पर्वतगड

गिरीदुर्ग नाशिक सोनगड आणि पर्वतगड
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
2700
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
नाशिक

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Parvatgad

Parvatgad

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

प्रस्तावना

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात भाटघर धरणाजवळ सोनेवाडी हे लहानसे गाव सिन्नर अकोले मार्गावर आहे . या गावाच्या मागे सोनगड आणि पर्वतगड हे दोन किल्ले आहेत. एका दिवसात हे दोन्ही किल्ले सहज पाहून होतात.

महत्त्वाची ठिकाणे

सोनेवाडी गावात रस्त्याला लागूनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे . या शाळेच्या समोर एक सिमेंटचा रस्ता गावात शिरतो . या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर कच्चा रस्ता लागतो. तो ओलांडल्यावर आपण टेकडीच्या पायथ्याशी पोहोचतो. याठिकाणी टेकडीवर काही घरे आहेत त्यामुळे टेकडीवर चढायला पायऱ्या आहेत. या पायऱ्यानी आपण ५ मिनिटात टेकडीवर पोहोचतो. टेकडीवरुन समोर लांबलचक पसरलेले पठार दिसते . पठाराच्या उजव्या बाजूला गावाच्या मागेच असलेला डोंगर म्हणजे पर्वतगड दिसतो, तर पठाराच्या डाव्या बाजूला कातळटोपी असलेला डोंगर म्हणजेच सोनगड दिसतो. या दोन्ही किल्ल्यावर जाणारी वाट या दोन डोंगरान्मधील खिंडीतून जाते . पठारावरुन मळलेल्या पायवाटेने खिंडीत पोहोचायला १५ मिनिटे लागतात.

खिंडीच्या मधोमध एक छोटीशी टेकडी आहे या टेकडीच्या डावी कडून जाणारी वाट सोनगड किल्ल्यावर जाते तर टेकडीच्या उजव्या बाजूकडून जाणारी वाट पर्वतगडावर जाते.

टेकडीच्या उजवीकडील पायवाटेने आपण तिरके चढाईला सुरुवात करावी (ही पायवाट सहजासहजी सापडत नाही . खिंडीतून गावाच्या दिशेला तोंड करुन तिरके पर्वतगड चढण्यास सुरुवात करावी ) साधारणपणे १५ मिनिटात आपण सपाटीवर पोहोचतो. या ठिकाणी ठळकवाट बाभळीच्या वनात शिरते . या वाटेने ५ मिनिटे चढल्यावर आपण कातळटप्प्याशी पोहोचतो . हा कातळ टप्पा चढण्यास थोडा कठीण आहे . तो १० मिनिटात पार केल्यावर समोर निवडुंगाची पुरुषभर उंचीची झाडे दिसतात . या निवडुंगाच्या मधून जाणाऱ्या पायवाटेने साधारणपणे १० मिनिटे चढल्यावर आपण एका मोठ्या तलावापाशी पोहोचतो. तलावाच्या डाव्या बाजूला पाण्याची तीन टाकी आहेत . त्यातील एक टाक बुजलेले आहे . टाकी पाहून तलावाला वळसा घालून आपण आलो त्याच्या विरूध्द बाजूस गेल्यावर एक टेकडी आहे . ती चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचतो.

येथून आड किल्ला , डुबेरा किल्ला , सोनगड आणि भाटघर धरण दिसते. खिंडीपासून किल्ला चढायला साधारणपणे पाउण तास लागतो.

कसे पोहोचावे

सोनगड आणि पर्वतगड या किल्ल्याच्या पायथ्याशी सोनेवाडी हे गाव आहे . सोनेवाडी गावात पोहोचण्यासाठी मुंबईहून घोटी मार्गे सिन्नर गाठावे. सिन्नर - पुणे रस्त्यावर सिन्नरहून १० किमी अंतरावर गोदेवाडी फाटा आहे . हा रस्ता थेट अकोलेला जातो. या रस्त्यावर गोंदेवाडी - दापूर - चापडगाव - सोनेवाडी हे अंतर १६ किमी आहे . सोनेवाडी ते अकोले १७ किमी सोनेवाडी ते सिन्नर २३ किमी आणि सोनेवाडी ते नाशिक ५३ किमी अंतर आहे . सिन्नर आणि अकोलेहून दर तासाला सोनेवाडीला जाण्यासाठी एस टी बसची सोय आहे . सिन्नर आणि गोदेवाडीहून सोनेवाडीसाठी जीप्स आहेत .

सोनगड आणि पर्वतगडाच्या मध्ये एक खिंड आहे . या खिंडीत जाण्यासाठी सोनेवाडी गावात रस्त्याला लागूनच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ उतरावे . या शाळेच्या समोर एक सिमेंटचा रस्ता गावात शिरतो . या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर कच्चा रस्ता लागतो. तो ओलांडल्यावर आपण टेकडीच्या पायथ्याशी पोहोचतो. टेकडी चढून गेल्यावर समोर लांबलचक पसरलेले पठार दिसते . पठारावरुन मळलेल्या पायवाटेने खिंडीत पोहोचायला १५ मिनिटे लागतात. खिंडीतून उजव्या बाजूची पायवाट पर्वतगडावर जाते.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ सोनेवाडी गावातून एक तास लागतो.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही . गावातील शाळेच्या व्हरांड्यात रहाण्याची सोय होते .

🍽️

अन्न व्यवस्था

जेवणाची सोय गावात नाही .

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .

सर्वोत्तम काळ

🌤️ जुन ते फ़ेब्रुवारी

जवळील गावे

सोनेवाडी

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

या परिसरातील इतर किल्ले सोनगड आणि पर्वतगड

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा

किल्ले स्वच्छ ठेवा

किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.