खारबाव कोट
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Kharbao kot
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
लोणावळाच्या डोंगररांगांमध्ये उगम पावणारी उल्हास नदी वसई जवळ अरबी समुद्राला मिळते. या नदीवरील कल्याण हे प्राचीन बंदर आहे. कल्याण बंदरातून माल विविध घाट मार्गांनी घाटावरील बाजारपेठां मध्ये जात असे. उल्हास खाडीतून कल्याण पर्यंत जाणार्या व्यापारी जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी, त्यावर नजर ठेवण्यासाठी अनेक किल्ले, चौक्या उल्हास खाडीच्या आसपास बांधलेल्या दिसतात. त्यापैकी खाडी मुखावर असलेला वसई किल्ला, धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला, नागला बंदर किल्ला, गायमुख किल्ला, पिंपळास किल्ला (चौकी), वेहेळे किल्ला (चौकी) कल्याणचा दुर्गाडी किल्ला असे अनेक किल्ले, चौक्या वेगवेगळ्या काळात, राजवटीत बांधले गेले. पोर्तुगिजांनी बांधलेले हे किल्ले (चौक्या) वसईच्या युध्दात मराठ्याच्यां ताब्यात घेतल्या. त्यानंतरच्या काळात मराठ्यांची सत्ता भारतभर पसरली. पोर्तुगिजांची सत्ताही महाराष्ट्रातून निघुण गेली आणि गोव्यापुरती सिमित राहीली . त्यामुळे पोर्तुगिजांनी कल्याण ते वसई या परिसरातील खाड्यांवर , नद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले हे किल्ले (चौक्या) काळाच्या ओघात नष्ट होत गेल्या. आजही त्यातील फ़क्त काही भिंती कशाबशा तग धरुन आहेत. यातील अनेक किल्ले खाजगी मालमत्ता झाल्याने काही काळातच नष्ट होऊन जातील.
या कोटाचे फ़ारसे अवशेष शिल्लक न राहील्याने किल्ला किंवा त्यावरील अवशेष पाहायला गेल्यास या कोटाला भेट देणार्यांची निराशा होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची ठिकाणे
खारबाव जवळून उल्हास नदी वहाते. या नदी जवळ असलेल्या टेकडीवर खारबावचा किल्ला आहे. आता खारबावच्या टेकडीवर दाट वस्ती आहे, त्या वस्तीत असलेल्या चिंचोळ्या रस्तांमधून टेकडी चढून सरकारी दवाखान्यापाशी पोहोचावे. याठिकाणी किल्ल्याचा एकमेव तुटलेला बुरुज तग धरुन उभा आहे. सरकारी दवाखाना बांधतांना किल्ल्याचे इतर अवशेष पाडून टाकलेले आहेत. या बुरुजात जाण्यासाठी दिंडी दरवाजा आहे. बुरुजाच्या बाजूला फ़क्त ५ फ़ूट लांब आणि १५ फ़ूट उंच तटबंदीच्या भिंतीचे अवशेष पाहायला मिळतात. गावात किल्ल्याबद्दल कोणाला माहिती नसल्यामुळे सरकारी दवाखाना कुठे आहे याची चौकशी करावी. किल्ल्याच्या अवशेषांचे कॉऑरडीनेट्स Kharbao Fort 19°17'42.47"N, 72°59'42.39"E.
खारबाव कोट पासून २.५ किमी अंतरावर फ़िरंगकोट आहे.
कसे पोहोचावे
कल्याण - भिवंडी मार्गे खारबाव १९ किलोमीटर आहे. खारबाव गावातील सरकारी दवाखान्या जवळ किल्ल्याचे अवशेष आहेत. किल्ल्याच्या अवशेषांचे कॉऑरडीनेट्स Kharbao Fort 19°17'42.47"N, 72°59'42.39"E.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ N/A
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
राहाण्याची सोय नाही.
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय नाही.
पाणी उपलब्धता
पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
सर्वोत्तम काळ
🌤️ वर्षभर
जवळील गावे
खारबाव
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.