घोसाळगड

गिरीदुर्ग रायगड रोहा
🏔️
अवघडीनुसार स्तर
मध्यम
📏
समुद्रसपाटीपासून उंची
850
⏱️
ट्रेकसाठी लागणारा वेळ
N/A
🌤️
सर्वोत्तम काळ
N/A

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Ghosalgad Machi

Ghosalgad Machi

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

Fort

Fort

Fort

Fort

सर्व नकाशे पहा

प्रस्तावना

रोहा शहराजवळ, अवचितगड व घोसाळगड हे किल्ले आहेत. घोसाळगड हा किल्ला डोंगरावर वसलेला आहे. शिवपूर्वकाळात अस्तित्वात असलेला हा किल्ला ताम्हण घाटमार्गे होणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. जंजिरा, तळगड, घोसाळगड, ताम्हणघाट, घनगड असा तो व्यापारी मार्ग होता. या मार्गे कोकणातील बंदरावर उतरणारा माल घाटमाथ्यावर नेला जात असे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतल्यावर त्याचे नाव बदलून ‘वीरगड’ असे ठेवले. मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर केलेल्या तहाप्रमाणे शिवरायांनी जे १२ किल्ले स्वत:कडे ठेवले त्यात ‘ घोसाळगड’ हा किल्ला होता, त्यावरुन या गडाचे तत्कालीन महत्व लक्षात येते.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

घोसाळगड हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. १६व्या शतकात हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता इस १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. ‘‘रघुनाथ बल्लाळ(कोरडे) सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालिले त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला’’ असा उल्लेख सभासद बखरीत आहे. शिवरायांनी घोसाळगडचे नाव ‘वीरगड’ ठेवले इ.स १६५९ मध्ये सिद्दीने घोसाळगडला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दी वेढा उठवून निघून गेला. त्यानंतर सिद्दी, आंग्रे, मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. इस १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून घेतला.

कसे पोहोचावे

मुंबईहून रोह्याला जावे. रोहा - भालगाव - मुरुड असा रस्ता आहे. या रस्त्यावर रोह्यापासून १० कि.मीवर घोसाळे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.

महत्त्वाची ठिकाणे

घोसाळा गावातून गडावर जाताना तटबंदी लागते. तटातून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. तटबंदी जवळ शरभ कोरलेला दगड आहे. तटबंदीतून किल्ल्यात गेल्यावर प्रथम उजवीकडे जावे. याठिकाणी उजव्या बाजूला तटबंदीत एक शौचकूप आहे. पुढे गेल्यावर डाव्या बाजूला आत गेल्यावर डावीकडे तटबंदीत एक शौचकूप आहे. पुढे गेल्यावर टोकावर एक बूरुज आहे. त्यावर ध्वज लावलेला आहे.

हे सर्व पाहून पुन्हा प्रवेश केला त्याठिकाणी येऊन पायर्‍या चढायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला तटबंदीत चोर दरवाजा आहे. त्यातून बाहेर पडल्यावर बाजूलाच पाण्याचे टाक आहे. हे पाहून पायर्‍यांच्या मार्गाने वर चढून गेल्यावर किल्ल्यावर प्रवेश करण्यापूर्वी मुख्य दरवाजाचे ढासळलेले चिरे दिसतात. ते पार्ब्करुन पुढे गेल्यावर आपला घोसाळगड माचीवर प्रवेश होतो. किल्ल्याच्या मधल्या उंचवट्यावर बालेकिल्ला आहे. या उंचवट्याच्या उजवीकडून गडफेरीला सुरुवात केल्याबर उजव्या बाजूला कातळात कोरलेली ३ पाण्याची टाकी आहेत. पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक खांब टाक आहे. त्याच्या पुढे कातळात कोरलेले एक टाक पाहायला मिळते.

थोड्याच वेळात आपण बालेकिल्ल्याच्या मागील बाजूस पोहोचतो. इथेच एक तोफ उघड्यावर पडलेली दिसते. या तोफेच्या समोरुन एक वाट बालेकिल्ल्यावर जाते. वाट निसरडी असल्याने जरा जपूनच जावे लागते. बालेकिल्ल्यावरुन संपूर्ण परिसर नजरेस पडतो. बालेकिल्ल्यावर अवशेष नाहीत. बालेकिल्ला पाहून परत तोफ़ेपाशी माचीवरुन येऊन बालेकिल्ल्याच्या उंचवट्याला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केल्यावर उध्वस्त वास्तूचे अवशेष दिसतात. पुढे गेल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. त्याच्या पुढे एका कोठाराचे अवशेष आहेत. पुढे गेल्यावर आपण उध्वस्त प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. यात देवड्यांचे अवशेषही पाहायला मिळतात. याठीकाणी झाडाचा आधार घेऊन खाली उतरुन पायवाटेने गडाखाली जाता येते. पण ही वाट फ़ारशी वापरात नाही. प्रवेशव्दार पाहून पुन्हा पायवाटेवर येऊन पुढे गेल्यावर एक पाण्याअच मोठ टाक दिसते. त्याच्या पुढे कड्यालगत पाण्याची चार टाकी आहेत. ही टाकी पाहून पायर्‍यांपाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडफ़ेरीस एक ते दीड तास लागतो.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

गडावर रहाण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

गडावर जेवणाची सोय नाही.

💧

पाणी उपलब्धता

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

अतिरिक्त माहिती

१) रोहा परिसरात ४ किल्ले येतात. नीट नियोजन केल्यास, स्वत:च्या वहानाने , तळागड, ,घोसाळगड, बिरवाडी व अवचितगड हे किल्ले व कुडाची लेणी व्यवस्थित पाहून होतात.
२) तळागड, बिरवाडी व अवचितगड या किल्ल्याण्ची माहिती साईटवर दिलेली आहे.

जवळील गावे

Ghosala

या परिसरातील इतर किल्ले रोहा

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा