घाटमाथा यांच्या सरहद्दीवर असणार्या या किल्ल्यावर पाहाण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत. थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे राहाण्याची व खाण्याची उत्तम सोय आहे. त्यामुळे विशेष कष्ट न घेता पाहाता येण्या सारखा असलेला पन्हाळा किल्ला प्रत्येकाने एकदा तरी पाहावा असा आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
पन्हाळा किल्ला इ.स.पूर्व तिसर्या शतकात प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव ‘पन्नग्नालय’. पराशर ॠषींनी इथे तपश्चर्या केली म्हणून हा किल्ला "पराशराश्रम" या नावानेही ओळखला जात असे. या किल्ल्यावर असलेल्या तळ्यात फुलणार्या कमळांमुळे याला "पद्मालय" असे ही म्हटले जाई. ब्रम्हदेवाने या डोंगरावर तपश्चर्या केल्यामुळे पुराणात याचा उल्लेख "ब्रम्हशैल’ या नावाने आहे.
शिलाहर राजा भोज (इ.स.११७८-१२०९) याची पन्हाळा किल्ला ही राजधानी होती. देवगिरीच्या यादवांकडून पराभव झाल्यावर हा किल्ला यादवाम्या ताब्यात गेला. यादवांनंतर १४८९ मध्ये पन्हाळा किल्ला विजापूरकरांकडे गेला. इ.स. १६५९ मध्ये अफजलवधानंर १८ दिवसातच शिवरायांनी हा किल्ला घेतला. २ मार्च १६६० मध्ये किल्ल्यास सिध्दी जौहरचा वेढा पडला. सिद्द जौहरच्या वेढ्यानंतर महाराजांनी हा किल्ला विजापुररांच्या ताब्यात दिला. पण १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनितिचा उपयोग करून महाराजांनी तो पुन्हा किल्ला ताब्यात घेतला.
शिवाजी महाराजांनंतर किल्ल्याचा ताबा मुघलांकडे गेला. इ.स. १६९२ परशुराम त्र्यंबक याने पन्हाळा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला. औरंगजेबाने इ.स. १७०१ मध्ये हा किल्ला जिंकला. त्याच वर्षी रामचंद्र्पंत आमात्र्यांनी तो परत जिंकून घेतला. पुढे १७०५ मध्ये ताराराणींनी "पन्हाळा" ही कोल्हापूरची राजधानी बनविली. १७०८ मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला ताराराणीं कडून जिंकून घेतला. इ.स. १७०९ मध्ये ताराराणीं हा किल्ला परत जिंकून घेतला . त्यानंतर १७८२ पर्यंत "पन्हाळा" ही कोल्हापूरची राजधानी होती. इ.स. १८२७ मध्ये पन्हाळा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
कवी मोरोपंत पराडकर यांचा जन्म याच किल्ल्यावर झाला होता.
कसे पोहोचावे
चार दरवाजा मार्गे :-
कोल्हापूर शहरातून ‘एस टी’ बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते.
From Char Darwaja
From Kolhapur city you can easily opt for a Bus or hire a vehicle which takes us to the top from Char Darwaja.
From Teen Darwaja
This is another way which goes to the fort from 3 Darwaja.
महत्त्वाची ठिकाणे
पन्हाळा किल्ला व्यवस्थित आणि सुटसुटीतपणे पाहाण्यासाठी किल्ल्याचे काही भाग करुन एकेका भागात गाडीने जाऊन तो परिसर चालत फ़िरल्यास किल्ला व्यवस्थितपणे पाहून होतो.
१) शिवा कशिद पुतळा आणि चार दरवाजा परिसर :-
गाडी रस्त्याने पन्हाळा किल्ल्यावर आल्यावर नगरपालिकेचा टोल बुथ आहे. त्याठिकाणी उतरल्यावर उजव्या बाजूला "शिवा काशिद" यांचा पुतळा आहे. या पुतळ्याच्या मागे तटबंदी आणि बुरुजाचे अवशेष पाहायला मिळातात. या पुतळ्या समोरच्या डोंगरावरी बुरुज आणि तटबंदी पाहायला मिळते. पूर्वी याठिकाणी सलग तटबंदी होती. तटबंदीत किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे होते. पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा "चार दरवाजा" इ.स १८४४ मध्ये हा दरवाजा इंग्रजांनी ते चार दरवाजे पाडून त्यातून सध्याचा रस्ता बनवलेला आहे. या रस्त्याच्या दरीकडील बाजूला पुरातत्व खात्याने उत्खनन केलेले आहे. तेथे या चार दरवाजांचे अवशेष पाहायला मिळतात.
चार दरवाजा पाहून रस्ता ओलांडल्यावर एक मोठा तलाव दिसतो. या तलावाच्या बाजूला "सदोबा (साधोबा) दर्गा" आहे. दर्ग्याच्या बाजूला "सदोबा (साधोबा) तलाव" आहे. या तलावातील दगड तटबंदी, बुरुज आणि प्रवेशव्दार बांधण्यासाठी वापरण्यात आलेले आहेत. या तलावाच्या बाजूने एक छोटा रस्ता रस्ता जातो. या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूला "पराशर तीर्थ" (पराशर आश्रम) आहे. या ठिकाणी मंदिर असून त्यात शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर गणपतीची मुर्ती आहे. मंदिरा समोर असलेल्या झाडाखाली काही समाध्यांचे दगड पाहायला मिळतात. पराशर मुनींचा आश्रम याच ठिकाणी होता आणि पराशर मुनी आणि त्यांची पत्नी सत्यवती यांनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती असे मानले जाते.
पराशर तीर्थ (पराशर आश्रम) पाहून पुढे गेल्यावर एक बारव आहे. त्याला "नागझरी तिर्थ" या नावाने ओळखले जाते. याबद्दल अशी दंतकथा आहे की, पराशर ऋषींच्या तपश्चर्येने संतप्त झालेल्या नांगानी पन्हाळ्यावरील सर्व पाण्यचे स्त्रोत नष्ट केले. पराशर मुनींना हे कळले तरी त्यांनी नागांन शाप न देता अभय दिले. त्यामुळे नागांचे मनपरिवर्तन होऊन त्यांनी पाताळ गंगेचा एक झरा यठिकाणी भूतलावर आणला. नागझरीतील पाणी बाराही महिने वाहात असते.
नागझरी पाहून पुढे चालत गेल्यावर डांबरी रस्ता संपतो व पायर्यां चा मार्ग चालू होतो. या पायर्यां नी ५ मिनिटे चढून गेल्यावर डाव्या बाजूला "विठ्ठल मंदिर" आहे. मंदिरात विठ्ठल, राई आणि रखुमाईच्या मुर्ती आहेत. मंदिराच्या समोर दिपमाळा आहेत. मंदिर परिसरात पराशर मुनींनी स्थापन केलेले “नागेश मंदिर” हे शंकराचे मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला पराशर मुनींची पत्नी सत्यवती यांच्या स्मृती प्रित्यर्थ बांधलेले “तुळशी वृंदावन” आहे. याशिवाय अजु्न दोन तुळशी वृदांवन या मंदिराच्या परिसरात आहेत.
विठ्ठल मंदिरावरुन पुढे जाणारी पायर्यं्ची वाट लता मंगेशकर यांच्या बंगल्याकडे जाते. पण तेथे न जाता पुन्हा आल्या मार्गाने शिवा काशिद यांच्या पुतळ्यापाशी आल्यावर आपले या भागातील किल्ल्यावरचे अवशेष पाहून होतात.
शिवा काशिद पुतळ्या पासून गाडीने बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापाशी जावे.
२) बाजीप्रभू देशपांडे पुतळा आणि तीन दरवाजा परिसर :-
याठिकाणी चौकात वीररत्न बाजीप्रभुं देशपांडे यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे. या पुतळ्या पासून एक रस्ता "अंधार बाव" (शृंगार बाव) कडे जातो. याठिकाणी तीन कमानीची, काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात खालच्या मजल्यावर पाण्याची खोल चौकोनी विहीर आहे. मधल्या मजल्यावर तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा आहे. सर्वात वरच्या मजल्यावर राहाण्याची सोय आहे. या इमारतीत एक शिलालेख आहे.
अंधार बाव पाहून उजवीकडे २ मिनिटे चालत गेल्यावर आपण "तीन दरवाजा" समोर पोहोचतो. हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा. याला कोकण दरवाजा असेही म्हणतात. येथे उजव्या बाजूला हनुमान मंदिर आहे. पहिल्या प्रवेशव्दाराला एक १५ फ़ुट उंच मुख्य कमान आहे. त्याच्या बाजूला दोन छोट्या (३ फूट उंचीच्या कमानी) आहेत. प्रवेशव्दारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला पाहारेकर्यां साठी देवड्या आहेत. प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर आपण एका चौकात पोहोचतो. या प्रवेशव्दाराच्या आतल्या कमानीवर सुंदर नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. वरच्या बाजूला दोन शरभ कोरलेले पाहायला मिळतात. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला एक चौकोनी विहिर आहे. दोन प्रवेशव्दारांच्या मध्ये असलेल्या चौकात दोन बाजूंना दालने आहेत. चौकातून बाहेर पडण्यासाठी अजून एक प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारावर एक छोटे दालन आहे. त्याची कमानदार गवाक्ष चौकातून पाहायला मिळतात. या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला पाहारेकर्यांासाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर प्रवेशव्दाराची भव्य कमान आणि त्यावरच्या चर्या पाहायला मिळतात. या प्रवेशव्दाराच्या कमानीवर एक फ़ारसी शिलालेख आहे. या प्रवेशव्दारामधून एक डांबरी रस्ता किल्ल्या खालच्या गावात जातो. प्रवेशव्दारापासून दोन्ही बाजूला जाणारी तटबंदी पाहायला मिळते. या तटबंदीत असलेला अंधार बाव संकुलातील चोर दरवाजा येथून पाहाता येतो.
तीन दरवाजा पाहून दरवाजा बाहेर असणार्या हनुमान मंदिरा पाशी येऊन हनुमान मंदिराकडे पाठ करुन सरळ चालत गेल्यावर आपण डेरेदार वृक्षांच्या सावलीत शिरतो. येथे असलेल्या पायवाटेने चालत जातांना डाव्या बाजूला एक छोटेसे मंदिर आहे. त्यात शिवलिंग आणि सर्पशिळा आहे. त्याच्या बाजूला नगरपालिकेने बांधलेले विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाच्या चौथर्यात अनेक नक्षीदार आणि घडीव दगड पाहायला मिळतात. याठिकाणी कधीकाळी एखादी वास्तू असावी याच चौथर्या वर विश्रामगृह बांधलेले असावे. पायवाटेने पुढे चालत गेल्यावर एक छोटा ओढा उजव्या बाजूने वाहाताना दिसतो. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक मंदिर आहे. मंदिरात श्रीकृष्ण, हनुमानाची मुर्ती आणि शंकराची पिंड आहे. या मंदिराच्या पुढे एक आयताकृती बारव आहे. तीला "गोपाळतीर्थ" या नावाने ओळखले जाते. या बारवेच्या बाजूला चार फूट उंच चौथर्य़ा्वर दोन नक्षीदार घुमटी आहेत. वसंतराव आणि खंडेराव गायकवाड यांच्या या समाधी आहेत. हे सर्व पाहून आल्या वाटेने तीन दरवाजा आणि तेथुन बाजीप्रभुं देशपांडे यांचा पुतळ्याकडे आल्यावर आपले या भागातील किल्ल्यावरचे अवशेष पाहून होतात.
बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्या पासून गाडीने अंधारबाव पाशी येऊन त्याच रस्त्याने पुढे काली बुरुजाकडे सरळ जावे.
३) काली बुरुज परिसर :-
अंधारबाव पासून काली बुरुजाकडे जाणार्याू रस्त्याच्या उजव्या बाजूला तटबंदी आहे. अंधारबाव पासून ५ मिनिटा़च्या अंतरावर तटबंदीत “तीन कमानी” दिसतात. या ठिकाणी तटबंदीत दोन प्रशस्त दालन आहेत. यांना तालिमखाना असे म्हटले जाते. या दालनां जवळ तटबंदीवर जाण्यासाठी पाययानि असलेला बुरुज आहे. या दालनांच्या पुढे तटबंदीत एक छोटे ६ फ़ूट उंच “प्रवेशव्दार” आहे. त्यात लाकडी दरवाजा बसवण्यासाठी दगडात कोरलेली बीजाग्री पण पाहायला मिळतात. या दरवाजाचे रक्षण करणार्याय सैनिेकांसाठी तटबंदीत दोन दालन बांधलेली होती. त्या ठिकाणी तालिमखाना असण्याची शक्यता नाही. या दरवाजाच्या पुढे तटबंदीवर जाण्यासाठी पाययाी व असलेला अजून एक बुरुज आहे. हे सर्व पाहून रस्त्याने काली बुरुजाकडे जातांना लता मंगेशकर यांच्या बंगल्या जवळ डाव्या बाजूला एक रस्ता जातो. या रस्त्याने २ मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूला डोंगरात एक गुहा दिसते. पायवाटेने या गुहे पर्यंत चढत जातांना एक समाधी पाहायला मिळते. जांभ्या दगडात खोदलेल्या या गुहेला "पराशर गुहा" या नावाने ओळाखले जाते. गुहा पाहून पुन्हा लता मंगेशकर यांच्या बंगल्या जवळ येऊन रस्त्याने पुढे गेल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. या पठाराला तटबंदी आहे. तटबंदीच्या टोकाला "काली बुरुज" आहे. काली बुरुजाच्या बाजूला तटबंदीत चोर दरवाजा आहे. काली बुरुज पाहून उजवीकडे वळून तसेच पुढे गेल्यावर पठाराच्या दुसर्य़ाय टोकाला तीन बुरुज आणि तटबंदी पाहायला मिळते. या बुरुज आणि तटबंदीच्या मागच्या बाजूला “परकोट” आहे. या परकोटात जाण्यासाठी तिन्ही बुरुजांजवळ ६ फ़ूट उंच ४ प्रवेशव्दारे आहेत. परकोटाला ६ बुरुज आणि आहेत. परकोट पाहून झाल्यावर आपले काली बुरुज परिसरातील अवशेष पाहून होतात.
काली बुरुज परिसर पाहून पुन्हा बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापाशी येऊन पन्हाळा बस स्टॅंडवर जावे. कोल्हापूरहून येणार्यां आणि जाणार्य़ा् बसेस याठिकाणी थांबतात.
४) सोमेश्वर (सोमाळे) तलाव परिसर :-
बस स्थानकाच्या मागे मोरोपंत वाचनालय आहे. प्राचीन मराठी पंडीत कवींचे अग्रणी, आर्याभारतकार मोरेश्वर रामचंद्र पराडकर यांचा जन्म पन्हाळगडावर इसवीसन १७२९ मध्ये झाला. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली होती. बस स्थानकाच्या बाजूला “राम मंदिर” आहे. राम मंदिराच्या बाजूला पायर्याे असलेली “बारव” आहे. बारव पाहून पुढे चालत गेल्यावर सोमेश्वर (सोमाळे) तलाव आहे. गडाच्या पेठे लगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर “सोमेश्वर मंदिर” आहे. या मंदिरात महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्र्यांपनी लक्ष्य चाफ्र्यांमची फुले वाहिली होती. तळ्याच्या काठावर असलेल्या एका वास्तूत शिवलिंग आणि वीरगळ पाहायला मिळते. तलाव पाहून पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूला “रेडे महाल” नावाने ओळखली जणारी एक भव्य आणि आडवी इमारत दिसते. त्यात नंतरच्या काळात जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणतात. पण या महालाची रचना व त्यातील कमानी व कोरीव काम पाहाता हा रेडे महाल नसून डेरे महाल असावा. खासांच्या निवासासाठी याची योजना असावी. डेरे महालाच्या समोर. रस्त्यालगत “रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी” आहे. दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे.
रामचंद्रपंत आमात्य यांची समाधी पाहून पुढे गेल्यावर रेडे महालाच्या बाजूला एक छोटे तटबंदी, प्रवेशव्दार असलेले मंदिर आहे. हे स्मृती मंदिर छ. राजारामांचा पूत्र संभाजी (१७१४-१७६०) याचे आहे. “संभाजी मंदिरात” शिलालेख आहे, तर मंदिराच्या आवारात तोफ़ा, विहीर व घोड्याच्या पागा आहेत. प्रवेशव्दाराच्या वर असलेल्या नगारखान्यात आजही नगारा वाजवला जातो. संभाजी मंदिराच्या समोर रस्त्याच्या पलिकडे संभाजी महाराजांची पत्नी “जिजाबाई यांचे स्मृती मंदिर” आहे. हि मंदिर पाहून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला धर्मकोठीची भव्य इमारत आहे. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म केला जात असे. धर्मकोठीच्या समोर रस्त्याच्या पलिकडे एक वाट “नायकिणीच्या (कलावंतीणीच्या) वाड्याकडे” जाते. वाड्याकडे जातांना रस्त्यालगतच एक विहिर असून त्याच्या बाजूला एक दगडी ढोणी पडलेली आहे. नायकीणीचा वाडा तटबंदी लगत असून वाड्याच्या गवाक्षातून आणि गच्ची वरुन चार दरवाजा ते पावनगड हा विस्तृत प्रदेश दिसतो.
नायकिणीचा वाडा पाहून आल्या रस्त्याने चालत बस स्थानका पर्यंत येऊन पुढे गाडीने वरच्या बाजूस गेल्यावर २ मिनिटात आपण “अंबाबाई (महालक्ष्मी) आणि ब्रम्हेश्वर मंदिरा”पाशी पोहोचतो. अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय. हि मंदिरे पाहून झाल्यावर आपले सोमेश्वर तळे या भागातील किल्ल्यावरचे अवशेष पाहून होतात.
अंबाबाई (महालक्ष्मी) आणि ब्रम्हेश्वर मंदिरा पाहून खालच्या दिशेला जाणार्या रस्त्याने २ मिनिटात आपण ताराराणी राजवाडा परिसरात पोहोचतो.
५) ताराराणीं राजवाडा आणि छ.शिवाजी महाराज मंदिर परिसर :-
ताराराणींने इ.स. १७०८ मध्ये हा “राजवाडा” बांधला. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलटरी होस्टेल आहे. वाड्या समोरच्या पटांगणात एक स्टेज उभारुन त्यावर दोन तोफ़ा गाड्यावर ठेवलेल्या आहेत. छ.शिवाजी महाराजांचे ताराराणी राजवाड्याच्या समोर “छ.शिवाजी महाराजांचे मंदिर” आहे. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले. मंदिरात शिवाजी महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्ती शेजारी ताराराणींच्या पादूका आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस इ.स. पूर्व तिसर्याय शतकातील “३ गुहा” आहेत. छ. शिवाजी महाराज मंदिराच्या डावीकडे पायर्यां ची वाट आहे . यावाटेने वर गेल्यावर उजव्या बाजूला “महादेवाचे मंदिर” आहे. मंदिराच्या मागे “२ गुहा” आहेत. ही सर्व ठिकाणे पाहून झाल्यावर या परिसरातील किल्ल्याचे अवशेष पाहून होतात.
ताराराणी राजवाड्याकडून एक रस्ता तबक उद्यानाकडे जातो. त्या रस्त्याने गाडीने २ मिनिटात आपण तबक उद्यानाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो.
६) तबक उद्यान - वाघ दरवाजा - सज्जा कोठी परिसर :-
तबक उद्यानात प्रवेश करुन एक चढ चढून उतरल्यावर आपण “वाघ दरवाजा”पाशी पोहोचतो. या ठिकाणी दोन प्रवेशव्दार असावित. त्यातील एक नष्ट झालेले आहे. त्यामुळे आपण थेट दोन प्रवेशव्दारांच्या मधल्या चौकात पोहोचतो. या ठिकाणी दोन बाजूला दालन/ देवड्या आहेत. त्यांच्यावर चढून जाण्यासाठी जीने आहेत. वाघ दरवाजातून बाहेर पडून खाली उतरुन गेल्यावर तबक उद्यानात पोहोचता येते. वाघ दरवाजा पाहून प्रवेशव्दारातून आत येऊन डाव्या बाजूच्या जीन्याने प्रवेशव्दारावर चढून गेल्यावर आपण एका पायवाटेवर येतो. या पायवाटेने १० मिनिटात आपण दौलत बुरुजापाशी पोहोचतो. “दौलत बुरुज” वाघ दरवाजाच्या बरोबर समोर आहे. वाघ दरवाजाचे रक्षण करण्यासाठी त्याची योजना केलेली आहे. याच पायवाटेने पुढे गेल्यावर “बाजीप्रभू बुरुज” पाहायला मिळतो. या बुरुजाजवळ तटबंदी लगत खालच्या बाजूला “चोर दरवाजा” आहे. तो दरवाजा पाहून समोर दिसणार्या “सज्जा कोठी” पर्यंत पोहोचायला ५ मिनिटे लागतात. सज्जा कोठी जवळ एक वास्तू आहे. सजाकोठीची २ मजली इमारत इ.स. १००८ मध्ये बांधण्यात आली होती. पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी या इमारतीत छ. शिवाजी महाराजांची गुप्त खलबते चालत .याच इमारतीत छ. संभाजी राजांना शिवरायांनी या प्रांताचा कारभार पाहाण्यासाठी ठेवले होते. सज्जा कोठी पाहून परत आलेल्या रस्त्याने परत न जाता सरळ चालत गेल्यावर ५ मिनिटात आपण तबक उद्यानाच्या प्रवेशव्दारापाशी येतो. येथे आल्यावर आपले तबक उद्यान आणि सज्जा कोठी परिसरातील किल्ल्याचे अवशेष पाहून होतात.
तबक उद्यानाकडून एक रस्ता पुसाटी बुरुजाकडे जातो.
७) पुसाटी बुरुज, दुतोंडी बुरुज आणि खोकड तलाव परिसर :-
तबक उद्यानाकडून पुसाटी बुरुजाकडे जातांना रस्त्याच्या समांतर उजव्या बाजूला गडाची तटबंदी आहे. या तटबंदीत एक दोन बाजूला जीने असणारा बुरुज आहे. त्याला “दुतोंडी बुरुज” या नावाने ओळखले जाते. या बुरुजा खाली एक पाहारेकर्यां ना उन पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी एक खोली बनवलेली पाहायला मिळते. दुतोंडी बुरुजापासून पुढे गेल्यावर वन खात्याने फ़ाटक लावून रस्ता बंद केलेला आहे. त्या फ़ाटकाच्या आधी उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता गेलेला आहे. या रस्त्याने पुढे गेल्यावर आपण “राजदिंडी” पाशी पोहोचतो. या ठिकाणी किल्ल्याचा चोर दरवाजा असावा. त्याअचे संरक्षण करण्यासाठी त्याच्या समोरच्या बाजूला बुरुज आहे. एकेकाळी दुर्गम असणार्या् या वाटेनेच छ. शिवाजी महाराज गडाखाली उतरले होते आणि सिध्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. सध्या याठिकाणी तटबंदी फ़ोडून वनखात्याने कच्चा रस्ता बांधलेला आहे. राजदिंडी पाहून परत फ़ाटकापाशी आल्यावर किल्ल्याचे पुसाटी बुरुजाकडील अवशेष पाहाण्य़ासाठी आपल्याला चालत जावे लागते. या रस्त्याला उजव्या बाजुला समांतर तटबंदी त्यात ठराविक अंतरावर बुरुज आहेत. फ़ाटका पासून ५ मिनिटाच्या अंतरावर डावीकडे झाडीत “खोकड तलाव” आहे. या तलावा पर्यंत जाण्यासाठी पायवाट आहे. या पायवाटेने तलावाच्या काठावर पोहोचल्यावर “तानपीर” हे पीराचे थडगे आहे. खोकड तलाव फ़क्त पावसाळ्यात पाण्याने भरलेला असतो. त्यानंतर त्याचा उपयोग गावकरी क्रिकेटचे मैदान म्हणून करतात. तलाव पाहून पुन्हा पुसाटी बुरुजाच्या दिशेने चालत जातांना रस्त्याच्या उजव्या बाजूला “नंदीची भग्न मुर्ती” दिसते . तेथून एक पायवाट खाली उतरते. सध्या पन्हाळा ते पावनखिंड ट्रेक करणारे शिवप्रेमी या वाटेनेच पन्हाळागड उतरुन मसाई पठारामार्गे पावनखिंड आणि विशाळगडा पर्यंत जातात. या वाटेला "फ़ुटक्या नंदीची वाट" म्हणतात. या वाटेच्या वरच्या बाजूला एक “चौकोनी आकारची विहिर” आहे.
हि विहिर पाहून आपण ५ मिनिटात पुसाटी बुरुजा जवळ पोहोचतो. याठिकाणी किल्ल्याच्या पठाराचे निमुळते टोक तयार झालेले आहे. पन्हाळ्याच्या या पश्चिम टोकावर एका पुढे एक असे दोन बुरुज आहेत. आतल्या बाजूच्या बुरुजाला "टकमक बुरुज" म्हंणतात. तर कड्याला लागूण असलेल्या भव्य बुरुजाला "पुसाटी बुरुज" (पिछाडी बुरुज) या नावाने ओळखले जाते. बुरुज काळ्य़ा घडीव दगडात बांधलेला असून त्याची उंची २० फूट आहे. येथे २ बुरुज असून त्यामध्ये “पाण्याचे खोल टाकं” आहे. त्यात दोन्ही बाजूने उतरण्यासाठी पायर्यान खोदलेल्या आहेत.
पुसाटी बुरुज पाहून झाल्यावर या परिसरातील किल्ल्याचे अवशेष पाहून होतात.
पुसाटी बुरुज पाहून आल्या मार्गाने परत न जाता उजव्या बाजूने जाणार्यार डांबरी रस्त्याने १० मिनिटे चालत गेल्यावर आपण महार तलाव परिसरात पोहोचतो.
८) महार तलाव परिसर :-
पुसाटी बुरुज पाहून आल्या मार्गाने परत न जाता उजव्या बाजूने जाणार्या् डांबरी रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर डाव्या बाजूला एक वाट झाडीत गेलेली दिसते . या वाटेने ५ मिनिटे चालत गेल्यावर आपण खोकड तलावाच्या दुसर्याक बाजूला पोहोचतो. इथे झाडाखाली “शिवपिंड” आहे. ती पाहून आल्या मार्गाने रस्त्यावर येऊन पुढे चालत गेल्यावर समोर वनखात्याने बसवलेले फ़ाटक दिसते. या फ़ाटकाच्या अगोदर एक पायवाट उजवीकडे झाडीत शिरते. या पायवाटेने आपण एक चढ चढून मोठ्या पठारावर पोहोचतो. या पठारावर "महार तलाव" नावाचा तलाव आहे. तलावाच्या शेजारी "इदगाह" आहे. तलावाच्या समोरच्या बाजूला "बॅरॅक्स" आहेत. या बॅरॅक्सच्या बाजूला एक साच पाण्याचा (पावसाळी) छोटा तलाव आहे. हा तलाव पाहून तटबंदीच्या दिशेने चालत जावे. तटबंदीला लागून एक पायर्यांरची वाट खाली दिसणार्याो घरांच्या दिशेने जाते. या वाटेने उतरुन गेल्यावर एक समाधी पाहायला मिळते. समाधीच्या पुढे "तटबंदीत एक खोली" पाहायला मिळते. या भागात पहारा करणार्याध सैनिकांचे उन, वारा, पाऊसापासून रक्षण करण्यासाठी खोलीची योजना या ठिकाणी केलेले असावी. तटबंदीतील खोली पाहून पुढे गेल्यावर तटबंदी लगत "शिवलिंग आणि नागशिल्प" पाहायला मिळते. याच वाटेने पुढे एक टप्पा उतरुन गोपाळतिर्थ आणि तीन दरवाजाकडे जाता येते. आपण आल्या मार्गाने परत रस्त्यावर येऊन फ़ाटकापर्यंत चालत जावे. फ़ाटक ओलांडल्यावर डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने २ मिनिटे चालत गेल्यावर डावीकडे एक पायर्या असलेली भव्य "बारव" पाहायला मिळते. बारव पाहून त्याच वाटेने पुढे गेल्यावर खोकड तलावाच्या काठाकाठाने आपण तानपीर जवळून पुसाटी बुरुजाला जाणार्याा रस्त्यावर पोहोचतो. याठिकाणी आपले महार तळे भागातील अवशेष पाहून होतात.
९) अंबरखाना परिसर :-
किल्ल्यावरील महत्वाचे ठिकाण म्हणजे "अंबरखाना". अंबरखाना हा पूर्वी बालेकिल्ला होता. याच्या सभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. यामध्ये वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. सर्व कोठ्यांना हवा व प्रकाश खेळ्ण्यासाठी झरोके ठेवण्यात आले होते. याशिवाय येथे सरकारी कचेर्या , दारुकोठार आणि टाकंसाळ इत्यादी होती.
धान्यकोठारा जवळ एक "महादेवाचे मंदिर" आहे. यात पिंडीसाठी वापरण्यात आलेला शाळीग्राम तापमाना प्रमाणे रंग बदलतो म्हणून यास रंग बदलणारी पिंड म्हणतात. या कोठारांच्या मागच्या बाजूस खाली उतरुन गेल्यावर एक पाण्याचा हौद पाहायला मिळतो. पुढे एक शाळेची इमारत आहे . त्या इमारती जवळ एक "विहिर" आहे. हे सर्व पाहून अंबरखान्याच्या प्रवेशव्दारा लगत जी तटबंदी आहे त्याच्या उजव्या बाजूला खाली उतरण्यासाठी पायर्याह आहेत. या पायर्यांनी खाली उतरल्यावर त्याठिकाणी एक "वीरगळीचा तुकडा" आहे.
वर वर्णन केल्याप्रमाणे पन्हाळा किल्ला संपूर्ण पाहाण्यासाठी दोन दिवस लागतात.
1.Palace
Maratha Queen Tarabai stayed in this palace. There is a beautiful Temple here. Now, the Municipal Corporation office, Panhala High school and military boys’ hostel is situated there.
2.Sajjakothi
As we move further from the palace, we come across Sajjakothi. Sambhaji Maharaj stayed in Sajjakothi when he was on Panhalgad. This was the place where confidential meetings of Shivaji Maharaj took place.
5.Char Darwaja
It is situated on the eastern side and was very important from security point of view. The British demolished it in 1844.
6.Lake Somale
Near the market on the fort is this big lake. On the lake side is a beautiful Temple of Someshwar. Here Shivaji Maharaj and his associates offered 1000 Chafa flowers.
7.Samadhi of Ramchandra Amatya
As we move from Someshwar Lake we come across 2 Samadhi. One is of Honorable Ramchandra Amatya and the second is of their wife.
8.Rede Palace
A still further way takes you to the Rede Palace. Initially it was a stable for horses, but later cattle were kept there. So it is called as Rede Palace.
9.Sambhaji Temple
Ahead of Rede Palace is Sambhaji Temple, which is actually a small citadel.
10.Dharmakothi
Near the Sambhaji Temple, we can see a spacious structure which is recognized as Dhramakothi. Her grocery was donated in charity.
11.Mahalaxmi Temple
Stepping out from the Palace, near the Nehru Garden, this is the oldest structure on the fort. It is almost 1000 years old. It was the deity of Bhoj King Gandaritya.
12.Teen Darwaja
This entrance is on the western part, and its carvings worth seeing. In 1676, Kondaji Farjand opened this door with 60 soldiers to conquer the fort.
13.Andarbav
This is a 3 storey monument. There is a well in the base, and a secret way to escape from the fort.
14.Baji Prabhu Statue
This place is not on the fort. It is near the bus stop.
3.Rajdindi
This is a tough way which travels down from the fort. Shivaji Maharaj managed to escape this way during the siege of Panhalgad, and went to Vishalgad, which is 45 miles away.
4.Amabarkhana
This was initially the Balle-Killa or the citadel on the fort. Nearby Ambarkhana is a Khandak. Here there are 3 buildings named Ganga, Yamuna, and Sarasvati, which were used for storing grains. Vari, Nagli, and Rice were stored here. Approximately 25 thousand Khandi food grain could be stored here.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
किल्ल्यावर राहण्यासाठी निवासस्थाने ,हॉटेल्स आहेत.
अन्न व्यवस्था
नाश्ता व जेवणासाठी तबक उद्यान परिसर, अंधार बाव परिसर व अंबरखाना येथे भरपूर हॉटेल्स आहेत. याशिवाय पन्हाळा गावात इतर हॉटेल्स आहेत.
पाणी उपलब्धता
किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
अतिरिक्त माहिती
१) पन्हाळा किल्ला पूर्ण पाहाण्यासाठी किमान २ दिवस तरी पाहीजेत. किल्ल्यावर बाजीप्रभुंच्या पुतळ्यापाशी गाईड मिळू शकतो. त्याला बरोबर घेऊन किल्ल्यावर खाजगी वहानाने किंवा रिक्षाने फिरता येते.
२) पन्हाळ्यावर मुक्काम करून खाजगी वहानाने ज्योतिबा, पावनखिंड, विशाळगड ही ठिकाणे पाहाता येतात तर चालत जाऊन पावनगड पाहाता येतो.
३) विशाळगडाची माहिती साईटवर दिलेली आहे.
जवळील गावे
Panhala
या परिसरातील इतर किल्ले कोल्हापूर
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा