दांडा किल्ला
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Remnant of fortification, Danda Fort
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांना सुपरिचित आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे स्थानकापासून ९ कि.मी व केळवे गावातून १ कि.मीवर दांडा खाडी आहे. या खाडीचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांनी दांडा किल्ल्याची निर्मिती केली होती.
कसे पोहोचावे
केळवे रेल्वे स्टेशनवरुन ८ किमीवर केळवे गाव आहे. रिक्षा किंवा बसने येथे पोहचता येते. केळवे गावातील चौकातून डाव्या हाताने जाणार्या रस्त्याने कस्टम किल्ला, केळवे पाणकोट, फुटका बुरुज पहात दांडा खाडी ओलांडून १ किमी वरील दांडा गावात पोहोचता येते. किल्ल्याचे अवशेष रस्त्याच्या बाजूस व गावात विखुरलेले आहेत. याच रस्त्याने खटाल गावामार्गे १.५ किमी वरील भवानगडला जाता येते.
महत्त्वाची ठिकाणे
दांडा किल्ल्याचे फारच थोडे अवशेष उरलेले आहेत. ते अवशेषही गावभर विखुरलेले आहेत. केळवे गावातून दांडाखाडी ओलांडून दांडा गावात शिरल्यावर डाव्या हाताला दांडा किल्ल्याचे काही अवशेष दिसतात. या ठिकाणी वाढलेल्या वडाच्या झाडांनी हे अवशेष धरुन ठेवलेले आहेत. गावकर्यांनी या जागी सार्वजनिक संडास बांधला आहे. अवशेषावरुन येथे किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे असे वाटते. प्रवेशद्वाराच्या बाजूच्या देवडी प्रमाणे दिसणारा भाग ओळखता येतो. या ठिकाणी एक चौकोनी विहिर आहे. गडाचे इतर अवशेष गावात विखुरलेले आहेत.
दांडा फुटका बुरुज:- दांडा किल्ल्याच्या संरक्षणासाठी पोर्तुगिजांनी दांडा फुटका बुरुजाची उभारणी केली. सदर फुटका बुरुज दांडा पुलाजवळ उध्वस्त अवस्थेत आहे.
Danda-Futka (broken) bastion
This was built to protect the fort. The remnants can be found near the bridge.
सुविधा व सोयी
अतिरिक्त माहिती
१)भवानगड(१.५ किमी), दांडा किल्ला, फुटका बुरुज, कस्टम किल्ला (१.५किमी), केळवे पाणकोट (१.५ किमी) केळवे भुईकोट (३ किमी) माहिमचा किल्ला व (५ किमी) शिरगावचा किल्ला हे सर्व किल्ले एका दिवसात पाहून होतात. परंतु यासाठी समुद्राच्या भरती ओहोटीची वेळ माहित असणे फार महत्वाचे आहे. कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पाहाता येतो. ओहोटीची वेळ पाहून व्यवस्थित नियोजन केल्यास सर्व किल्ले एका दिवसात आरामात पाहाता येतात. पालघर किंवा केळवेहून दिवसभरासाठी ६ आसनी रिक्षा मिळू शकते.
२)भवानगड, केळवे पाणकोट ,केळवे भुईकोट ,माहिमचा किल्ला व शिरगावचा किल्ला या किल्ल्यांची माहीती साईटवर दिलेली आहे.
जवळील गावे
kelve
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा