ट्रेकशितीझ स्लाईड-शो

सह्याद्री, गड-किल्ले, ट्रेकिंग आणि इतिहासावर आधारित शैक्षणिक व प्रेरणादायी सादरीकरणे

स्लाईड-शो (मराठी)

मुख्य उद्देश

  • महाराष्ट्राचा संरक्षक म्हणून शतकानुशतके उभ्या असलेल्या सह्याद्रीचे नैसर्गिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व लोकांपर्यंत, विशेषतः शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे.
  • शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रुक्ष वाटणाऱ्या, मात्र प्रत्यक्षात अखंड प्रेरणेचा स्त्रोत असणाऱ्या आपल्या संघर्षमय इतिहासाविषयी सर्वांमध्ये आवड, जागृती व सार्थ अभिमान निर्माण करणे.
  • गड-किल्ल्यांची सफर बसल्या जागेवर परिणामकारकपणे घडवून आणणे.
  • ट्रेकिंग विषयी आवड निर्माण करण्याबरोबरच प्रवास व सुरक्षेबाबत आवश्यक माहिती देणे.
  • गड-किल्ल्यांच्या संवर्धन व स्वच्छतेविषयी कर्तव्याची जाणीव निर्माण करून संबंधित उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे.

स्लाईड-शो चे विषय

  • सह्याद्रीचे ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक महत्त्व
  • सह्याद्रीतील विविध किल्ल्यांची माहिती
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र
  • छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती

क्षितिज ग्रुपने आतापर्यंत या विषयांवर विविध ठिकाणी अनेक स्लाईड-शो यशस्वीरित्या सादर केले आहेत.