धोत्रीचा किल्ला (गढी)
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Bastion & main entrance gate Dhotri Fort (Gadhi)
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
सोलापूर जिल्ह्यातील धोत्री गावात एक सुस्थितील गढी आहे, या गढीला धोत्रीचा किल्ला या नावाने ओळखले जाते. या गढीतील मातीच्या बुरुजात बनवलेला वळणदार जिना पहाण्यासारखा आहे.
कसे पोहोचावे
१) सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर सोलापूर पासून १९ किमीवर कर्देहळ्ळी गाव आहे. येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूचा छोटा रस्ता पकडावा. कर्देहळ्ळी पासून १४ किमीवर धोत्री गावात किल्ला आहे.
२) सोलापूर - हैद्राबाद रस्त्यावर सोलापूर पासून १५ किमीवर ब्राम्हणी गाव आहे. येथे मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूचा छोटा रस्ता पकडावा. या रस्त्याने मुसळी - तांदुळवाडी मार्गे २४ किमीवर धोत्री गावात किल्ला आहे.
महत्त्वाची ठिकाणे
धोत्री गावातून किल्ल्याच्या एका भव्य बुरुजाला वळसा घालून आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारापाशी येतो. किल्ल्याचा उत्तराभिमुख मुख्य प्रवेशव्दार १२ फूट उंच आहे. या प्रवेशव्दाराला नविन लाकडी दरवाजा बसवलेला आहे. प्रवेशव्दाराजवळील तटबंदीत सज्जा आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर दोनही बाजूंना देवड्या आहेत. समोर आयताकृती रिकाम मैदान आहे. त्याच्या टोकाला वास्तूचे अवशेष आहेत. किल्ल्याच्या सर्व तटबंदीच्या व बुरुजांच्या भिंती पांढर्या मातीच्या बनवलेल्या आहेत. त्यांना आतील व बाहेरच्या बाजूने संरक्षणासाठी दगड व विटा लावलेल्या आहेत. बुरुज व तटबंदीत जागोजागी जंग्या आहेत. उजव्या बाजूच्या तटबंदीत बालेकिल्ल्याचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर उजव्या बाजूला पायर्यांची सुकलेली चौकोनी विहिर आहे. बालेकिल्ल्याला चार बुरुज आहेत. दक्षिण टोकावरील मातीच्या भव्य बुरुजात बुरुजावर जाण्यासाठी वळणदार जीना आहे. या जिन्याने बुरुजावर चढून गेल्यावर संपूर्ण किल्ला दिसतो व किल्ल्याची रचना समजते. बुरुजावरून खाली उतरून आल्यावर बाजूच्या तटबंदीत एक अर्धवर्तूळाकार छ्त असलेली खोली आहे. या तटबंदीच्या कडेकडेने पश्चिमेकडील तटबंदीकडे चालत जातांना वाटेत वास्तूंचे उध्वस्त अवशेष पहायला मिळतात. पश्चिमेच्या तटबंदीत एक झुडूपांनी झाकलेला छोटा दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यावर सर्व बाजूंनी तटबंदीने बंद असलेले आयताकृती मैदान आहे. या मैदानाच्या दोन टोकाला दोन बुरुज आहेत. उजव्या बाजूला एक कोरडी विहिर आहे. हे सर्व पाहून झाल्यावर किल्ल्याची फेरी पूर्ण होते.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
धोत्री गावात राहण्याची सोय नाही. सोलापूर किंवा अक्कलकोट येथे रहाण्याची चांगली सोय आहे.
अन्न व्यवस्था
धोत्री गावात जेवणाची सोय नाही.
पाणी उपलब्धता
किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.
अतिरिक्त माहिती
सोलापूरहून सकाळी निघून धोत्री किल्ला पाहून नळदुर्ग किल्ला पहायला जावे.
जवळील गावे
Dhotri
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा