कण्हेरगड
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Pleateu of Kanhergad
प्रस्तावना
अजंठा सातमाळ रांग म्हणजे नाशिक आणि गुजराथच्या सीमेवरील तटबंदीच होय. याच रांगेत आडवाटेवर एक किल्ला आहे. त्याचे नावं कण्हेरगड, इतिहास प्रसिध्द असा हा कण्हेरगड आजमितिस बराच दुर्लक्षित आहे.
महत्त्वाची ठिकाणे
गडावर पोहोचल्यावर खडकात खोदलेला बुरुज दिसतो. येथून थोडे पुढे गेल्यावर एक नेढं दिसते. नेढ्याच्या समोरून जाणारी वाट थेट गडमाथ्यावर घेऊन जाते. गडमाथा बराच प्रशस्त आहे.गडमाथ्यावर पाण्याची ६ ते ७ टाकी आहेत. महादेवाची पिंड आहे. धोडप किल्ल्याच्या समोर तोंड येईल अशी गुहा एका कड्यात खोदलेली आहे. गडावर वाड्यांचे काही अवशेष आढळतात. गडाचे दुसरे टोक हे धोडपच्या माची सारखेच आहे. गडावरून पश्चिमेला सप्तश्रुंगी, मार्कंड्या ,रवळ्या जवळ्या, धोडप, कंचना ,हंड्या अशी संपूर्ण सातमाळ रांग दिसते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो.
कसे पोहोचावे
कण्हेरगडावर जाण्याचे दोन मार्ग आहेत.हे दोनही मार्ग कण्हेरगड आणि समोरचा डोंगर यांच्या खिंडीत एकत्र येऊन तिथूनच वर जातात.
१ नाशिक - नांदुरी मार्गे :-
नाशिकवरून नांदुरी गाव गाठावे. नांदुरीतून कळवणला जाणार्या रस्त्यावरच नांदुरी गाव आहे. नांदुरी पासून ६ किमी अंतरावर आठंबा गाव आहे. या गावातून २ किमी अंतरावर असणार्या ‘सादडविहीर’ या गावात यावे. सादडविहीर गावातून किल्ल्यावर जाण्यास ठळक वाट आहे. या गावातून खिंड गाठण्यास अर्धा तास लागतो.
२ नाशिक - कळवण मार्गे:-
नाशिक - कळवण मार्गे ओतूर गाठावे. ओतूर मधून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणार्या कण्हेरवाडी गावात यावे. कण्हेरवाडी गावातून वर सांगतिलेली खिंड गाठण्यास १ तास लागतो.
या दोन्ही वाटा वर खिंडीत येऊन मिळतात. गडावरून येणारी एक सोंड सुध्दा याच खिंडीत उतरते. ती सोंड पकडून एक तासाच्या खड्या चढणी नंतर आपण गडमाथ्यावर पोहचतो. वाट निसरडी आहे, त्यामुळे जरा जपूनच चढावे लागते.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ सादडविहीर गावातून दीड तास लागतो तर कण्हेरवाडीतून २ तास लागतात.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे. यात ५ लोकांची राहण्याची सोय होते.
अन्न व्यवस्था
जेवणाची व्यवस्था आपण स्वत
:च करावी.
पाणी उपलब्धता
किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.
सर्वोत्तम काळ
🌤️ N/A
जवळील गावे
सादडविहीर.
या परिसरातील इतर किल्ले अजंठा सातमाळ
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.