फर्दापूर सराई
प्रस्तावना
छ.संभाजीनगर (औरंगाबाद) - अजिंठा - जळगाव रस्त्यावर, अजिंठा लेण्यांजवळ अजिंठा सराई आणि फ़र्दापूर सराई अशा दोन सराया आहेत. सराई म्हणजे व्यापारी, प्रवासी, सैन्यदल यांना तात्पुरती राहाण्यासाठी केलेली सोय. या सरायांना बुरुज , तटबंदी , दरवाजे अशी किल्ल्यासारखी संरक्षणाची सोय केलेली असते.
महत्त्वाची ठिकाणे
छ.संभाजीनगर (औरंगाबाद) - अजिंठा - जळगाव रस्त्यावर, अजिंठा लेण्यांजवळ अजिंठा सराई आणि फ़र्दापूर सराई अशा दोन सराया आहेत. सराई म्हणजे व्यापारी, प्रवासी, सैन्यदल यांना तात्पुरती राहाण्यासाठी केलेली सोय. या सरायांना बुरुज , तटबंदी , दरवाजे अशी किल्ल्यासारखी संरक्षणाची सोय केलेली असते. सराईचाआकार चौकोनीअसून त्याला चार बुरुजआहेत व दोन दरवाजे आहेत. सराईच्या मध्यभागी एक मशिद आहे. प्रत्येक बुरुजाच्या आतून सराईच्या वरील भागात म्हणजे फ़ांजीवर जायची सोय होती. परंतू आता फक्त दक्षिण दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या बुरुजातून फ़ांजीवर जात येते. याबुरुजाच्या आत असलेल्या एका खोलीत पीर बसवलेला आहे. पूर्वीच्या काळी कदाचित प्रत्येक बुरुजात कोठारे असावीत. फ़ांजीवरून आपल्याला पुर्ण सराईला फेरी मारता येते. तटबंदीच्या दोन्ही बाजूला सध्या अतिक्रमण झालेले आहे.
अजिंठा लेणी, अजिंठा किल्ला, अजिंठा सराई व फर्दापूर सराई एका दिवसात खाजगी वाहनाने सहज पाहाता येतात.
कसे पोहोचावे
छ.संभाजीनगर (औरंगाबाद) - अजिंठा - जळगाव रस्त्यावर अजिंठा लेण्यांपासून साधारण एक कि.मी. अंतरावर फ़र्दापूर सराई आहे. अजिंठ्याहुन जळगावकडे जाताना MTDC चे रिसॉर्ट लागते, येथून पुढे गेल्यावर एक रस्ता डावीकडे वळतो हा रस्ता आपल्याला सराईच्या दक्षिण दरवाज्यपाशी घेऊन येतो. इथे खूण म्हणून मुख्य रस्ता जिथे डावीकडे वळते तिथे एक छोटेखानी शिव मंदिर आहे.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ N/A
सुविधा व सोयी
सर्वोत्तम काळ
🌤️ N/A
जवळील गावे
फर्दापूर
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.