डफळापूर गढी

भुई किल्ले सांगली डोंगररांग नाही
🏔️
अवघडीनुसार स्तर
सोपी
📏
समुद्रसपाटीपासून उंची
0
⏱️
ट्रेकसाठी लागणारा वेळ
N/A
🌤️
सर्वोत्तम काळ
वर्षभर

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Daflapur Fort

Daflapur Fort

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

डफळापूर गावात डफळापूरकरांनी बांधलेल्या गढीचे अवशेष आजही पाहायला मिळतात. गढीत आता राजे विजयसिंह डफळे शाळा बांधल्यामुळे काही अवशेष जरी नष्ट झाले असले तरी अजूनही बरेच अवशेष पाहायला मिळतात.

सांगली जिल्ह्यातील जुना पन्हाळा, रामगड किल्ला, डफळापूरची गढी आणि अंनतपुरचा भुईकोट किल्ला हे किल्ले खाजगी वहानाने एका दिवसात पाहाता येतात.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

डफळापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी १६८० च्या सुमारास ३,००० मोहरा खंडणीच्या बदल्यात आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवल्यावर डफळे राजघराणे व जत संस्थान उदयाला आले. सिद्दी खवासखानकडून आणखी वतने विकत घेऊन त्यांनी जत संस्थान वाढविले. या जत संस्थाना अंतर्गत जत व डफळापूर ही दोन मोठी शहरे आणि ११७ खेडी समाविष्ट होती. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर सटवाजीराजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या १६००० सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला. पेशवाईच्या काळात आऊसाहेब डफळे (१७०१–५४) यांनी पेशव्यांची अधिसत्ता मान्य करत संस्थानाचे स्वतंत्र कायम ठेवले. दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्रिंबकजी डेंगळेकडे या संस्थानचा कारभार सोपविला होता.१८२० मध्ये इंग्रजांनी तह करून सातारच्या छत्रपतींची अधिसत्ता मान्य करविली. त्यानुसार १८४६ नंतर ३ वर्षे राजा अल्पवयीन असल्याने कारभार छत्रपतींचाच होता. सातारा खालसा झाल्यावर (१८४८) संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक बनले. डफळ्यांच्या गैरकारभारामुळे १८७४–८५ या काळात एजंटच जवळजवळ सर्व कारभार पाहत असे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात डफळापूरचा २५ चौ.किमी. प्रदेश राणीची खाजगी जहागीर समजला गेला. संस्थानाला दत्तकाची सनद १८९२ मध्ये मिळाली. त्यानुसार १९०७ मध्ये रामराव अप्पासाहेब या दत्तकपुत्राला अखत्यारी मिळाली.

कसे पोहोचावे

मिरजहून कवठे महाकाळ या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक एसटी बस आहेत. कवठे महाकाळ ते डफळापूर अंतर २५ किलोमीटर आहे.
जत या शहरापासून डफळापूर अंतर १८.८ किलोमीटर आहे.

महत्त्वाची ठिकाणे

राजे विजयसिंह डफळे शाळेचे प्रवेशद्वार मुख्य रस्त्यावर आहे. तेथील तटबंदी पाडून शाळा उभारलेली आहे. गढीचे प्रवेशद्वार आजही शाबूत आहे. ते पाहाण्यासाठी शाळेच्या अलीकडे असलेल्या गल्लीत जावे लागते. हे प्रवेशद्वार एका उंच जोत्यावर बांधलेले आहे. प्रवेशद्वाराची कमान आजही शाबूत आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर वाड्याचे जोते आहे. त्यावर शाळेची जुनी बैठी वास्तू आहे. याठिकाणी अजून एक छोटे दार आहे. ही वास्तू ओलांडून पुढे गेल्यावर नवीन शाळेच्या प्रांगणात आपला प्रवेश होतो. याठिकाणी एक इंग्रजी "L" आकाराची बारव आहे. या बारवे जवळ गढीत सापडलेले हत्तीचे दगडावर कोरलेले शिल्प रंगवून ठेवलेले आहे.
विहीर पाहून पुढे गेल्यावर शाळेच्या नवीन इमारतीच्या टोकाला एक ढासळलेला बुरुज आहे. असे एकूण तीन बुरुज तीन बाजूला पाहायला मिळतात. गढीत मागच्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे.

गढी पाहून नवीन शाळेच्या गेट मधून बाहेर पडतांना डाव्या भिंतीवर शाळेतील कलाशिक्षक श्री कांबळे यांनी काढलेले शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य चित्र आहे. त्या चित्राच्या बाजूला रायगडावरून आणलेला एक छोटा दगड त्यांनी लावलेला आहे.

गढीतून बाहेर पडून डावीकडे वळून मुख्य रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूने एक छोटा रस्ता जातो या रस्त्याने १० मिनिटे चालत गेल्यावर एक हनुमान मंदिर पाहायला मिळते. या हनुमान मंदिराजवळ एक सर्पशिला आहे. हनुमान मंदिरासमोर दगडी बांधणीचे एक भक्कम प्रवेशद्वार आहे. डफळापूर गावाला एकेकाळी तटबंदी असावी त्यातील हे प्रवेशद्वार आजही उभे आहे.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर पाण्याची सोय नाही.

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

जवळील गावे

Daflapur

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा