मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) किल्ल्याची ऊंची :  190
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : मुंबई श्रेणी : सोपी
माहीम खाडीच्या पूर्वेकडील मुखावरील टेकडीवर इंग्रजांनी शीवचा किल्ला बांधला. इंग्रजांच्या ताब्यातील मुंबई बेट व पोर्तुगिजांच्या ताब्यातील साष्टी बेट यांच्या सीमेवर(शीवेवर) हा किल्ला १६७० मध्ये जेरॉल्ड ऑगियरने बांधला. इंग्रजांनी मुंबई बेटांच्या उत्तरेकडे काळा किल्ला, रिवा किल्ला व सायनचा किल्ला, हे नवीन किल्ले बांधून मजबूत संरक्षण फळी उभी केली. वसईच्या विजयानंतर पोर्तुगिजांकडून साष्टी बेट मराठ्यांच्या ताब्यात गेली. त्यावेळी ह्या किल्ल्यांना संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व आले.


Sion Fort
6 Photos available for this fort
Sion Fort
पहाण्याची ठिकाणे :
सायन किल्ल्याच्या पायथ्याशी जवाहरलाल नेहरु उद्यान आहे. जवळच भारतीय पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे. तेथे झाडीत २ तोफा पडलेल्या आहेत. कार्यालयाच्या दारातूनच पायर्‍यांचा रस्ता किल्ल्याकडे जातो. शीवच्या किल्ल्याचे तटबुरुज, ब्रिटीश कार्यालयाचे अवशेष, दारुकोठाराची खोली व चौकोनी आकाराचा मोठा हौद असे अवशेष अजून तग धरुन आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बुरुजावरुन माहीमची खाडी व आजुबाजूच्या विस्तृत प्रदेशाचे दृश्य दिसते. ह्या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे टेहळणी साठी व माहीम खाडी मार्गे होणार्‍या जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जात असे.
पोहोचण्याच्या वाटा :
मध्य रेल्वेच्या सायन स्थानकाच्या पूर्व बाजूस उतरुन डाव्या हाताच्या फूटपाथने ३ मिनिटे चालल्यावर पूर्वद्रुतगती महामार्ग येतो. हा महामार्ग ओलांडल्यावर दुतर्फा पुरातन वृक्ष उभे असलेला रस्ता लागतो. ह्या रस्त्याने २ मिनिटातच आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो.
जिल्हा Mumbai
 बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  माहीमचा किल्ला (Mahim Fort)
 रिवा किल्ला (Riwa Fort)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  वरळीचा किल्ला (Worli Fort)