डुबेरगड(डुबेरा)
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Dubergad(Dubera)
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ही यादवांची पहिली राजधानी होती. सिन्नर जवळ असलेल्या डुबेरा गावातील एका टेकडीवर डुबेरा किल्ला आहे. सिन्नर या एकेकाळच्या राजधानीच्या जवळ असलेल्या या किल्ल्याचा उपयोग राजधानीकडे येणार्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी झाला असावा. डुबेरा किल्ल्यावरुन एका बाजूला सिन्नर व दुसर्या बाजूला आड, पट्टा आणि औंधा (अवंधा) पर्यंतचा प्रदेश दिसतो.
डुबेरा हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे आजोळ होते. बाजीरावांचा जन्म डुबेरा गावातील बर्वे वाड्यात झाला. आज वाड्याची अवस्था बिकट असली तरी आपल्याला गावातील वाडा पाहाता येतो.
खाजगी वहानाने डुबेरा, आड, पट्टा, अवंधा आणि बितनगड हे चार किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहाता येतात.
कसे पोहोचावे
सिन्नर हे डुबेरा किल्ल्या जवळचे मोठे शहर आहे. सिन्नरहून दर तासाला डुबेरा गावात जाण्यासाठी एसटी बसेसची सोय आहे. याशिवाय खाजगी जीप (वडाप) सिन्नर ते डुबेरा आणि सिन्नर ते ठाणगाव धावतात.
मुंबई नाशिक महामार्गाने घोटी पर्यंत येऊन पुढे घोटी सिन्नर रस्त्याने हरसुल गावापर्यंत यावे. हरसूल गावातून डुबेरा गावाला जाणारा रस्ता आहे. मुंबई ते डुबेरा अंतर १८० किमी आहे.
महत्त्वाची ठिकाणे
किल्ल्याच्या पायथ्याशी जनार्दनस्वामींचा आश्रम आणि नागेश्वर मंदिर आहे. या आश्रमापर्यंत डांबरी रस्ता अहे. खाजगी वहानाने थेट आश्रमापर्यंत जाता येते. डुबेरा गावातून आश्रमापर्यंत चालत जाण्यास अर्धा तास लागतो. आश्रमापासून गडावर जाण्यासाठी पायर्या आहेत. या मार्गाने गडावर पोहोचण्यास २० मिनिटे लागतात. पायर्या संपल्यावर उजव्या बाजूला कातळात खोदलेली पाण्याची दोन मोठी टाकी दिसतात. गडावर सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे. देवीचे दर्शन घेऊन पायर्यांच्या दिशेने चालत जाऊन गडाच्या विरुध्द बाजूच्या पठारावर गेल्यावर एक मोठा कोरडा तलाव दिसतो. किल्ल्याचे पठार मोठे आहे पण त्यावर इतर काही अवशेष नाहीत.
गडावरुन सिन्नर पर्यंतचा प्रदेश, म्हाळुंगी नदीचे खोरे, पट्टा आणि औंधा (अवंधा) पर्यंतचा प्रदेश दिसतो.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
किल्ल्या खालील आश्रमात राहाण्याची सोय होऊ शकते.
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय सिन्नरला आहे.
पाणी उपलब्धता
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा