आंबोळगड

समुद्र किनाऱ्यावरील किल्ले रत्नागिरी डोंगररांग नाही
🏔️
श्रेणी नुसार स्तर
सोपी
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
82
🏰
किल्ल्याचा प्रकार
समुद्र किनाऱ्यावरील किल्ले
📍
जिल्हा
रत्नागिरी

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Ambolgad

Ambolgad

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालूक्यात दोन किनारी दूर्ग आहेत ते म्हणजे आंबोळगड व यशवंत गड. "मुसाकाजी" या प्राचिन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला. १८१८ मध्ये कर्नल इमलॉक याने हा किल्ला जिंकला. १८६२ नंतर आंबोळगडावरील वस्ती उठली.

महत्त्वाची ठिकाणे

आंबोळगड किल्ला आंबोळ्गड गावात समुद्रा शेजारील उंचवट्यावर वसवलेला किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२०० चौरस मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र व उत्तर आणि पश्चिमेस खंदक आहे. आजमितीला खंदक बुजलेला आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे. चिरे एकमेकांवर रचून बनवलेली तटबंदी १० ते १५ फ़ुट उंचीची होती. आता ती ढासळल्याने ६ ते ७ फ़ुट उंचीची तटबंदी पाहाता येते. उध्वस्त प्रवेशव्दारातून गडात प्रचेश करतांना उजव्या बाजूला एक बुरुज दिसतो. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला भिंत आहे . त्यापुढे बुरुज होता आता तो पूर्ण ढासळलेला आहे. किल्ल्याच्या प्रवेशव्दारावर थेट मारा करता येऊ नये म्हणून अषी रचा केलेली होती. किल्ल्यात शिरल्यावर मध्य्भागी एक वडाचे मोठे झाद आहे त्याने पूर्ण किल्ल्यावर सावली धरलेली आहे. या झाडा समोर एक तुटलेली तोफ़ पडलेली आहे. झाडामागे आत्यताकृती विहिर आहे. विहीरीच्या समोर आणि बाजूला दगडी पात्र आहेत. विहिरीच्या उजव्या बाजूला उध्वस्त वास्तूचे जोते आहे. त्या समोर समाधीचे वृंदावन आहे. याशिवाय किल्ल्यावर काही घरांची जोती पाहायला मिळतात. किल्ला फ़िरायला १० ते १५ मिनिटे लागतात. किल्ल्या पासून पुढे जाणार्‍या रस्त्याने सड्यावर गेल्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे. या सड्यावरुन सागराचे दर्शन होते.

कसे पोहोचावे

रत्नागिरीहून पावस - आडीवरे - नाटे -आंबोळगड यामार्गे अथवा राजापूर- नाटे- आंबोळगड यामार्गे गडावर जाता येते. रत्नागिरीहून आंबोळगडासाठी बसेस आहेत.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ गावातून गडावर जाण्यासाठी ५ मिनिटे लागतात.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

गडावर राहण्याची सोय नाही, गावातील ऋषी पर्यटनात राहाण्याची सोय होऊ शकते.

🍽️

अन्न व्यवस्था

गडावर जेवणाची सोय नाही. नाटे येथे जेवणाची सोय होते.

💧

पाणी उपलब्धता

गडावर पाण्याची सोय नाही.

सर्वोत्तम काळ

🌤️ वर्षभर

जवळील गावे

आंबोळगड

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा

किल्ले स्वच्छ ठेवा

किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.